कविता - बालगीत 🌷 ' हूप हूप हूप '. तारिख - शुक्रवार, ५ जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' हूप हूप हूप '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शुक्रवार, ५ जानेवारी २०२४
वेळ - दुपारी १ वाजून ३ मि.

माकडा माकडा, हूप हूप हूप
तुझ्या शेंडीला, शेरभर तूप

हूप हूप हूप, शेरभर तूप 
मस्ती करूया खूप खूप खूप

फांदी-फांदीवर, झाडा-झाडांवर
बिनधास्त उड्या, मारतोस तू

आंबा, पेरू, केळ्यांवर-
चांगलाच ताव, मारतोस तू

माणसां सारखा, चालतोस तू ...
नक्कल करण्यात‌ तरबेज तू

सर-सर झाडांवर चढतोस तू ...
गोलांट्या उड्या मारतोस तू ...

श्री हनुमानाचा, वंशज तू ...
बुध्दिमान अन् चतुर तू ...

माकडचेष्टा करतोस तू ...
आम्हां खूप खूप हसवतोस तू

माकडा माकडा, हूप हूप हूप ...
तुझ्या शेंडीला, शेरभर तूप ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



































Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "