Posts

Showing posts from December, 2023

कविता - बालगीत 🌷 ' जमली जोडी '. तारिख - रविवार, ३१ डिसेंबर २०२३

कविता - बालगीत 🌷 ' मस्त जोडी जमली ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - रविवार, ३१ डिसेंबर २०२३ वेळ - दुपारी ३ वाजून ४० मि.नव आकाशात, ढग झाले गोळा ... मुलांना म्हणाले, "या-नाचा-खेळा"... एकजात सगळी मुलं झाली गोळा ... त्यांना खूप खूप खूप, आनंद झाला ... एवढ्यात, वीज लागली चमकायला ... म्हणाली, "मुलांनो, लागलीच पळा ... "आता म्हातारी लागलीय् दळायला" ... "म्हणून गाशा गुंडाळा अन् घरी पळा" ... "शिवाय पाऊस घातलाय् यायला ... "धो-धो कोसळून, चिंब भिजवायला" "पावसात भिजून सर्दी-पडसं-होईल" "त्यामुळेच  कदाचित  शिक्षाही होईल"... वीजेच्या आवाजाने, मुलं घाबरली ... गाल फुगवून, मग घरातच बसली ... आजी म्हणाली, "चला रे चला",  पहिल्या पावसात, मस्त भिजायला" ... हे ऐकून अर्जुनची, खुलली कळी ... पावसात भिजायला, मज्जाच आली ... चिंब चिंब भिजायची, गंमतच न्यारी ... अर्जुन-आजीची, मस्त जोडी जमली ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - बालगीत 🌷 ' हुश्शार पोपट '. तारिख - शुक्रवार, २९ डिसेंबर २०२३

कविता - बालगीत 🌷 ' हुश्शार पोपट ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - शुक्रवार, २९ डिसेंबर २०२३ वेळ - सकाळी १० वाजून १९ मि. विठु-विठु आवाज, करतो कोण ? पोपटी हिरवागार, आहे कोण ? हिरव्या झाडीत, लपतो कोण ? फांदीवरुन झोके, घेतो कोण ? लालबुंद चोचीने खातो कोण ?  आंबे, पेरूंना, चोचवतो कोण ?  हुबेहूब नक्कल, करतो कोण ? अर्जुन बरोबर भात, खातो कोण ? असा हुश्शार पोपट, आहे कोण ? 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - बालगीत 🌷 ' मस्तराम '. तारिख - शुक्रवार, २९ डिसेंबर २०२३

कविता - बालगीत 🌷 ' मस्त-राम ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - शुक्रवार, २९ डिसेंबर २०२३ वेळ - दुपारी २ वाजून २ मि. ससोबा अहो ससोबा, तुम्ही काय काय करता ? टुण्-टुण् उड्या मारत, चहूकडे फिरत बसता ... इकडे-तिकडे सदान्-कदा, का हो बावरुन बघता ? चाहूल लागता कुणाची, घाबरुन पळ का काढता ? दिसता तुम्ही गोबरे-गोबरे, गोजिरवाणे, सुंदर स्वभावाने खेळकर-शांत, थोडे चंचल-बिलंदर तुमचे लांब-लांब कान अन्  भन्नाट श्रवणशक्ती  लाल-लाल-चुटुक डोळे अन् कमाल तीक्ष्ण दृष्टी ...! धावताना पाय असे, कमाल कामगिरी करता पाठीमागे शिकारी लागता, वायु-वेगाने धावता ... नागमोडी वळणे घेत त्यास, पार गोंधळून टाकता  जमिनीत खड्डा खणून त्यात, गुपचुप लपून बसता ! धोका टळताच खड्ड्यातून, सुमडीत बाहेर येता झाडांची कोवळी-कोवळी, पाने हिरवीगार खाता ताज्या-ताज्या लाल-लाल, गाजरावर ताव मारता खूश  होऊन  उड्या मारीत, सगळी-कडे बागडता ...! ससोबा तुम्ही ना कुणाच्या अध्यात, ना कधी मध्यात  तुम्ही अर्जुन सारखे मस्त-राम, रमता तुम्ही खेळात ... कुरण खाऊन कोवळं, हिरवळीवर लोळत-बसता ... अर्जुन बरोबर खेळताना, मज्जाच मज्जा ...

कविता - 🌷 ' सत्-चिदानंद प्राप्ती ' तारीख - गुरुवार, २८ डिसेंबर २०२३

कविता - 🌷 ' सत्-चिदानंद प्राप्ती ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारीख - गुरुवार, २८ डिसेंबर २०२३ वेळ - दुपारी, २ वाजून ४९ मि. हे सद्गुरु नाथा, कृपा करा ... हे दीन-दयाळा, कृपा करा ... हे नरहरी दत्तात्रेया दिगंबरा  कृपा करा, झणी कृपा करा ||ध्रु|| जळी-स्थळी, कृष्णाकाठी दिसे मज सद्-गुरुदेव मूर्ती दिव्य-प्रकाशे होई, सद्गुरुंची आरती आशिष देती सर्वा, दिव्य नेत्र-ज्योती  दयाळा, दिव्य नेत्र-ज्योती ||१|| हे दीनानाथा, कृपा करा भक्त-जनांवरी कृपा करा सत्वर मजवरी कृपा करा कृपा करा, झणी कृपा करा ||२|| अधीर डोळे झाले माझे रात्रंदिन झुरती, दयाळा, रात्रंदिन झुरती ... दर्शन घडता सद्-गुरुदेवा, दर्शन घडता सद्-गुरुदेवा, सत्-चिदानंद प्राप्ती दयाळा, सत्-चिदानंद प्राप्ती ||३|| दिगंबरा दिगंबरा कृपा करा, झणी कृपा करा कृपा करा, झणी कृपा करा 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता : 🌷 ' सुखाला भरती ' तारिख : मंगळवार, २९ ऑगस्ट २०२३

कविता : 🌷 ' सुखाला भरती ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : मंगळवार, २९ ऑगस्ट २०२३ वेळ : संध्याकाळी, ७ वाजून ४० मि. हे  गौरी-नंदना, हे देवा गणराया कृपादृष्टी करण्या, बाप्पा सत्वर या कृपावृष्टी करण्या, बाप्पा सत्वर या वेदनेने प्राण, कंठाशी आले आता ... तुमच्या विना कोण, आहे आम्हां त्राता ? तुमच्या विना बाप्पा, कोण आम्हां त्राता ? आस लागली अंतरी, तुमच्या आगमनाची वळवा हो दयाळू, कृपा-दृष्टी तुमची वळवा हो वळवा, कृपा-दृष्टी तुमची आम्हां सर्वां नादान, बालक समजून तरी ... रक्षण करा हो बाप्पा, सर्वतोपरी ... रक्षण करावं बाप्पा, सर्वतोपरी ...   रात्रंदिन गाईन, देवा तुमचे गुण-गान ... सद्बुद्धी-सद्शक्तिचं, आम्हा द्यावं वरदान ! सद्बुद्धी-सद्शक्तिचं, आम्हां द्या वरदान ! भरकटलेल्या मनांना, द्यावी जागृती इतुकीच कळकळीची, बाप्पा ही विनंती ... इतुकीच बाप्पा-चरणी, कळकळीची विनंती ... निरामय आनंदाची, सदा वृष्टी व्हावी ... सर्वांच्याच सुखाला, पूर्ण भरती यावी ! सगळ्यांच्या सुखाला, पूर्ण भरती यावी ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆  

कविता - बालगीत 🌷 ' गंमत-जम्मत ' तारिख - बुधवार, २७ डिसेंबर २०२३

कविता - बालगीत 🌷 ' गंमत-जम्मत ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - बुधवार, २७ डिसेंबर २०२३ वेळ - दुपारी १ वाजून २ मि. च्याऊ म्यांऊ, च्याऊ म्यांऊ  पख्खालीचे पाणी प्याऊ ... च्याऊ म्यांऊ, च्याऊ म्यांऊ  पख्खालीचे पाणी प्याऊ ... एकदा किनई, एक असते मनी-माऊ ... गोरी गोरी छान, अन् मऊ मऊ मऊ ... डोळे मिटून म्हणे ती, म्याऊं-म्याऊं ... भूक लागली की ती, शोधायची खाऊ ... बंद दरवाज्यावर करायची, खुर्-खुर्-खुर् नाही तर मग सुरू व्हायची, कुर-कुर-कुर मनीमाऊच्या गडबडीने, आजी पण उठली ... " थांब गं मने थोडी," मनीला ती म्हणाली ... मग लगेच, आजीने दूध तापायला ठेवलं ... थोडं चहाला ठेवलं, थोडं विरजण लावलं ... थोडं कॉफीला ठेवलं, थोडं खीरीला ठेवलं ... थोडं नैवेद्याला ठेवलं, थोडं घर म्हणून ठेवलं ... थोडं पूजेला ठेवलं, थोडं बाळ-गोपाळांना दिलं ... मग थोडं अर्जुनला दिलं, थोडं मनी-माऊला दिलं ... इतका वेळ वाट बघत, गुपचुप बसली होती मनी ... बशीभर दूध पाहून, तिच्या तोंडाला सुटलं पाणी ... आजीने "पी" म्हणेतो, मनी बघत होती एकटक ... लाल-चुटुक जिभलीने मग, मनीनं दूध केलं मटंक ... चुटू-चुटू आवाज करी...

कविता - 🌷 " सदा अर्जुन बनून "... तारिख - शनिवार, १५ जूलै २०१७

कविता - 🌷 " सदा अर्जुन बनून "... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - शनिवार, १५ जूलै २०१७  निर्भेळ आनंदच आनंद, सर्वत्र आता वाटा ... त्याच आनंदाच्या लहरी दश-दिशांनी येता ... बनूनी अपार, अगणित अथांग अनंत लाटा ... तेव्हा निखळ स्वानंदाला सांगा काय हो तोटा ... गोष्ट जरी साधी-सरळ-अदृष्य वाटाही फुटती ... घनदाट धुक्यामधूनी सुध्दा, अफाट प्रयत्नांती ... घट्ट बंद मुठीतून निसटून, रेतीला मिळते रेती ... सुंदर-कमलिनीच्या गोड-मिठीतील तो भ्रमर ... सुखावून, हसतच पचवून टाकी मृत्युचे जहर ... बेधुंद होऊनी, देहभान विसरूनी, सर्व प्रहर ... जणू काळ मातला, चंद्र हसला, झाला कहर ! सुखासीन, क्षण-भंगुर असे तन-मन-जीवन ... क्षणिक सुखाच्या मृगजळापाठी, जाई धावून ... सत्-संगतीने सत्कारणी लागता, परिसा-सम  निखरते जसे, जणू झळकणारा सुवर्ण-कण ... जणू यंत्रातील झर-झर झरणार्या रेती-समान,  आयुष्याचा क्षणन्-क्षण पळे, बिजली-समान ... प्रत्येकाने जागरूक होऊन, शोधता सत्कारण आयुष्य किंचितही वाया न जाई, विना-कारण ... लक्ष्यावर केंद्रित करून आणि अचूक नेम धरुन, जीवनाचे-अचूक ध्येय साधावे, सदा अर्जुन बनून ... ...

कविता - 🌷 " ती ओढ अनामिक " तारिख -१० सप्टेंबर २०१६

कविता - 🌷 " ती ओढ अनामिक "  कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख -१० सप्टेंबर २०१६ कधी सुरेल सुरावट पडावी कानी ... आभाळ भासे जणू आरस्पानी ... हे स्वप्न पाहते की मी जागेपणी ... आशिष देतसे जणू निसर्ग-राणी ... सृष्टीदेवीची नव-विध रूपं ... निरखून त्या जगणं होई सोपं ... मोहविते ती आस्मानी निळाई ... निरपेक्ष प्रेम करणारी ती आई ... जणू क्षण-न्-क्षण मंतरलेला ... वावच नसतो मग चिंतेला ... मखमली स्वरावली कानाला ... जणू स्वर्गीय सुगन्ध सुमनाला ... श्रावण खेळ ऊन-पावसाचा ... मारवा वाटतोय हवाहवासा ... कैऱ्या, चिंचा, बोरांचा फडशा ... बालपणीचा गवसला कवडसा ... झिरमिर बरसती श्रावणधारा ... मनी मोर करीतसे गोड-इशारा ... उधळीत सप्तरंग उभवी पिसारा ... नकळत येतसे मधुर-शहारा ... टिपूर मस्त चांदणं पडलंय ... पोर्णिमेचा चंद्र लुभावतोय ... मन-मानस मुक्त विहरतोय ... आनंद दुथडी भरुन वाहतोय ... ह्रदयी लागला हा एकच छंद ... मन-भ्रमर तो रस-पानी गुंग ... स्वानंदे गुंजारव होऊनी धुंद ... उंच उंच गगनात उडे स्वछंद ... न कळे, का मज लागे ती ओढ अनामिक ... न कळे का खेचे हे वेडं मन, अधिकाधिक ... वाटे मज ही अनुभूती एकदम ...

कविता - 🌷 " साखर-पुडा "... तारिख - शनिवार २१ जानेवारी २०१७

कविता - 🌷 " साखर-पुडा "... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - शनिवार २१ जानेवारी २०१७ मुलाच्या घरुन होकारार्थी निरोप घेऊन सोमण, रविवारी तिच्या घरी हजर झाले ... त्यांच्या होकारामुळे सोमणांना अतिशय आनंद झाला होता ... "ती" त्यांना वर्तमानात आणंत म्हणाली,"मुलगा पाहण्यातला असला, तरी 'होणारा-नवरा' या दृष्टीनं, आजवर कधी नाही पाहिलं त्याला ..." एकदा त्याला भेटून बोलल्यावरच योग्य निर्णय घेण्यास सोपं जाईल ..." त्यानंतरच मुलाच्या घरातील बाकी सगळ्यांना भेटणं, योग्य होईल ..." दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता तिच्या घरी ते दोघे भेटणार होते ... नेहमीप्रमाणे सकाळी ती उशीराच उठली, आईने "तो येणार" ही आठवण केली... "नऊ वाजायला १ तासाचा अवधी, फक्त आठच वाजलेत आत्ता" ती म्हणाली ... एवढ्यात दरवाजा वाजला, ती जाऊन बघते तर "तो" चक्क दरवाज्यात हजर ... म्हणाला,"मी, दाखवून घ्यायला आलोय"! त्याच्या "सेन्स ऑफ ह्युमर"वर ती खुश...  ती चकित होऊन,"अजून नऊ नाही झाले" त्यावर म्हणे,"तयार न होता, कशी दिसतेस...

कविता - 🌷 " एहसास "... तारिख - शनिवार, ९ सप्टेंबर २०१७

कविता - 🌷 " एहसास "... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - शनिवार, ९ सप्टेंबर २०१७ यूँ अपनीही धूनमें, सागर-किनारे टहलनेका मझा ही कुछ और है ... समय कोईभी हो, चाहे दिन हो या रात हो चाहे सुबह हो या शाम हो ... मौजोंका नजारा, तन-मनको एकदमसे तरो-ताजा करही देता है ... नजर जहाँतक पहुँच पाये, दूर-दूर तक बस्स पानी ही पानी हो ... कभी हलका हरा, कभी भुरा-साँवला हो कभी नीले आकाशकी तरह ... आस्मान मानो पानीके साथ कुछ लुकाछुपी खेलता हुआ ... समुंदर हमे सीखाता है जीने का एक अंदाज, नया-नयासा कुछ अलगसा ... जब जैसा समय आये, जिंदगीका रुख बदलकर समयके अनुसार ढाँल देना ... अगर जोरोंकी पवन बहती हो, मौजोंको उँचा, उपरतक उछाँल देना ... मानो निले-निले अंबरको छूँ लेनेकी दिलकी, तमन्ना ही पूरी करनी हो ... जब मंद-मंद गति से हवाएँ चलती हो, तो स्वयं शांतीदूत बनकर, पेश आना ... चुपचाप से बहते रहना और अपनी ही " मौज " में बस्स, " मस्त " रहना ...!!! जिंदगी भी कितनी हँसीन, दिलचस्प दिलरुबा जैसी है ... उसकी मात्र आहट भी, होटोंपर पलभर में मुस्कान लाती है ... तो दूसरेही पल आँखोंसे ओ...

कविता : 🌷 ' सुखाची गुरुकिल्ली '. दिनांक : गुरूवार २३ जून २०२२

कविता : 🌷 ' सुखाची गुरुकिल्ली ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले दिनांक : गुरूवार २३ जून २०२२ वेळ : ७ वाजून ३० मि. अवघे जीवन खात्रीनं होईल सरळसूत, जेंव्हा सदैव पाठीशी, असती अवधूत ! भुकेल्या जीवाच्या मुखी पडतो घास, श्रमलेल्या जीवाला मिळतो आवास ... खरोखरचं हे नक्की काय आहे गूढ ? त्यांच्या पाठीशी उभे असती अवधूत ! तहानलेल्या जीवांना मिळते 'जीवन'... दीन-दुर्बलांना संकटात मिळे संरक्षण ... दु:खात पिचलेल्या जीवांना दिलासा ... दाट काळोखात त्यांना दिसे कवडसा ... ह्याच्या मागचं नेमकं काय गहन गूढ ? त्यांच्या पाठीशी, सदैव उभे अवधूत ! आंधळ्या-कष्टी जीवनात भक्कम आधार ... भक्तिमार्गाच्या अवलंबनाने स्वप्ने साकार ... दुष्ट-महापापी जनांना मिळे चांगलाच धडा, पाप-क्षालनानंतरच होई रिता पापाचा घडा ... असं होण्याचं, नेमकं काय बरं असावं गूढ ? कारण, त्यांच्या पाठीशी उभे राहती अवधूत ! सन्मार्गावर पाऊल अन् सदा कृतज्ञ असं मन ... श्वासागणिक नाम-जप सदा,"अवधूत चिंतन " कळत नाही, नेमकं काय आहे अगम्य गूढ ? भक्तांच्या पाठीशी उभे, रात्रं-दिवस अवधूत ! भक्तिची वा भक्त-जनांची उडवू नये खिल्ली, भक्तिमार...

कविता - 🌷 " अद्वितीय जोड " तारिख - १३ सप्टेंबर २०१६

कविता - 🌷 " अद्वितीय जोड " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १३ सप्टेंबर २०१६ भल्या पहाटे डोळे उघडण्या पूर्वी मखमली सूर फुंकर मारुनी ऊठवी ... डोळे मिटलेले-उठती तरलशा लहरी  सर्वांगी सरसरे, गोड अशी शिरशिरी ... ही कसली उठतेय ऊर्मी मनांतरी... विलक्षण असुनी वाटे हवीहवीशी ... मनात तृप्ती, मग कान का अधाशी ... फिरफिरुनी सूर रुंजी घालती मनाशी ...  दुरून मधुर वेणू-नाद भुरळ घालीतसे मन राधा बनून, जणू त्याकडे धावतसे ... सूर-वेडी राधा अमूर्तालाच शोधत बसे ... अंतरीं तिच्याच तो अगम्य-स्वर लपलासे ... नभात कोणता असे हा तारा ? खुणावतो, चमचम करी बावरा ... धावे अकारण मन नदी-तीरा, मोह-मायेचा जणू खेळ हा सारा ... निसर्गातिल सूक्ष्मातिसूक्ष्म नाद-सदा देती हळुवार प्रतिसाद ... शांत आसमन्ती होई चलबिचल-पक्षांची मधाळ किलबिल ... झाडा-झाडातून वारा येई वाजवीत शीळ  कोणी टाकली, चमकत्या आभाळी नीळ ? नकळत मनोमनी कोणी ही घातली भूल ? कोण जाणे राधेला असं कसं लागंलं खूळ ? ऐकूनी श्री हरिची मधुर मुरली,   वेडी राधा घर-दार विसरली ... जणू तहान-भूकही सारी सरली- नकळत सर्व देह-भान हरपली ... सहज अलगद राधा-राधा-...

कविता - 🌷 " कवयित्रीच्या दृष्टीकोनातून " तारिख - १ जानेवारी २०१७

कविता - 🌷 " कवयित्रीच्या दृष्टीकोनातून " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १ जानेवारी २०१७ " दहा शिर, वीस हात, वीस पाय असलेला दशानन "... कवयित्रीच्या नजरेतून याचा अर्थ, भिन्न भिन्न रूपानं ... दहा-डोकी असलेली व्यक्ती म्हणजे दसपट बुद्धिमान ... वीस हात आणि पाय असणे म्हणजे दसपट बलवान ... एकूण मतितार्थ एकटा रावण ताकदीनं दहांच्या समान ... रावणाने महादेव-आराधनेत फुलांच्या ऐवजी, स्वतःचं एकेक शिर-कमल...  शिव-शंभोस अर्पण केलं-त्याच्या या कृतीचा प्रतिकात्मक स्वरूपाचा अर्थ, रावणानं विद्वत्ता-बुद्धी-चातुर्याने मनं-बुद्धी-मानस-चित्त-अंत:करण-अहंकार...  या दश मनोदशांचा-मनोवृत्तींचा पूर्ण-त्याग केला, प्रसन्न होऊन शिवाने दिलं दर्शन... महर्षी वेद-व्यास यांच्या प्राचीन रामायण या महा-काव्याचा हाच खलनायक-रावण... नायक-श्रीराम याला शोभेल असाच, जितका रावण अहंकारी त्याच्या विरुद्ध...  एकवचनी, एक-पत्नी, आज्ञा-धारक, सर्वांनाच आपलंसं करणारा-श्रीरामचंद्र ... पुत्र-धर्माचं, पति-धर्माचं, राज-धर्माचं, नित्य-पालन-करणारा सुस्वभावी, शांत श्री विष्णूचा सातवा अवतार महा-पराक्रमी, धीर-गंभीर, रघु-नंद...

कविता - 🌷 " प्रेमाची विलक्षण पातळी " तारिख २५ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " प्रेमाची विलक्षण पातळी " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख २५ डिसेंबर २०१६ प्रेमाची नेमकी परिभाषा काय? अगदी प्रि-टीन्सचा"फर्स्ट-क्रश" ... मग किशोर-वयीन लाजरं प्रेम ... बऱ्याचदा ते एक-तर्फीचं असतं ... मनातल्या मनात, गोड-आकर्षण ... कारण बोलून दाखवायची हिम्मत, दोन्हीही पार्ट्यांकडे फार क्वचितच ... म्हणून डोळ्यांच्या भाषेची करामत ... त्यानंतर होतं, ऐन तारुण्यातलं प्रेम ... त्यात मुलंच घेतात पुढाकार, सप्रेम ... रूबाबातच विचारतात सर्वांचं क्षेम ... पहिले-पहिले, नुसते "शुभेच्छा संदेश" मुलीनं, लाडिक हसून मान वेळावली ... जणू काही शुभेच्छा ऐकली-न-ऐकली ... मग एखाद-दुसरं सिझनल सुंदरसं फूल ... ते जर का स्वीकारलं गेलं म्हणत "थँक्यू" ...  तर संधी साधून छोटी प्रेमाची भेट-वस्तु ... अशी"हरी-झंडी" जर मिळाली तर, प्रेमाची-गाडी धावू लागते, पटरीवर ... कधी " ब्रेक "लागतो दोन्ही घरांतून ... तर कधी, ही गाडी गाठतेच जंक्शन ... मग संसार सुरु होतो, धूम-धडाक्यात ... प्रेमाचे चौकार, षटकार छान गाजतात ... एकदा"हनिमूनची-अँनिव्हर्सवरी"झ...

कविता 🌷' संकट-मोचन-हनुमान ' तारिख : शनिवार २ डिसेंबर २०२३

कविता 🌷' संकट-मोचन-हनुमान ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : शनिवार २ डिसेंबर २०२३ समय : शाम ७ बजे जो भी बन्दे आते, शरण तुम्हारे सुरक्षा और ज्ञान झोली में हैं पाते || दया के महा-सागर, हे पवन-पुत्र शक्ति-बुध्दी-भक्ती ये जीवनके सूत्र || महासागर लांघें, लंका ढूंढने के लिए महापरबत उठाया जड़ी बूटी के लिए || छोटा हो या बड़ा, राजा हो या रंक भक्तों के शत्रुओं का करे बेड़ा गर्क || संकट-मोचन है सच्चा नाम तिहारा पूरे त्रिभुवन में गूंजता है जयकारा || रामचन्द्र की भक्ती में सदा ही मगन विराट रूप लिये, किया लंका दहन || सूक्ष्म रूप धारण, कर दिया कमाल लंकापति सोचें, क्या है ये गोलमाल || अचंबित लंकावासी देखते रह गए कौन है ये जादूगर, सोचने लग गए || हवाके झोंके जैसा, नज़र ही ना आए काम सब निपटाकर ओझल हो जाए || भक्तों के संकटों को दूर दूर तक भगाएं संकट-मोचन नाम से ही पहचाना जाए || 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆  

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता :🌷' माणूस-नामक-बेट ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : बुधवार, ५ जुलै २०२३ वेळ : दुपारी, ४ वाजून ५० मि. घोडेस्वार घोड्याला पाणवठ्यावर सोडतो, तहान असेल तर घोडा पोटभर पाणी पितो ... अन्यथा घोडा जागेवरुन हलत सुध्दा नाही ... कुणी बळजबरीने  पाणी पाजवू शकत नाही ! सद्गुरू अंतस्थ-गुरुची तोंड ओळख करुन देतो ... शिष्यास तपशील जाणायची ओढ असल्यास, त्या पथावर, पुढे तो अध्यात्मिक प्रगती करतो ... अन्यथा संसार-रुपी-चक्रात गटांगळ्या खातो ! अंतस्थ-गुरुची-भेट म्हणजे जीवा-शिवाची भेट ! आजवर मनी दडलेल्या सुप्त प्रश्नांची उत्तरं थेट ! जन्म-व-मृत्युच्या कचाट्यात, जणू कमळाचे देठ ! लख्खं सूर्य-प्रकाशातील हेच माणूस-नामक-बेट ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷' नतमस्तक '. दिनांक - २ जानेवारी २०२३

कविता - 🌷' नतमस्तक ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले दिनांक - २ जानेवारी २०२३ वेळ - सकाळी ११ वाजून २६ मि. बघता-बघता सरलं की हो जुनं-पानं वर्ष नव आशा-आकांक्षांचं आलं हे नवीन वर्ष ! राग, रुसवे फुगवे सारे गेले घाबरून पळून ... नव्या उमेदीने प्रत्येक क्षण जगूया भरभरुन ... कडू-गोड, चुकलं-माकलं सारं माफ करून, नूतन वर्षा सामोरे जावू झालं-गेलं विसरून ! सरलेलं जुनं वर्ष होतं जणू एक जुनं पुस्तक, संपूर्ण वाचन-मनन केल्यावर गरगरतं मस्तक ... आता हातात पडलंय हे नवं करकरीत पुस्तक ... ३६५ पानांत विजय मिळवून होऊ नत-मस्तक ! ' केल्याने होत आहे रे आधी केले ची पाहिजे ' समर्थांचे हे वचन आचरणात आणले पाहिजे ... कितीही मिळालं तरी आयुष्य तोकडंच वाटतं, "उद्या करु" म्हणंत-म्हणंत आयुष्य सरु शकतं ! " कल करे सो आज कर, आज करे सो अब "  जगूया जीवन  सुंदरसं , विलंब नको पळभर ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷 " एक ऋणानुबंध " तारिख - २० डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " एक ऋणानुबंध " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - २० डिसेंबर २०१६ गौमाता देते जणू तिचं सत्वं, दुग्ध-रूपानं ... त्यात, दैवी-शक्तीचा-अंश " कल्पा "प्रमाणं ... प्रत्येक गाय ही मुलत: असतेच 'कामधेनू'  ... तिच्या सेवेमुळे, पुलकित होती अणु-रेणु ... तिच्या आशिर्वादे सर्व कामनांचा, होतो अंत ... "आत्मशुद्धी" होऊन रूपांतर होते संत-महंत ... वसू-वारस-दिन सोडता, सर्व विसरती गौचे ऋण ... मातृ-पितृ ऋणा-इतकंच, गौचे स्थान महत्व-पूर्ण ... जसं कल्पतरुचं प्रत्येकच अंग-प्रत्यंग उपयोगी, गोमातेची प्रत्येक गोष्ट-न्-गोष्ट महद्-उपयोगी ... दूध-दही-ताक-लोणी-तूप-गोमूत्र आणि शेण ... गाईशिवाय माणसाला  असंभव  जीवन जगणं ... केवळ अशक्यच, गोमातेचं प्रचंड ऋण फेडणं ... आईच्या-तोंडून ऐकलेली, माझ्या लहानपणीची ...  यावेळी गोष्ट आठवतेय्-आमच्या कपिला गाईची ... खूप वर्षांपूर्वी-आमच्या गोठ्यात घराच्या परस-दारी ... कपिला नावाची गाय,  जिची  फार माया परस्परांवरी ... आई स्वतःच कपिलेची संपूर्ण सेवा मनोभावे करी ... कपिला पण न बोलताच प्रेम डोळ्यांतून व्यक्त करी ... कधी कधी तर आईला-हं...

कविता -🌷 " अंतर्-मनीचा हुंकार ". तारिख - शनिवार, २० मे २०१७

कविता -🌷 " अंतर्-मनीचा हुंकार " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - शनिवार, २० मे २०१७   अंतरमनी उमटलेले हे भाव-तरंग ... सहजतेने प्रकट होता, शब्द-ब्रह्म ... साकार होतं एक तरल नाद-ब्रह्म ... सुशांत तनमन, निवांत आसमंत ... कोण हळूवार गातंय्, लयही संथ ... जणू उठतसे उन्मनी आनंद-तरंग ... निळं, निरभ्रं नभ, मोहवतं नयनास... मोहक सुगंध, कुणी भरला सुमनात मन झालं "सु-मन" हर्ष जाई गगनात ... मानसरोवरी-स्वच्छ आरस्पानी जळ   गोड पाण्याचं सर्वोच्च उंचीवरचं तळं  मनसोक्त दर्शनाने,  प्रसन्न मन-कमळ झुळू-झुळू पवन-नभी चांदणं टिपूर ... अद्भुत-दर्शन ते शुभ्र-कैलास-शिखर ... परिक्रमा करताना, उदात्त भाव सुंदर ... प्रणव-नाद जणू अंतर्-मनीचा हुंकार ... संथ लयीमध्ये जणू निनादतोय झंकार ... सप्त-स्वर-अनंत श्रुती-म्हणती ओंकार ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले  🙏🕉️🔆

कविता - 🌷 " प्रकृती बनी राधा " तारिख - रविवार, १२ मार्च २०१७

कविता - 🌷 " प्रकृती बनी राधा "          कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - रविवार, १२ मार्च २०१७ रंगोंकी प्यारीसी बरसात, ये कौन कर रहा है  दिल को यूँ छूं कर, अब ये कौन छिप गया है नजरके सामने तो ये अद्भुत सुंदर नजारा है   मनके झरोंखे से भीतर-ये कौन झाँक रहा है भिनी-भिनीसी सुगंध हवामें-कौन फैला रहा है मेरे मनको न जाने चुपकेसे कौन बहका रहा है यह किसकी आहट मेरे मनमें ऊमंगें ला रही हैं यह किसकी मधुर धुन, मनमें बीन बजा रही है  अनोखा अन्देखा मयूर, पंख पसारे बुला रहा है  मानो मनका कोना-कोना उसीपर फिदा हुआ है बिना डोर, यह किस ओर मैं खिंचीसी जा रही हूँ   यह कैसा अगम्य रूप है, जिसमे बंधी जा रही हूँ  कोई तो बताए, कौन कर रहा है सभी पर यूँ जादू पगलासी गई राधा, साँवरे की चाह में हुई बेकाबू ... राधा हँसी तो फूल खिल गये, फैली  खुशबू  चहू ओर ... महक ऊठी सारी धरती, ऋतु बसंत आयी चितचोर ... घनश्याम दबे पाँव आकर, चुरा लिया हर-मन उसने ... प्रकृती बनी राधा, निखरी सज-धजकर तन-मन से ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷 " कस्तुरी-मृगावाणी " तारिख - शनिवार, १८ मार्च २०१७

कविता - 🌷 " कस्तुरी-मृगावाणी "  कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - शनिवार, १८ मार्च २०१७ सौंदर्य अनेकानेक प्रकारचं असू शकतं ... सृष्टीचं सौंदर्य तर कवी मनाला मोहवतं ... व्यक्ति-सौंदर्यही विविधप्रकारांचं असतं... पाहता क्षणी नजरेत भरणारं, बाह्य-सौंदर्य ... नाकी-डोळी नीटस-सुडौल-बांधा-गौरवर्ण ... रसरशीत, तजेलदार व्यक्तिमत्वाचं सौंदर्य ... तजेलदार, निखळ, नितळ-कांतीचं सौंदर्य ... देशा-गणिक कातडीच्या रंगांचं अप्रूप असतं ... आशियाई लोकांना गोर्या रंगांचं कौतुक असतं ... गोर्या लोकांना," टँन्ड-स्किन-टोन्सची" फार क्रेझ ... आफ्रिकी लोकांना "लाईट-स्किन-टोन्सचं" अप्रूप तसेच सरळ, चमकत्या, लांब केसांचा फार सोस ... जेथे जे मुबलक असतं, त्याला नसतो काही भाव   जे कमी प्रमाणात आढळतं, त्याचा मोठा बडेजाव या सामान्य नियमानुसार, सौंदर्याला मिळतो वाव ... व्यक्तिचं आंतरिक-सौंदर्य फार सूक्ष्म व तरल असतं चित्रकाराचं  एखादं मस्त  चित्र खूप काही सांगून जातं  अथवा त्याच्या कुंचल्यातून साकारलेलं,भन्नाट पेंटिंग कविमनातून उमटलेले अर्थपूर्ण-प्रवाही- उत्स्फूर्त  शब्द गायक-गाय...

कविता - 🌷 " अंगारकीच्या निमित्ताने " तारिख - गुरुवार, १६ फेब्रुवारी २०१७

कविता - 🌷 " अंगारकीच्या निमित्ताने "       कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - गुरुवार, १६ फेब्रुवारी २०१७ प्रत्येक संकष्टीला टिटवाळ्याच्या- गणपती-दर्शनाला  न चुकता जाणारी  तिच्याकडे २००९ सालापासून,  स्वयं-पाकाचं निगुतीने काम करणारी, तिच्या कुटुंबियांची  शारीरिक देखभाल व तब्बेतीची काळजी जपणारी  परिस्थितीने गांजलेली तिची स्वयंपाकीण- अनिता नावाची तरुण स्त्री ... अनिता पहिल्यांदा तिला भेटून   पगार-वेळ-आदी ठरवूनही, तिला कामावर ठेवायला, तिचं मन होत नव्हतं राजी ... ती "हायजीनच्या" बाबतीत भयंकर कडक शिस्तीची ... तशात जेवण बनवण्यासारखी महत्वाची बाब होती ... तिला स्वयंपाक-कलेची आवड बेताचीच- अथ पासून इतिपर्यंत सगळं येत असलं, तरी उत्साह टिकायचा एक दोन पदार्थां पर्यंत- असं असूनही नवीन मुलीला अचानक अनिता येऊन, कामासाठी भेटूनही तिला  स्वयंपाकाला ठेवायला, तिचं मन कचरत होतं ... शेवटी तिने स्पष्ट म्हटलं ,"काटेकोर स्वच्छता  पाळावी लागेल "... स्वच्छता-टापटीप पाळून स्वयंपाक करायला तुला  जमेल ? या सर्व गोष्टी अनिताने कबूल झाल्याव...

कविता -🌷 " उमलता, अंतर्-मनीची कळी " तारिख - शनिवार, २७ मे २०१७

कविता -🌷 " उमलता, अंतर्-मनीची कळी " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - शनिवार, २७ मे २०१७  ही गोष्ट आहे खूप-खूप वर्षां-पूर्वीची, ती गोरेगाव-मुंबईला रहात असतानाची ... मुंबईच्या पावसाळ्याचे ते दिवस होते ... पावसाने चांगलेच मनावर घेतले होते ... सकाळी स्नान करून रोजच्या सवयीने ... सूर्य-दर्शन घेऊन-झाडांना पाणीही द्यावे , तिनं वर पाहिलं तर आलं होतं अंधारून ... काळ्या-ढगांनी आभाळ गेलेलं झाकोळून ... हे पाहून थोडी अंतरमनातून खट्टू होऊन, आकाशाकडे परत पाहिलं, तिनं निरखून ... तिच्या लाडक्या सूर्य-देवाचा नव्हता पत्ता ... प्रकाश-किरणांचा लवलेश सुध्दा नव्हता ... पावसाने द्विधा मनस्थितीत सापडली होती ... ओली झाली होती कुंडीतील झाडं व माती ... शेवटी काहीशा विषण्णं-जड-निराश मनाने, निव्वळ शास्त्र-म्हणून तुळशीला पाणी दिले ... तिने मनोमनच नमस्कार केला डोळे मिटून ... डोळे उघडल्यावर, शत-शत जल-थेंबातून ... झाले तिला, अद्भूत दिव्य असे-सूर्य-दर्शन ... पूर्णतः कृतकृत्य होऊन-दोन्ही-हात जोडून ...  फक्त एकाच सूर्यदेवाची अपेक्षा होती तिला ... जसा आंधळा मागणं मागतो, एकच डोळा ...     प्र...

कविता - 🌷 " मन हिंदोळा "... तारिख - बुधवार, १३ डिसेंबर २०२३

कविता - 🌷 " मन हिंदोळा "... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - बुधवार, १३ डिसेंबर २०२३ वेळ - दुपारी, ३ वाजून १९ मि. कधी कधी मन होई निर्झर ... खळखळ आवाज करीत, वाहे ते झरझर ... कधी मन क्षणिक लपे, पक्षांच्या पंखात ... स्वच्छंदी होऊन विहरे, उंच उंच गगनात ... कधी मन नव-वधू-सम सलज्ज, सुंदर ... तर कधी ते अलिप्त, अचल, जणू दिगंबर ... कधी मन, पांतस्थांसाठी उदार-शांत-औंदुंबर ... तर कधी-कधी स्वार्थ साधून, लोणी खाई बिलंदर ... मन कधी गोमाते-सम दानी, पवित्र, वत्सल ... कधी चिखलात रूतलेले सुरेख, सुंदर, ते कमल ... मन कधी कधी स्मित, निरागस-अल्लड-मधाळ ... तर कधी अमृत-पान करणारे, वासरू लडिवाळ ... कधी कधी मन चंचल चंचल, जणू-होई-भ्रमर ... फुला-फुलांतील मध, शोषून घेई ते भरभर ... कधी कधी मन होई, अशांत-वाचाळ-वाचाळ ... उगाच आकांड-तांडव, करीतसे ते वायफळ ... कधी कधी मन, स्थितप्रज्ञ-धीर-गंभीर ... तर कधी क्षणार्धात निसटून जाई, तोडूनी जंजीर ... कधी कधी मन वज्रा-सम कठीण-कठीण ... तर कधी अकारणच, होई ते मऊ-मखमली-मेण ... मन हिंदोळा ऊंच-च-ऊंच, न थांबे जो पळभर ... कधी असं तर कधी तसं, पर सहज न होई स्थिर ... 🌷@...

कविता- 🌷 " प्रितीची रंगत " तारिख - ३१ जुलै २०१५

कविता- 🌷 " प्रितीची रंगत " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - ३१ जुलै २०१५ वेळ - संध्याकाळी ६ वाजून ९ मि. पावसाचं आणि धरणीचं,  झालं कडाक्याचं भांडण ... हिरमुसलेल्या धरणीचं मग सुरुच झालं रुसणं-फुगणं ... "कधीच नाही भेटणार तुला," तणतणत पाऊस गेला सांगून ... त्यावर धरणी म्हणाली त्याला, "नंतर मुकाट्यानं येशील मागून"...! रागा-रागाने पाऊस आपले, घेऊन गेला ढग "म्हणाला आता जिरवीन, धरेची सगळी रग" ! रागावून बसली धरणी, सुकून गेल्या वृक्ष-वेली... मग तिच्या सौंदर्याची, पार रयाच की हो गेली ..! तिचं असं रूप पाहून, पावसाला आलं भरून ... "काय असतो उपयोग, उगीचच भांडण उकरुन" ..! मनातल्या मनात आतून, धरणी खूप होती झुरंत ... "पावसा, ये ना रे धावंत", मनी याचना होती करंत ...! शेवटी न राहावून, पावसानं मग ढग केले गोळा ... थाऱ्यावर नव्हते चित्त, त्याचा भाव साधाभोळा ...! वाऱ्यावर स्वार होऊन, जलद आला तो तिच्यासाठी बिलगताच धरणीला, लाजून पुरती गंधाळली माती ...! त्याच्या स्पर्शाने चिंब-चिंब, तिचे शहारले सारे अंग ... पुन्हा शोभला धरेवर, तिचा हिरवा-हिरवा-गा...

कविता - 🌷 " एक ऐसे मोडपर " तारिख - शुक्रवार, १९ मे २०१७

कविता - 🌷 " एक ऐसे मोडपर " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - शुक्रवार, १९ मे २०१७  एक ऐसे सुहाने मोडपर, आके आज जिंदगी ... मानो लग रही है बहुत अलगसी-सुहावनीसी,  दिख रही है हर-तरफ हरियाली ही हरियाली  नजर पहुँचें वहां तक खुशहाली ही खुशहाली जहाँ भी जाएं, नजर आए सपनोंभरी दुनिया, हरिभरी खिली धरती, मानो जन्नत की परियां मन-पंछी बनकर गगन में झूमने यूँ लगा है ... बादलोंसे चंदा भी लुकाछुपी खेलने लगा है ... डार-डारपर घोंसलो में पंछी लगे हैं चहकने  मन भँवरा बनके, हर फूल-फूलसे मधु चुराने सूरज की भाँति हर दिल में उजियारा लाकर हर किसी का मन, जीतने चला है वो पागल ... यह मीठी पवन, किसीकी महक संग है लायी  साथ-साथ हैं ये वादियाँ, खामोशी नयी-छायी 🌷@तिलोत्तमा विजय लेले  🙏🕉️🌅

कविता - 🌷 " जाणीव " तारिख - २७ ऑक्टोबर २०१६

कविता - 🌷 " जाणीव " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २७ ऑक्टोबर २०१६ अगदी जन्मल्यापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत ... कशा-ना-कशा मागं माणूस सतत असतो धावत ... म्हणतात ना, "सरड्याची धाव, फक्त कुंपणापर्यंत" ... घबाड जरी मिळालं तरी, हावं नाही संपता संपत ...! जणू जन्मतःच बाळकडू, सगळं गोळा करत जाणं ... पोटातून बाहेर पडून, जगाचा विविध अनुभव घेणं ... अंतर्गत मायाजालाचं ब्रह्मान्ड, बाह्य-जगताचं ऋण ... तेथूनच सुरुवात होते, होणारे संस्कार गोळा करणं ... घट्ट-बंद-मूठ एकदा उघडली की, ती उघडीच राहते ... आयुष्यभर, पोतडीत जमा करणं ही चालूच राहते ... वय वाढत जातं, माया मोह-जाळ्यात पार गुरफटते ... ही"माया" मात्र आईच्या मायेहून फार वेगळी असते ...! यथावकाश विद्यार्थी-दशेबरोबर सुरु होतं ज्ञानार्जन ... मग पोटासाठी-नोकरी-धंद्यासाठी वण-वण करणं ... नंतर परिस्थिती-निर्मित अपमान-टक्के-टोणपे खाणं  सरते शेवटी आपापल्या कुवतीनुरुप धनार्जन करणं ... हे पै-पैसा कमावण्याचं दुष्ट-चक्र एकदा का सुरु झालं, ... की नाही दुसरी-कसली भ्रांत, ना कशाचा कशाला मेळ ... काळ्या पाण्याची सजा-जणू माणस हो...

कविता - 🌷 " परम-पावन करी मना " तारिख - २२ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " परम-पावन करी मना " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २२ डिसेंबर २०१६ शिवबाचे बालपणीचे सखे-सोबती-त्याच्या "स्वराज्य-स्वप्नाचे" साथी ... सर्व "मावळे"जीवाला जीव देणारे-जणू मैत्रीच्या नित-तेवणा-या-वाती ... उजळती लक्ष-लक्ष निष्ठेच्या-ज्योती-अनमोल रत्नं-हिरे-माणिक-मोती ... राजमुकुट जो शिवबाच्या भाळी, शूर-वीरांच्या शौर्याची त्यात झळाळी ... जिजाऊंनी कितीदा पाहिलेलं, शिवबाच्या मनावर बिंबवलेलं ... सुसंस्कारांची शिंपण केलेलं, स्व-राज्याचं सुरेख-सुंदर-स्वप्न ... शिवबाच्या एका इशाऱ्यावर, घेऊन पंच-प्राण तळ-हातावर ... प्रत्येक मावळा शूरवीर गडी, लढण्यास तयार जणू हर-घडी ... जिजाऊंचा इशारा, माघ-वद्य-नवमीला जर"कोंडाणा" सर केला, अत्याचार थांबून-आनंद पसरेल रयतेत, संतोष भवानी-आईला ... तानाजी मालुसरे बाल-सवंगडी-शिवबाचा, लढवैया भरवशाचा ... तानाजीच्या मोठया मुलाची- रायबाची ठरली होती लग्न-घटिका ... समजता जिजाऊंचा मानस, लग्न-सोहळा- त्यानी पुढे ढकलला... निवडक तीस शूरवीरांना हाताशी घेऊन"टेहळणीला"आरंभ केला ... रात्रीच्या गडद अंधारात, उंच फेकून ...