कविता - 🌷 ' निद्रिस्त ' तारिख - २ नोव्हेंबर २०१९


कविता - 🌷 ' निद्रिस्त '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २ नोव्हेंबर २०१९
वेळ - संध्याकाळी ७ वाजून ५९ मि 

कोणा सांगू ही अंतरीची कळ
ही मुकीच, पश्चात्तापाची झळ
साचलेली मनातील जळ-जळ
पिच्छा पुरविते सदाची हळहळ 

शिणलेल्या या तना-मनाला
अव्यक्त वेदना ती अपरंपार
काय करावे काहीच सुचेना
टाकला दैवावरी सारा भार ...

ऐन तारुण्याची ती सळसळ
अन् का निराशेचा भस्मासुर
गिळण्या टपला टाकूनी गळ ...
दृश्य किती ते भयावह-भेसूर ...

कळस बनवायचा घाट घातला,
बावनकशी सोनं, बेगडी मुलामा
बिन फायद्याचा फुकटचा ड्रामा
नामधारी विकतचे काकामामा ...

सगळंच होतं आखीव-रेखीव ...
जणू होई साकार स्वप्न सजीव 
अतृप्तीनं भूतकाळ पोखरून,
जणू घडीच टाकली विस्कटून ...

आपलं नाणं जरी खणखणीत ...
परिस्थितीमुळे झालं गुळमुळीत
मग मांजरीच्या गळ्यात ती घंटा,
बांधूनही कोणाला फायदा-तोटा ...

मांजरीचा झालाय बेरकी बोका ...
वेळीच त्याला आवरायला हवा
संधी मिळताच घालेल तो घाला,
अन् वेड पांघरून करेल कांगावा

सोन्याला भट्टीत तावून सुलाखून
त्याचा कस, निखरणारच अजून ...
अस्सल पुढे बेगडी कसं टिकणार ?
निद्रिस्त डोळे कधी बरं उघडणार ?

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "