कविता - 🌷 " अंगारकीच्या निमित्ताने " तारिख - गुरुवार, १६ फेब्रुवारी २०१७

कविता - 🌷 " अंगारकीच्या निमित्ताने "      
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 
तारिख - गुरुवार, १६ फेब्रुवारी २०१७

प्रत्येक संकष्टीला टिटवाळ्याच्या-गणपती-दर्शनाला न चुकता जाणारी 
तिच्याकडे २००९ सालापासून, स्वयं-पाकाचं निगुतीने काम करणारी,
तिच्या कुटुंबियांची  शारीरिक देखभाल व तब्बेतीची काळजी जपणारी 
परिस्थितीने गांजलेली तिची स्वयंपाकीण-अनिता नावाची तरुण स्त्री ...

अनिता पहिल्यांदा तिला भेटून पगार-वेळ-आदी ठरवूनही,
तिला कामावर ठेवायला, तिचं मन होत नव्हतं राजी ...
ती "हायजीनच्या" बाबतीत भयंकर कडक शिस्तीची ...
तशात जेवण बनवण्यासारखी महत्वाची बाब होती ...

तिला स्वयंपाक-कलेची आवड बेताचीच-अथ पासून इतिपर्यंत सगळं येत असलं,
तरी उत्साह टिकायचा एक दोन पदार्थां पर्यंत-असं असूनही नवीन मुलीला अचानक
अनिता येऊन, कामासाठी भेटूनही तिला स्वयंपाकाला ठेवायला, तिचं मन कचरत होतं ...
शेवटी तिने स्पष्ट म्हटलं ,"काटेकोर स्वच्छता पाळावी लागेल "...
स्वच्छता-टापटीप पाळून स्वयंपाक करायला तुला जमेल ?
या सर्व गोष्टी अनिताने कबूल झाल्यावर हिची नियमावली निघाली ...
सर्वच्या सर्व नखं कापलेली व स्वच्छ हवी-रोज स्वच्छ स्नान जरुरी 
हातपाय धुवून, केस घट्ट-बांधून, किचन-एप्रन घालून कामं सुरु करायची ...
कपाटातून काढलेली भांडी-पातेली नळा-खाली धुवून,मगच वापरायची...
 स्वयंपाक करताना स्वतःच्या तोंडाला,नाकाला,अंगाला,हात लावायचा नाही ...
लावल्यास, साबण-सॅनीटायझरनं, परत एकदा स्वच्छता जपायला हवी ...
खोकला,शिंक येतेय असं वाटताच, धावत दुसऱ्या खोलीत धाव घ्यायची...

बनलेला पदार्थ, कॅसेरोलमध्ये ठेवायचा-फ्रीझला फक्त विचारुन हात लावायचा ...
हे ऐकून अनिताचे डोळे व तोंड दोन्ही उघडेच्या उघडे अन् चेहरा पाहण्यासारखा ...
पण तिला काम हातचं जाऊ द्यायचं नव्हतं, घरच्या परिस्थितीनंही नाडलेली होती,
"ताई, तुम्ही सांगितलेलं नीट लक्षात ठेवूनच मी काम करीन "असं तिला म्हणाली ...
सर्व अटी मान्य झाल्यावरच, अनिताला स्वयंपाक करायला तिने मान्यता दिली ...

सुरवातीस दोघींनाही बरंच जड गेलं ...पण हळूहळू अनिता रुळली कामात,
आज नऊ वर्षे, ती ते काम करतेय ..."तिचा" मूड खुपसा सांभाळून घेतेय
याचं तिला नक्की कौतुक आहेच-आता अनिता, जणू घराचा हिस्सा बनलीय ...
"अनिता शिवाय आईचं पानही हलणार नाही-शंभर टक्के ही शक्यता आहे दाट" ...
तिची मुलं चिडवतात ,"काढावं लागेल परदेशी आईच्या बरोबर अनिताचंही तिकीट" ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🌅


















Comments

Popular posts from this blog

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025

कविता 🌷 " एहसास "

कविता - 🌷 " अनछुआ आसमां "