कविता - 🌷 ' सत्-चिदानंद प्राप्ती ' तारीख - गुरुवार, २८ डिसेंबर २०२३

कविता - 🌷 ' सत्-चिदानंद प्राप्ती '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारीख - गुरुवार, २८ डिसेंबर २०२३
वेळ - दुपारी, २ वाजून ४९ मि.

हे सद्गुरु नाथा, कृपा करा ...
हे दीन-दयाळा, कृपा करा ...
हे नरहरी दत्तात्रेया दिगंबरा 
कृपा करा, झणी कृपा करा ||ध्रु||

जळी-स्थळी, कृष्णाकाठी
दिसे मज सद्-गुरुदेव मूर्ती
दिव्य-प्रकाशे होई, सद्गुरुंची आरती
आशिष देती सर्वा, दिव्य नेत्र-ज्योती 
दयाळा, दिव्य नेत्र-ज्योती ||१||

हे दीनानाथा, कृपा करा
भक्त-जनांवरी कृपा करा
सत्वर मजवरी कृपा करा
कृपा करा, झणी कृपा करा ||२||

अधीर डोळे झाले माझे रात्रंदिन झुरती,
दयाळा, रात्रंदिन झुरती ...
दर्शन घडता सद्-गुरुदेवा,
दर्शन घडता सद्-गुरुदेवा,
सत्-चिदानंद प्राप्ती
दयाळा, सत्-चिदानंद प्राप्ती ||३||

दिगंबरा दिगंबरा
कृपा करा, झणी कृपा करा
कृपा करा, झणी कृपा करा

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


















































Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "