कविता - बालगीत 🌷 ' छकुला '. तारिख - शनिवार, ६ जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' छकुला '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, ६ जानेवारी २०२४
वेळ - रात्री ९ वाजून १५ मि.

इवलिशी पावले अन् इवलेसे हात,
टप्पोरे मस्त डोळे, लकलकतात ...

दुडूदुडू चाले, पेंग्विन जसा ...
गोब-या गालांचा आमचा ससा ...

गोड गोड हसून, आपलंसं करी ...
देवघरात जाऊन, नमो-नमो करी ...

मधाळ आवाजात तो गाणी गातो ...
हात उंचावून "उचलून घे" म्हणतो ...

पुस्तकं उघडून, पानं चाळवतो ...
चित्रातल्या प्राण्यांशी गप्पा मारतो ...

एका पायावर भुर्र जायला तयार ...
गाडीत बसून, टुकुर-टुकुर बघणार ...

मस्ती करतो अन् "ओ नो" म्हणतो ...
मिश्कीलपणाने नाक उडवून हसतो ...

अस्सा गोड आमचा, अर्जुन छकुला ...
त्याच्याशी खेळताना, वेळही थांबला ...!

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆





























































Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "