कविता - 🌷 " मन हिंदोळा "... तारिख - बुधवार, १३ डिसेंबर २०२३

कविता - 🌷 " मन हिंदोळा "...
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - बुधवार, १३ डिसेंबर २०२३
वेळ - दुपारी, ३ वाजून १९ मि.

कधी कधी मन होई निर्झर ...
खळखळ आवाज करीत, वाहे ते झरझर ...

कधी मन क्षणिक लपे, पक्षांच्या पंखात ...
स्वच्छंदी होऊन विहरे, उंच उंच गगनात ...

कधी मन नव-वधू-सम सलज्ज, सुंदर ...
तर कधी ते अलिप्त, अचल, जणू दिगंबर ...

कधी मन, पांतस्थांसाठी उदार-शांत-औंदुंबर ...
तर कधी-कधी स्वार्थ साधून, लोणी खाई बिलंदर ...

मन कधी गोमाते-सम दानी, पवित्र, वत्सल ...
कधी चिखलात रूतलेले सुरेख, सुंदर, ते कमल ...

मन कधी कधी स्मित, निरागस-अल्लड-मधाळ ...
तर कधी अमृत-पान करणारे, वासरू लडिवाळ ...

कधी कधी मन चंचल चंचल, जणू-होई-भ्रमर ...
फुला-फुलांतील मध, शोषून घेई ते भरभर ...

कधी कधी मन होई, अशांत-वाचाळ-वाचाळ ...
उगाच आकांड-तांडव, करीतसे ते वायफळ ...

कधी कधी मन, स्थितप्रज्ञ-धीर-गंभीर ...
तर कधी क्षणार्धात निसटून जाई, तोडूनी जंजीर ...

कधी कधी मन वज्रा-सम कठीण-कठीण ...
तर कधी अकारणच, होई ते मऊ-मखमली-मेण ...

मन हिंदोळा ऊंच-च-ऊंच, न थांबे जो पळभर ...
कधी असं तर कधी तसं, पर सहज न होई स्थिर ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
































Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "