कविता - 🌷 " प्रेमाची विलक्षण पातळी " तारिख २५ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " प्रेमाची विलक्षण पातळी "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख २५ डिसेंबर २०१६

प्रेमाची नेमकी परिभाषा काय?
अगदी प्रि-टीन्सचा"फर्स्ट-क्रश" ...
मग किशोर-वयीन लाजरं प्रेम ...
बऱ्याचदा ते एक-तर्फीचं असतं ...
मनातल्या मनात, गोड-आकर्षण ...

कारण बोलून दाखवायची हिम्मत,
दोन्हीही पार्ट्यांकडे फार क्वचितच ...
म्हणून डोळ्यांच्या भाषेची करामत ...

त्यानंतर होतं, ऐन तारुण्यातलं प्रेम ...
त्यात मुलंच घेतात पुढाकार, सप्रेम ...
रूबाबातच विचारतात सर्वांचं क्षेम ...

पहिले-पहिले, नुसते "शुभेच्छा संदेश"
मुलीनं, लाडिक हसून मान वेळावली ...
जणू काही शुभेच्छा ऐकली-न-ऐकली ...

मग एखाद-दुसरं सिझनल सुंदरसं फूल ...
ते जर का स्वीकारलं गेलं म्हणत "थँक्यू" ... 
तर संधी साधून छोटी प्रेमाची भेट-वस्तु ...

अशी"हरी-झंडी" जर मिळाली तर,
प्रेमाची-गाडी धावू लागते, पटरीवर ...
कधी " ब्रेक "लागतो दोन्ही घरांतून ...
तर कधी, ही गाडी गाठतेच जंक्शन ...

मग संसार सुरु होतो, धूम-धडाक्यात ...
प्रेमाचे चौकार, षटकार छान गाजतात ...

एकदा"हनिमूनची-अँनिव्हर्सवरी"झाली,
की घरात पाळणा हलविण्याची तयारी ...
मुलं-बाळं, बालवाडी, शाळा, कॉलेजादी ...
यांत चांगलेच रमतात, संसारात दोघेही ...

मूकपणे प्रेम, मात्र व्यक्तं होतं वेळो-वेळी ...
मधूनच सुगंधी गजरा बघून, खुलते कळी ...

प्रेम तेच पण परिपक्व होऊन त्याची पातळी,
सूक्ष्म-तरल-अत्युच्च-स्तराची-उंची-गाठलेली ...
विलक्षण-मोहक-जादुभरी अशी असते झाली ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆







































Comments

Popular posts from this blog

कविता - 🌷 " परी या-सम-हा " तारिख - १० डिसेंबर २०१६

कविता 🌷 " एहसास "

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025