कविता - 🌷 ‘ पालवी ‘ तारीख - रविवार, २९ सप्टेंबर २०१९

कविता - 🌷 ‘ पालवी ‘
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारीख - रविवार, २९ सप्टेंबर २०१९

अजून एक नवा करकरीत दिवस येतो ...
नव्या आशांची कोवळी पालवी लेऊन !

पुन्हा तो आशाळभूत होऊन,
जणू मुजरा करीत तो लवून ...
अपेक्षांचं असं ओझं लादून,
नव-बदलांची जाणीव होऊन ...

तशात विचार जातो चाटून 
अंगात काटा येतो सरसरून !

पाच गेले अन् पन्नास राहिले
म्हणता-म्हणता आली पन्नाशी ...
पालटत गेली सगळी परिस्थिती ...
तेंव्हाच बदलांची जाणीव झाली ...

हे असं वारंवार का बरं घडतं,
याच विचाराने तनमन पोखरतं ...
अपेक्षा बाळगून, निराश होऊन ...
पदरी फक्त, नवीन अनुभव येतो !

तरुण सळसळतं रक्तं, नवा जोश
नवनवीन योजना+आनंदी जल्लोष
मग प्रश्नांची ही झुंड हवी कशाला ?
झुंज न देता, विषयाला बगल देऊन ...

नवं-नवं सगळंच, हवं-हवंसं वाटतं ...
जुनं-पानं मग पार निरूपयोगी ठरतं ...
अनुभवाचे बोल, वाटू लागतात फोल ...
सोईस्करपणे करती, ऐकलं-न ऐकलं ...

अजून एक नवा करकरीत दिवस येतो ...
सोनसळी संकेतासह हसत-खेळत येतो 
नव्या आशांची कोवळी पालवी लेऊन !
नव्या आशांची कोवळी पालवी लेऊन !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "