कविता - 🌷 ' हवेहवेसे ' तारीख - मंगळवार, ३० जानेवारी २०२४

कविता - 🌷 ' हवेहवेसे '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारीख - मंगळवार, ३० जानेवारी २०२४
वेळ - ११ वाजून १९ मि.

हवेहवेसे वाटते सारे,
झणी कवेत कवटाळावे ...
सुरक्षित ठेवावे त्या,
कधी न निसटू द्यावे ...  

क्षणभंगुर ते क्षण सुखाचे,
मुठीत घट्ट पकडूनी घ्यावे ...
दु:खाची कधी हवा पसरता,
हवेत त्यांना विरू न द्यावे ...

इवले-इवले जीव कोमल,
अलगदपणे हाताळावे ...
काचेसम तडका जाऊन,
कधीही भंग न होऊ द्यावे ...

सूक्ष्म, सुंदर, ईश्वरीय ...
शुभ-संकेत ते ओळखावे
तरल संवेदना झंकारता,
तन-मन त्यात तल्लीन व्हावे ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆




































Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "