कविता - बालगीत 🌷 ' मुंगीताई ' तारिख - मंगळवार, २३ जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' मुंगीताई '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - मंगळवार, २३ जानेवारी २०२४
वेळ - ४ वाजून २२ मि.

मुंगीताई मुंगीताई, लगबग कशापायी ?
सांगा ही, सदाचीच कसली इतकी घाई ?

वाघ पाठीशी जणू, लागल्या सारख्या ...
का हो तुम्ही धावता, वेड्या-सारख्या ?

कडक शिस्तिचंही, तुम्ही पालन करता ...
नीट रांगा करुन, मग धावतच राहता ...

आकाराने तुम्ही ताई, इटुकल्या कित्ती ...
रात्रंदिवसाची करता पण धावपळ अति ...

कुणाचीच तुम्हांला वाटत नाही का भिती ...
सततच्या चालतात हो तुमच्या करामती ...

कधी-कधी कुणाशी, पंगाही तुम्ही घेता ...
सुमडीत कुठे-कुठे, जाऊन तुम्ही डसता ...

मुंगीताई तुम्ही जरी एवढ्याश्शा दिसता,
करु शकता हत्ती-दादालाही, वेडापिसा ...!

थकणं तर तुमच्या, स्वभावातच नाही ...
येते कुठून ही ऊर्जा, सांगा आम्हालाही ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
















































Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "