कविता -🌷 ' अशी सुवर्ण-संधी '. तारिख - २२ नोव्हेंबर २०१६

कविता -🌷 ' अशी सुवर्ण-संधी '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २२ नोव्हेंबर २०१६

मोहोजाळ घाली वेटोळे ...
वेढूनी कधी बसे न कळे ...

अळवा-सम जर मन असे तृप्त, ...
जल-थेंबापरि राही, ते अलिप्त ...
अज्ञानाची करोडों-लक्ष झापडं ...
मति बंद, डोळे उघडे जरी सताडं ...

अतृप्तीच सर्वं वासनांचे, असे मूळ ...
दुःखी करी जीवा लावूनी भलते खूळ ...
बिलगून बसे, मुंगी जशी न सोडी गूळ ...
मन-अधीन भरकटे, होऊनी दिशाभूल ...

बुध्दी-भ्रष्ट होऊन, चाले अति-मंद ...
चुकीच्या जागी, मग शोधी आनंद ...
वागणं-बोलणं-आचरण, सर्व बेबंद ...

बाळगूनी फुकाचा तो उन्मत्त-दर्प ...
फुत्कार मारीं अंतस्थ विषारी सर्प ...
पापं करुन-सवरुन, वरुन करी शंखं ...
संधी साधून हमखास मारीतसे डंखं ...

जमवल्या पापांच्या अगणित राशी ...
उन्मत्तपणा भरीसभर होताच राषी ...
आता कितीही जरी झाली उपरती, ...
परत येणे नाही, निसटून गेलेली रेती ...

सरळ मार्गी जीवा, पडे अति-संभ्रम ...
न कळे, काय करावे, होतसे विभ्रम ...
मुजोर जीव सोकावें, बनूनी बेशरम ...
सोडी पूर्ण ताळ-तंत्र, लाज व शरम ...

पापं करण्याचं पण लागू शकतं व्यसन-
अंगातली हुशारी, गैर-प्रकारांनी वापरून ...
करीत सुटे अत्याचार, निष्पापां सतावून-
धरबंध सोडून, मग त्यजून पवित्र-बंधन ...

उपकार करणाऱ्यांवरती लादे अत्याचार ...
विसरुनी भूतकाळ, मदोन्मत्त होतसे फार ...

हेच असे दुष्ट-दुर्जनांचं, मुख्य लक्षण ...
स्वार्थी-अंध-वासनेतच होई रममाण ...
त्याच भावनेनं ग्रासून पिच्छा पुरवणं ...
बहुतांशी दुःखांचं, एकमेव हेच कारण ...

८४ लक्ष योनींच्या खडतर प्रवासा नंतर-
दुर्लभ हा मनुष्यजन्म, एकदा मिळाल्यावर ...
विचारपूर्वक खर्च करावा, सद्-कारणांवर ...
अशी सुवर्ण-संधी नाही मिळणार वरचेवर ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


























Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "