कविता - बालगीत 🌷 ' लब्बाड चांदोबा '. तारिख - सोमवार, १ जानेवारी २०२४
कविता - बालगीत 🌷 ' लब्बाड चांदोबा '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - सोमवार, १ जानेवारी २०२४
वेळ - दुपारी ४ वाजून ३३ मि.
रात्रीच्या वेळी आभाळात,
चमचम करीत, चांदण्यात ...
एक गोलमटोल चांदोबा, ...
हसतो गालातल्या गालात ...!
सर्वांबरोबर चालत राहतो ...
आपण थांबलो की थांबतो ...!
चांदण्यांबरोबर खेळ खेळतो ...
ढगांच्या आड, मध्येच लपतो ...!
कधी कधी पाण्यात दिसतो ...
कधी कधी गायबच असतो ...!
एक दिवस होतो, टुम्म पुरी ...!
नंतर लहान-लहान, होत जातो !
आजीच्या गोष्टीत, रोजच येतो ...
मजेशीर खूप-खूप गमती करतो ...!
अर्जुन झोपला की, पळ काढतो ...
स्वप्नात लब्बाड, हळूच डोकावतो ...!
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment