कविता - बालगीत 🌷 ' ओळखा पाहू '. तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' ओळखा पाहू '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४
वेळ - दुपारी १ वाजून ५३ मि.

बगिच्यात, आभाळात उधळतात सप्त रंग ...
बघता क्षणीच पकडायला सगळे होती दंग

फुला-फुलांचे रंग लेवून मनमोहक दिसतात ...
लहान मोठ्या सगळ्यांनाच सतत लुभावतात 

आवाज न करताच ते गुपचुप येऊन बसतात ...
मध शोषून झाला की सुमडीत पसार होतात 

एवढे लहानसे असूनही सर्वांना वेड लावतात
वेड्यासारखे सारे त्यांच्या पाठीमागे धावतात ...

किती पाठलाग केला तरी नक्की बगल देतात ...
हातावर तुरी देऊन ते बघता-बघता सटकतात

ओळखा पाहू कोण आहेत, जे असं करतात ?
आकर्षक सुंदर मोहक दिसून सदा मोहवतात ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆





































Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "