कविता - 🌷 " परम-पावन करी मना " तारिख - २२ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " परम-पावन करी मना "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २२ डिसेंबर २०१६

शिवबाचे बालपणीचे सखे-सोबती-त्याच्या "स्वराज्य-स्वप्नाचे" साथी ...
सर्व "मावळे"जीवाला जीव देणारे-जणू मैत्रीच्या नित-तेवणा-या-वाती ...
उजळती लक्ष-लक्ष निष्ठेच्या-ज्योती-अनमोल रत्नं-हिरे-माणिक-मोती ...
राजमुकुट जो शिवबाच्या भाळी, शूर-वीरांच्या शौर्याची त्यात झळाळी ...

जिजाऊंनी कितीदा पाहिलेलं, शिवबाच्या मनावर बिंबवलेलं ...
सुसंस्कारांची शिंपण केलेलं, स्व-राज्याचं सुरेख-सुंदर-स्वप्न ...
शिवबाच्या एका इशाऱ्यावर, घेऊन पंच-प्राण तळ-हातावर ...
प्रत्येक मावळा शूरवीर गडी, लढण्यास तयार जणू हर-घडी ...

जिजाऊंचा इशारा, माघ-वद्य-नवमीला जर"कोंडाणा" सर केला,
अत्याचार थांबून-आनंद पसरेल रयतेत, संतोष भवानी-आईला ...
तानाजी मालुसरे बाल-सवंगडी-शिवबाचा, लढवैया भरवशाचा ...
तानाजीच्या मोठया मुलाची- रायबाची ठरली होती लग्न-घटिका ...
समजता जिजाऊंचा मानस, लग्न-सोहळा- त्यानी पुढे ढकलला...

निवडक तीस शूरवीरांना हाताशी घेऊन"टेहळणीला"आरंभ केला ...
रात्रीच्या गडद अंधारात, उंच फेकून "यशवंती"नामक घोरपडीला ...
पहिल्या फेरीस न चिकटता खाली आली-अपशकुन वाटला त्याला !
पुनः फेकल्यावर काम फत्ते-तानाजी व तीस-मावळे गड चढून गेले ...
योजनेनुसार धुवांधार लढाई झाली-गाफील उदयभानावर केला हल्ला ...
"हर हर महादेव"च्या जयघोषात, संपूर्ण कोंडाणा वीरश्रीनं दुमदुमला ...
अवघ्या तीस-मावळ्यांनी शिर तळहाती घेऊन गनिमांचा काटा काढला...

इतक्यात उदयभान चालून आला, सत्तेच्या हव्यासांनं तो होता गुरफटला ...
तानाजी चार-हिताचे शब्द बोलला-"स्वराज्यासाठी लढ" असं म्हणाला, 
चवताळून, तानाजीवरच घाला केला-घेरून त्या महापराक्रमी शूर-वीराला,
उदयभानानं कपटानं शिरच्छेद केला-वीर तानाजी लढतच धारातिर्थी पडला ...
हे पाहून, घाबरून मावळे-थोडे गोंधळले-पण तानाजीचा भाऊ-सुर्याजीने,
वेळीच चेतविली त्यांची स्वामी-भक्ति, तेव्हा दाखविली त्यांनी संपूर्ण-शक्ती ...
सुर्याजीने ठार केले उदयभानास-जणू मुजरा केला तानाजीच्या पंच-प्राणास ...!
उजाडायच्या आत भगवा झेंडा कोंडाण्यावर फडकला-स्वराज्य-जयघोशात ...!

झुंझार-तानाजीचा पावन-देह घेऊन, भाऊ सुर्याजी आला शिवबा-भेटीला ...
शिवबास मित्र-शोक अनावर झाला,"गड सर झाला,पण माझा सिंह गेला" ...
जीवा-भावाचा बालपणचा मित्र गेला-स्वराज्याचा एक दणकट खांब गेला ...
प्राणपणानं लढून, कोंडाणा मिळवला-मराठे-पत-शाहीचा झेंडा फडकवला ...

लिहिताना महान-वीराची-शौर्य गाथा, साश्रु नयन होती-ओघळती जल धारा ...
सार्थ-अभिमानाने, उंच होई माथा-धन्य ते शौर्य-धन्य ती गौरवशाली वीरगाथा ...
करुनी ऐशा कवना, धन्यता वाटे मना-वाचून-लिहूनही परम-पावन करी मना ...
तानाजी मालुसरे, स्वराज्यासाठी हसत प्राणांची आहुती देणारा दुर्मिळ हिरा ...
त्या अतुलनीय पराक्रमाला कोटी-कोटी प्रणाम करुनी, मानाचा त्रिवार मुजरा !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



























Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "