कविता - बालगीत 🌷 ' जमली जोडी '. तारिख - रविवार, ३१ डिसेंबर २०२३

कविता - बालगीत 🌷 ' मस्त जोडी जमली '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - रविवार, ३१ डिसेंबर २०२३
वेळ - दुपारी ३ वाजून ४० मि.नव

आकाशात, ढग झाले गोळा ...
मुलांना म्हणाले, "या-नाचा-खेळा"...
एकजात सगळी मुलं झाली गोळा ...
त्यांना खूप खूप खूप, आनंद झाला ...

एवढ्यात, वीज लागली चमकायला ...
म्हणाली, "मुलांनो, लागलीच पळा ...
"आता म्हातारी लागलीय् दळायला" ...
"म्हणून गाशा गुंडाळा अन् घरी पळा" ...

"शिवाय पाऊस घातलाय् यायला ...
"धो-धो कोसळून, चिंब भिजवायला"
"पावसात भिजून सर्दी-पडसं-होईल"
"त्यामुळेच कदाचित शिक्षाही होईल"...

वीजेच्या आवाजाने, मुलं घाबरली ...
गाल फुगवून, मग घरातच बसली ...
आजी म्हणाली, "चला रे चला", 
पहिल्या पावसात, मस्त भिजायला" ...

हे ऐकून अर्जुनची, खुलली कळी ...
पावसात भिजायला, मज्जाच आली ...
चिंब चिंब भिजायची, गंमतच न्यारी ...
अर्जुन-आजीची, मस्त जोडी जमली ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆







































































Comments

Popular posts from this blog

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025

कविता 🌷 " एहसास "

कविता - 🌷 " अनछुआ आसमां "