कविता - 🌷 ' अश्वत्थामा ' तारिख - शनिवार, २७ जानेवारी २०२४
कविता - 🌷 ' अश्वत्थामा '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, २७ जानेवारी २०२४
वेळ - रात्री ८ वाजून २६ मि.
माणसं अशी विचित्र का वागतात ...
ठीक असून, खुसपटं का काढतात ...
यालाच का "सुख बोचणे" म्हणतात ?
स्वत:चा न्यूनगंड कुरवाळत बसतात ...
दुसऱ्याला सदा कमी लेखू पाहतात ...
अन् त्यातच धन्यता मानत राहतात ...
दुसऱ्याला फसवणं फार सोपं असतं ...
स्वत:च्या मनात मात्र ते सलतच राहतं ...
शरिराची इजा औषधांनी भरुन येते ...
मनात खोल, जखम भळभळत राहते ...
वरवरची मलमपट्टी कामी येतच नाही ...
जखमांवर खपली कधी धरतंच नाही ...
असे अतृप्त जीव 'अश्वत्थामा' बनतात ...
जन्मोजन्म तेल मागत हिंडतच बसतात ...
'करावे तसे भरावे'त्यांना उशिराने कळते ...
पण हातातून वेळ निसटून गेलेली असते ...
माणूस वेळीच जर, माणुसकीनं वागेल ...
पृथ्वीवरही स्वर्ग-सुख-प्राप्त करु शकेल ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment