Posts

Showing posts from February, 2024

कविता - 🌷 "वाल्मिकी-रामायण,माणसांतर्गत" तारिख - रविवार २२ जानेवारी २०१७

कविता - 🌷 "वाल्मिकी-रामायण,माणसांतर्गत" कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख -  रविवार २२ जानेवारी २०१७ नुसतं राम- राम म्हटल्याने पापांचे डोंगर नष्ट होतात ... पाप केलं मनानं, शरीरानं, हातांनी वा विचारांनी ... कसंही केलं तरी ते जमा होतंच जातं, अंतर्यामी ... वाल्या-कोळ्यानी केली पापं, पोटा-पाण्यासाठी ... माणूस करतो, कुटुंबासाठी-प्रेमापोटी-मजेसाठी ... पापांची वारूळंच्या-वारूळं उभी करतो, अंतरी ... जेव्हा-केव्हा त्याचे अंत:चक्षू उघडतात, उपरती होते आणि तीच असते सुरवात ... सर्व-प्रथम तर कोणी " राम राम" म्हणायला, मनं-बुद्धी अन् जीभही नसते तयार वळायला ... अर्थात " वाम-मार्ग " सोडणं, सोपं नसतंच ... अट्टाहासाने जरी "मरा-मरा" असं विपरीतच, "राम-नाम" घेऊन, वाल्याप्रमाणे नाम-जपलं ... तेच सन्मार्गावरचं पहिलं पाऊल, होऊ शकतं ... मग हळूहळू सुरु होतं, पापांच्या राशींचं वितळंणं, तळमळ पारखून विधाता करतो पुढील मार्ग-दर्शन ... अंतर्स्थित गुरु करतो "प्रत्येक-वाल्याचं" रूपांतरण ... जन्म होतो, एका प्रगल्भ-बुद्धीच्या वाल्मिकी-ऋषींचा ... पूर्ण रूपांतरीत...

कविता - 🌷 " मातृ-भाषेचे ऋण " तारिख - सोमवार, २४ जून २०१७

कविता - 🌷 " मातृ-भाषेचे ऋण "  कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - सोमवार, २४ जून २०१७  मातृ-भाषेचे ते प्रचंड शब्द-वैभव अनुभवुनी, मराठी-ऊर अभिमानाने अक्षरशः येतो भरुनी... प्रत्येक मराठी-मनाचा हर्ष सदा दुथडी भरुनी... मातृभाषेवरील प्रेमाने- जाई पुरताच ओसंडूनी... असे असूनही, इंग्रजाळलेल्या पिढीची अशुध्द-धेडगुजरी बोली... ऐकता, नेमकी ही भाषा कोणती-दाट शंका येई... माय-मराठीची ती भ्रष्ट-स्वरुपातील बोली ऐकूनी,  प्रत्येक स्वाभिमानी काळजाचं होई,"पाणी-पाणी" ... फॅशन म्हणून चार-चौघात, भाषेची बूज न राखी... ही मराठी-जन-मानसाची व्यथाच-बोचरी-दुखरी... तोडके-मोडके चुकीचे इंग्रजी बोलून धन्य वाटणे... उसन्या कुबड्या घेत, काय जीणे ते लाजिर-वाणे...! जगभरात या लोकांचे जेव्हा होत्याचे नव्हते होते, तेंव्हा मात्र अशा लोकांच्या "तोंडचे पाणीच पळते"...! मराठी शिकून-बोलून तयार होतील लखलखते हिरे... स्वच्छ-सुस्पष्ट-उच्चार, वाणीवर होती संस्कार गहिरे... मायबोलीचा यथार्थ सन्मान करण्याचे होता सुसंस्कार, खात्रीने सर्व बाल-मनांना देतील सुंदर-सुयोग्य-आकार ! म्हणूनच अत्यावश्यक, मातृभाषा-माध्य...

कविता : 🌷 ' खरं धन ' तारिख : शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४

कविता : 🌷 ' खरं धन ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४ वेळ : ५ वाजून २२ मि. मनुष्य-जीवन किती क्षुल्लक-क्षणभंगुर ... एका बाजूला चालतं-बोलतं-सजीव तर, दुसऱ्या क्षणी नडतो, मृत्युचा घाला-क्रूर ... माहित नसतं काय घडणार, भविष्यात ? काय काय वाढून ठेवले आहे, नशिबात ... स्वतःच्या गुर्मीत बेधुंद जगतो वर्तमानात ... जन्म झाल्यापासूनच दर क्षणा-क्षणाला ... हसत-हसत जवळ घेत असतो मरणाला ... अज्ञानामुळे उपभोगू शकतो, तो सुखाला ... विश्वाच्या अवाढव्य पसार्यातील एक जीव ... ज्याच्या अज्ञानावर, विधात्याला येते कींव ... क्षणार्धात करु शकतो निर्जीवास, सजीव ... सुखांध होत, गोळा करत सुटतो मालमत्ता ... अखेरीस काय नेमकं न्हेणार, नसतो पत्ता ... आजतागायत मृत्युवर नसे कोणाची सत्ता ... जन्मा येता, मोजक्याच श्वासांची शिदोरी ... बंद मुठीत घट्ट धरलेली, आयुष्याची दोरी ... स्वेच्छेने रंगवण्यासाठी, जीवन-वही कोरी ... धडधाकट शरीरयष्टी अन् संवेदनशील मन ... ईश्वरीय वरद-हस्ताने लाभलेलं, हे खरं धन ... सत्कर्म-सत्कार्य-परोपकारात रमावं तनमन ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता : 🌷 " जाळे " बुधवार, तारिख : २२ फेब्रुवारी २०२४

कविता : 🌷 " जाळे " कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : २२ फेब्रुवारी २०२४ वेळ : १२ वाजून १० मि. जगाची रीत उफराटी प्रेम-गंगा वाहते उलटी  आई-बाप जीव सांडती माया सांडिली वाळवंटी एकतर्फी कारभार सारा हकनाक वाढला पसारा मामला आतल्या आतच रक्तबंबाळ करी जीवास नाठाळाचे नादी न लागणे कर्तव्यास कधी न चुकणे ज्याच्या त्याच्या नशीबाने बरे-वाईट होणे, न टळणे  जे जे होईल, ते ते पहावे कशातच अधिक न गुंतावे अळवापरि अलिप्त रहावे चिखलाकडे दुर्लक्ष करावे  गरजेनुसार छाटून टाकावे जे जहरी ते पूर्ण नष्ट करावे  जागोजागी मोहाचे वेटोळे सतर्क नसता, करी वाटोळे पापी-दुष्ट-जनास टाळावे मति-भ्रष्टास, माफ करावे  राग-लोभास स्थान न द्यावे  सदैव नाम-स्मरणात रमावे 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता : 🌷 " न भूतो न भविष्यति " तारिख : १९ फेब्रुवारी २०२३

कविता : 🌷 " न भूतो न भविष्यति " कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : १९ फेब्रुवारी २०२३ वेळ : ११ वाजून १८ मि. त्याकाळी मुघल शासकांच्या जाचाखाली रयतेची पार गेली होती रया अत्याचारांच्या भीतीने त्यामुळे घराबाहेर पडतच नव्हत्या आयाबाया ! घालीत रात्रं-दिवस देवाला साकडं, "आता ये आणि कर बाप्पा दया" १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर आनंदोत्सवाची झाली आतिशबाजी ! देवी शिवाईच्या कृपेनं पुत्र-रत्न-झालं म्हणून पुत्राचं नाव ठेवलं शिवाजी ! जिजाऊंनी बालवयातच शिवरायांवर सुसंस्कार करुन खरी मारली बाजी ... दादोजी कोंडदेवांनी युद्ध-कला, घोडेस्वारी, राजकारणात केलं तरबेज गुरु समर्थांनी स्वधर्म, मनोबल अन् गनिमी काव्याचे शिकविले डावपेच ! जिजाऊंनी आदेश दिला कर्तव्य-पालन करुन अन्याय करणार्यांना ठेच! लुटूपुटूच्या खेळात बाल-शिवाजी मावळ्यांचा नेता बनून किल्ला करी सर पुढे प्रत्यक्षात दर्याखोर्यात शर्थीने लढून कित्येक किल्ले केले, त्यांनीच सर  म्हणतात, "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" ते अगदी शंभर टक्के खरं !  'तोरणा' किल्ला जिंकून मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ भक्कमपणे रोवली ...  धर्मा...

कविता - 🌷 " अनमोल ग्रंथराज " तारिख - सोमवार १९ फेब्रुवारी २०२४

कविता - 🌷 " अनमोल ग्रंथराज " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - सोमवार १९ फेब्रुवारी २०२४ वेळ - दुपारी, ४ वाजून ४१ मि. शिवथरघळीला निबीड वनामध्ये, माघ शुद्ध नवमीला ... १७ व्या शतकात, श्रीसमर्थांनी दासबोध ग्रंथ लिहीला ... मानवी-जीवनाविषयी त्यांचा सखोल-परिपूर्ण अभ्यास ज्ञानी-सशक्त-समाज घडविणे-हाच होता एकमेव ध्यास ... रामदास स्वामींनी केली भक्तिमार्गाने-शक्तिची उपासना  त्यांचा ठाम विश्वास, उपासनेतून सामर्थ्याची जोपासना ... त्यांनी-संपूर्ण देशभरात कैक-ठिकाणी केले मठ-स्थापन ... मारुतीरायाच्या-शक्ति-उपासनेतून जन-मानसाचं संघटन ... आजही कालातीत अशी 'समर्थ-शिकवण', तंतोतंत लागू ... उमगते वैयक्तिक-सामाजिक-प्रश्नांवर कसा ठेवावा काबू ... या ग्रंथात नानाविध गोष्टींचा समावेश व मुद्देसूद उहापोह ... स्वास्थ्यपूर्णतेस जरुरी, नष्ट करणे-काम-क्रोध-लोभ-मोह ... मोजक्याच-शब्दात व्यक्त केला सडेतोड-अचूक युक्तिवाद ... ना शब्दांचं अवडंबर-ना वितंडवाद,त्यात निव्वळ बुद्धिवाद ... आरोग्याचा कानमंत्र लहान-थोर, स्त्री-पुरुष, सर्व सुजाण ... मानवी मनास-ज्ञानेंद्रियांना उपयुक्त-हे उपदेशपर लिखाण ... स...

कविता - 🌷" मनोमनी मोगरा दरवळला " तारिख - ८ नोव्हेंबर २०१६

कविता - 🌷" मनोमनी मोगरा दरवळला " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख -८ नोव्हेंबर २०१६ साथीला, असं कोणी जे हवंहवंसं वाटतं  ... अन टिपूर चांदणं असावं,वर आभाळात ... थेट स्पर्शी,थंडगार गुळगुळीत रेत पायाला अन ओझरताच स्पर्श,हो अचानक हाताला ... गुद-गुल्या हो पायाला अन मनाला ... सरकणाऱ्या मऊ रेतीमुळे पायाला ... अन हलक्या हस्त- स्पर्शानं मनाला ... बीजलीचा " करंट "जणू काही लागला ... झर्रकन स्पर्शून,गेला की हो तनं-मंनाला ... वेळ जणू दौडे,सशाच्या गतीनं  न कळे दोघा,कधी गेला पळूनं ... घड्यालाचे काटे,थोडे थांबणार चुकून ... दोघेही होती प्रसन्न,चांदण्यात फिरून ... रजनीचा प्रहर,शितल,मंद-पवन ... दोन आतूर जीव,अंधुकसं बंधन ... मनी भाव-अधीर,करण्या समर्पण, निरव शांतता,आवाज फक्तं चांदण्यांचे ... मूक दोघे असूनही,बोलके भाव मनीचे ... चांद-रातीला,संगे तारा-तारका असता,साक्षीला ... नभी चंद्राचा,जादुभरा मंद-धुंदसा प्रकाश पडला  त्याच पिवळंसर उजेडात, ती दोघे  अवतार जणू,देखण्या रती-मदनाचे ... द्वाड वारा तिच्या पदराशी खेळे, मधेच त्यास, वारा पदरात गुरफटे... तिचे भुरुभुरु उडणारे केस सोडवतो त्यां हळू...

कविता - 🌷 ' दुसरं मागणं नसे ईश्वरापाशी ' तारिख - २८ सप्टेंबर २०१६

कविता - 🌷 "दुसरं मागणं नसे ईश्वरापाशी" कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २८ सप्टेंबर २०१६ सळसळणारं हे नव-तारुण्य ... जणू बहरुन आलं नवं-लावण्य ... स्वर्गच भासे मज घन-अरण्य ... सारी सुखं उभी, कांही नसे नगण्य ... फुलां-परि सारं-कांही ताज-टवटवीत वाटतंय ... झुळुकीच्या झोक्यावर आज डोलावंसं वाटतंय ... इवल्याशा दव-बिंदूलाही खूप-खूप जपायचंय ... मन-मोहक भ्रमराला गुंगवायंचंय-गुंतवायचंय ... गुण-गुण गुंजारवाच्या तालावर, प्रसन्नतेची हलकीच उठतेय् लहर ... तन-मन धुंद-फुंद होऊन उमलतंय ... मज कळीचं जणू रूपांतरण होतंय ... सुरेख रंगीबिरंगी सुमना-समान वदन ... चहू-दिशानी आनंदी-आनंद ओसंडून ... वाहतोय मंद-सुगन्ध फुलां-फुलांमधून ... अवघी धरणी-माय तेजाळली तृप्तीतून ... का गोड गुलाबी-लाज उतरे अशी गाली ? ... जणू रविस भेटण्या संध्या सजली-धजली ... कुणी बरं लावली ओठांस आज ही लाली ... सजले-नटलेे आज मी-लेवून कुंकुम भाळी ... प्रत्येक श्वास झाला आहे सुगंधी ... रात्रीच्या प्रहराची अजुनही धुंदी ... क्षण-न-क्षण मन झालंय आनंदी ... जीवनी, नव-पर्वाची ही तर नांदी ... वाटे हा सुवर्ण-काळ, संपूच नये कधी ... सृष्टी ...

कविता - बालगीत - 🌷 ' खारूताई ' तारिख - गुरुवार, ८ फेब्रुवारी २०२४

कविता - बालगीत - 🌷 ' खारूताई ' कवयित्री -तिलोत्तमा विजय लेले तारिख - ८ फेब्रुवारी २०२४ वेळ - संध्याकाळी ६ वाजून ०९ मि. खारूताई ओ खारूताई, कशा आहात तुम्ही ? झुपकेदार शेपटी घेऊन, कुठे निघाल्या तुम्ही ? सर-सर झाडावर चढता ... तुरूतुरू लगबगीने जाता ... घाबरुन सगळीकडे बघता ... धारदार दातांनी कुरतडता ... खारूताई ओ खारूताई, काय काय खाता तुम्ही ? दिवसभर चरत बसता, सांगा, कसं पचवता तुम्ही ? खारूताई ओ खारूताई, काय तुमच्या पाठीवरती ? डिझाईन हे चट्टेरी-पट्टेरी, सांगा, काढले तरी कुणी ? इवलुशा हाती दगड अन् माती, उचलून खारूताई पुलावर टाकी प्रत्यक्ष देवालाही मदत केली ... 'खारीचा वाटा'म्हणून नोंद झाली ! देवाने उचलून पाठ थोपटली ... पाठीवर रामाची बोटं उमटली ... तुमचे योगदान अजरामर झाले, अन् पाठीवर मायेचे पट्टे उमटले ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷 " ज्ञान-अमृत " तारिख - बुधवार १४ फेब्रुवारी २०२४

कविता - 🌷 " ज्ञान-अमृत " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - बुधवार १४ फेब्रुवारी २०२४ वेळ - दुपारी, २ वाजून १९ मि. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी ... वसंत-पंचमी ऋतुराजासाठी ... वीणा-वादिनी, देवी सरस्वती ... संगीत-वाणी-कला-बुद्धिदाती ! शिक्षण आणि ज्ञानाची देवता ... शुभ्र-वसना-श्रीसरस्वती माता ... कोणत्याही कार्यामध्ये सफलता, सखोल ज्ञानाचीच आवश्यकता ... श्रीसरस्वती मातेचे शुभाशिर्वाद, ज्ञानार्जनास जरुरीचे-निर्विवाद ... सरस्वती-देवीच्या कृपा-प्रसादे, ज्ञानार्जन निर्विघ्नपणे पूर्ण होते ... माणूस हा, आजन्म विद्यार्थी ... देवी-पूजेत भाव हवा निस्वार्थी ... मनोभावे पूर्ण-आराधना देवीची ... प्रसन्न होत देवी-ज्ञान-अमृत देई  ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले  🙏🕉️🔆

कविता - 🌷 " तर काय बहार येईल " तारिख - २४ नोव्हेंबर २०१६

कविता - 🌷 " तर काय बहार येईल " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २४ नोव्हेंबर २०१६ तर काय बहार येईल ... चुटकीमधे, काही वर्षे मागं जाऊन, काल-यंत्राचा योग्यसा वापर करून,  अविस्मरणीय तेे क्षण, परत जर जगू शकलो, तर काय बहार येईल ... काही गोष्टी, ज्या हुकल्याच होत्या, पुनःआत्मसात करता आल्या त्या ... तर काय बहार येईल ... जुन्याच,कोऱ्या-पाटीवर जर पुन्हा, नव्यानं गीरवता येईल, श्री- गणेशा ... तर काय बहार येईल ... आपल्या- परक्यातला फरक जर, नीट समजून घेता आला, अन् अंमलात आणता आला, तर काय बहार येईल ... हिरा आणि गारगोटी मधून, अनमोल हिरा जर गवसला, अन् तो सांभाळताही आला, तर काय बहार येईल ... काड्या- काड्या जमवून, अपार मेहनत कर-करून, बनवलेल्या घरट्याला जर, घर-पण परत देता येईल, तर काय बहार येईल ... छोटया गोडशा पिल्लांना, उबदार कुशीत कवटाळून, गुंगवून, गुंतवून ठेवता येईल, तर काय बहार येईल ... आयुष्याच्या सोन-सकाळी, हुशार पाखरांसम उंच भरारी, जर आभाळात झोकून देऊन सहजा - सहजी घेता येईल, तर पुनः-पुनः बहार येईल ... पुनः पुनः बहार येत राहील ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷 " दिव्य-प्रकाशाचा मागोवा " तारिख - शनिवार, २५ मार्च २०१७

कविता - 🌷 " दिव्य-प्रकाशाचा मागोवा "  कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - शनिवार, २५ मार्च २०१७ दुसर्याही पत्नीच्या आकस्मित निधनामुळं, आमचे आजोबा पार हतबल झाले त्यामुळं, मानसिक धक्क्याने मनस्थिती होती दुर्बल ... त्यात घरच्या स्त्रीवर्गानी जणू चंगच बांधला वधू-संशोधनाच्या कार्यात पुढाकारच घेतला शेवटी त्यांच्या धोशामुळे त्यांनी होकार दिला  आजोबांनी पुन्हा लग्न करण्यास संमती दिली  शांताची नव्यानं घरी आलेली-सावत्र-आईही, आधीच्या आईचीच जणू नवीन आवृत्ती होती ... ती येता शांताच्या आयुष्यात खळबळ उडाली  शांताची शाळा तर फार पूर्वीच बंद केली होती, तिच्या तीन भावंडांची व सगळ्या घरकामाची, संपूर्ण जबाबदारी, एकट्या चिमुरड्या शांताची ... आता शांता रात्रंदिन कामात जुंपली गेली होती  त्यात भरीस भर वाढीव कामाची जबाबदारी, सतत टोचून बोलणारी नवी सावत्र-आई होती दैव-गति असं समजून, सर्व सहन करीत होती पण त्याचबरोबर स्वयं श्रीगणेशा शिकत होती ! शांताची शाळा बंद पण भावंडांची शाळा अखंड  हा कोणता न्याय, त्या भाबड्या जीवाला न कळे  शांता तीक्ष्ण बुद्धिची, नुसते ऐकून सर्व ज्ञान...

कवितेचं नाव- 🌷 " कैवारी " तारिख - मंगळवार ३१ जानेवारी २०१७

कवितेचं नाव- 🌷 " कैवारी " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - मंगळवार ३१ जानेवारी २०१७ श्री गणपती बाप्पा मोरया, हे बुद्धीचं दैवत ... त्या गणाधीश गजाननाचा जो जन्म-दिवस ... माघी विनायकी चतुर्थी, एक-खास-दिवस ... शक्ति जरी कितीही असली, अत्यावश्यक ... शक्तिपेक्षा युक्तीच सदा कामी येते फटाफट ... महिमा तुझा गाती सर्व-तू आहेस सुख-कारक ... तुझ्या कृपेंने सुरळीत  जीवन,  होई लाभदायक ... वास्तविक, मनाने आहे मुक्काम पोस्ट,अष्टी ... देह-रूपानं आज, जरी मुंबईतच असले तरी ... अंतर्यामी सूक्ष्म-रुपे, जन्मोत्सवात सहभागी ... भजन-किर्तनी रंगून, विसरून सगळ्या गोष्टी ... गणराज, मोरया, सिद्धिवरदाता तू मंगलमूर्ती ... तू देतो आम्हां सदा-सर्वदा सद्कार्याची स्फूर्ती ... तुझ्या पूजने विनाश, सर्व दुःख-दायी कष्टांचा ... अत्यानंदाचा मूळ-स्रोत तू, असशी रे गणराया ... अवघ्या जगताचा भार असे, तुझिया खांद्यावरी ... शुभानना, युक्तिवादाने  लीलया  तू नित्य सावरी ... सुशांत-बुद्धिवंत-गंभीर तू, सकल-जन-कैवारी ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले  🙏🌅🕉🌷🙏

कविता - भक्तिगीत - 🌷 ' मोरया ' तारिख - मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

कविता - भक्तिगीत - 🌷 ' मोरया ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - मंगळवार, १३ फेब्रुवारी २०२४ वेळ - दुपारी, ४ वाजून ०२ मि. गजवदना-मोरया तू मूर्तिमंत बुध्दी-मत्ता ... तुझ्यापुढे ना कधी, चाले कोणाची सत्ता ... या जगी कोणीही न राहो दुःखी वा कष्टी ... कारण आज तर आहे, श्री गणेश चतुर्थी ... त्रास-दुःख, राग-लोभ, रोगराई-कलहादी ... भवताप निवारण करी श्री गणेश-जयंती ... निर्मळ अंत:करणे त्याची घेता शरणा-गती, जीवनी येई विकास-समाधान-सुखसमृध्दी ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - भावगीत 🌷 ' भ्रम आणि सत्य-स्थिती ' तारिख - शनिवार, १० फेब्रुवारी २०२४

कविता -🌷 ' भ्रम आणि वस्तुस्थिती ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - शनिवार, १० फेब्रुवारी २०२४ वेळ - दुपारी ४ वाजून २८ मि. खूपदा माणसाच्या डोक्यात वेगळी हवा शिरते, ... वाटते, "पान हलत नाही आपल्यावीण कुणाचे"... प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती फारच निराळी असते ... भ्रामक-कल्पनांच्या विश्वात-भ्रष्ट मति गुंग असते ... कुणीही आहे म्हणून किंवा कुणी नाही म्हणूनही, विश्वातील कोणाचं, कधीही काहीच अडत नाही ... चंद्र-सूर्य-वृक्ष-वेली-फुलं-पानं-सृष्टीचे ऋतु-चक्र ... चोखपणे पाळती निसर्गाने आखलेले वेळापत्रक ! अडत नाही आई-विना, पोरा-बाळांचं सुध्दा काही ... प्रेमळ कुणी नंद-यशोदा अत्यंत मायेने सांभाळती ... पत्नी नाही म्हणून विधुराचंही कांहीच नाही अडत ... शुभ-कार्यी कनवटीला सुपारी लावून काम भागतं ... पति‌वीण विधवा स्त्रीचंही तसं फारसं अडत नाही ... ओटीत श्रीफळ ठेऊन साधू शकते ती कार्यसिद्धी ... असे असूनही, वात्सल्य-प्रेमभावच प्रभावी ठरतात ... एक-एकटे पति-पत्नी, कर्तव्य निभावंतंच जगतात ... पत्नीच्या पश्चात मुलांचे आई-व-बाप दोन्ही होतात ... आईची उणीव लेकरांना, अजिबात भासू न देतात ... पति...

कविता - भक्तिगीत 🌷 ' पुण्य-योग ' तारिख - शनिवार, १० फेब्रुवारी २०२४

कविता - भक्तिगीत 🌷 ' पुण्य-योग ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - शनिवार, १० फेब्रुवारी २०२४ वेळ - दुपारी ४ वाजून २८ मि. श्री तिरुपती-बालाजींच्या-दर्शनाचा योग, जेव्हा येतो जुळून, तोच खरा पुण्य-योग ... जस-जसे पुण्य गाठीशी जमा होत जाते, तस-तशा सर्व गोष्टी जमून येणे सुरु होते ... तत्पूर्वी मनात वाटते एक अनामिक हुरहूर ... भगवंताच्या भेटीची आसही लागते पूरेपूर ... घरातील नास्तिक व्यक्तीस जणू देऊन हूल ... तीर्थक्षेत्र-यात्रा-सहलीची, अंधुकशी चाहूल ! नाही नाही म्हणता-जाण्याचे वेध लागतात ... सामानाची बांधाबांध-चर्चासत्र-सुरु होतात ... नास्तिक-व्यक्तिचा विरोधं थोडा कमी होतो ... इतकंच नव्हे, तो यात्रेच्या तयारीला लागतो ! कल्पनातीत-अशक्यप्राय गोष्टी, जमून-येतात ... बहुधा याला, ईश्वर-भेटीचं-आमंत्रण-म्हणतात ... एकूणच उत्साह नुसता ओसंडून वाहू लागतो ... कदाचित् भेटीचा हाच ईश्वरीय-संकेत असतो ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - भक्ति-गीत 🌷 ' हाताळणी ' तारिख - गुरुवार, ८ फेब्रुवारी २०२४

कविता - भक्ति-गीत 🌷 ' हाताळणी ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - गुरुवार, ८ फेब्रुवारी २०२४ वेळ - दुपारी १२ वाजून ४९ मि. शत-शत-रंगात, रंगले हेरंब श्रीगजानन त्यां दर्शन-मात्रे, निज चित्त झाले पावन ... सुखाच्या मृगजळापाठी मन होई मलीन नाम-स्मरणाच्या-घोषात होतसे तल्लीन ... दु:खाच्या सावटाने, तन-मन होते खिन्न सत्कर्म-सत्कार्य करुन, होतसे ते प्रसन्न ... नानाविध सूक्ष्म रूपांत, तो परिक्षा घेतो विविध स्तरांवर, तो पारखून घेत असतो ... नारळ जसा वाजवून तपासून घेती कसून दुष्काळ-पूर-रोगादी- विपदांनी भेडसावून ... विपरीत स्थितीत शांत राहण्याची कसोटी  कठीण समस्येवर मात करण्याची हातोटी ... सर्व गोष्टींची साक्षी-भावाने अशी हाताळणी ही भक्ताची ईश्वरीय-तत्वांशी हात-मिळवणी ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - बालगीत 🌷 ' जादूचे बुडबुडे ' तारिख - सोमवार, ५ फेब्रुवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' जादूचे बुडबुडे ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - सोमवार, ५ फेब्रुवारी २०२४ वेळ - १० वाजून ०५ मि. सप्तरंगी चमचमणारे बुडबुडे फुंकर मारताच हवेत उडणारे ... गोबर्या गाली आनंदाचे फवारे टाळ्या वाजवीती हात गोरे गोरे ... क्षणार्धात सर्वत्र भिरभिरणारे गोल-रंगी-बेरंगी लकलकणारे ... नाजुक जसे की काचेची झुंबरे  हलक्याशा स्पर्शानेही फुटणारे ... झटपट बनतात-जादूही करतात  त्यांना पकडायला सारे धावतात जादू संपल्यावर, झटपट विरतात  असे बुडबुडे अर्जुनला आवडतात ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆  

Poem : 🌷 ' Center ' Date : Sunday 4 February 2024

Poem : 🌷 ' Center ' Poetess : Tilottama Vijay Lele Date : Sunday 4 February 2024 Time : 3. 49 PM U are the center of my tiny world so baby don't enter the mine of gold Baby U can spread sweet message of love But don't let it fade The world needs our love My world rotates with U Love makes the sky blue World's lovely n New Whenever am with U 🌷@Tilottama Vijay Lele 🙏🕉️🔆

Poem - 🌷' Love is in the air '

Poem - 🌷 ' Love is in the air ' Poetess - Tilottama Vijay Lele Date - Saturday, 3 February 2024 Time - 7.25 PM U are the light  of my eyes U are the heart  That's so nice I'm waiting for U  Since ages U are the soul That's so wise Love is like a flower Needs lots of care U are the best color Love is still in the air  🌷@Tilottama Vijay Lele 🙏🕉️🔆

Poem - 🌷 ' Sorted ‘ Date - 17 September 2020

Poem - 🌷 ' Sorted ‘ Date - 17 September 2020 Poetry by Tilottama Vijay Lele When opened my eyes after birth, Found happy faces of Mom n Dad, Very first thought in my mind said, Now onwards, this life is sorted ! Years later, went to kindergarten And met lovely teachers n friends Enjoyed many activities n had fun Thought my childhood is sorted ! Years after, went to high-school And there boy-o-boy ! Had some real fun n joy Thought my teenage is sorted ! Years later met my soulmate In a great hurry, got wedded ! Had a blissful n beautiful life, Thought my family-life is sorted ! Family expanded in few years Became mother of two sons ! Thought my family is complete And my old age will be sorted ! Days, months n years flew Like a magic, One never knew ! Sons grew into handsome men Thought I am fulfilled n blessed! Now is the real test of time To learn new lessons of life ! No one needs me anymore, They are busy with their lives ! It’s the thought that deceived me, Nothing gets sorted ...

Poem - 🌷 ' Clouds don't lie ' Date - Friday, 2 February 2024

Poem - 🌷 ' Clouds don't lie ' Poetess - Tilottama Vijay Lele Date - Friday, 2 February 2024 Time - 12. 41 AM  There are always clouds in the sky Happy ones are blue, I don't know why When I'm sad, clouds become grey Shining 🌟 Sun cheers me up in his own way Clouds gather when Moon comes to play Stars become brighter n dark clouds fade away  When you go far away saying Goodbye Mind makes them darkest bcoz clouds don't lie  🌷@Tilottama Vijay Lele 🙏🕉️🔆