कविता : 🌷 " न भूतो न भविष्यति " तारिख : १९ फेब्रुवारी २०२३

कविता : 🌷 " न भूतो न भविष्यति "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : १९ फेब्रुवारी २०२३
वेळ : ११ वाजून १८ मि.

त्याकाळी मुघल शासकांच्या जाचाखाली रयतेची पार गेली होती रया
अत्याचारांच्या भीतीने त्यामुळे घराबाहेर पडतच नव्हत्या आयाबाया !
घालीत रात्रं-दिवस देवाला साकडं, "आता ये आणि कर बाप्पा दया"

१६३० साली शिवनेरी किल्ल्यावर आनंदोत्सवाची झाली आतिशबाजी !
देवी शिवाईच्या कृपेनं पुत्र-रत्न-झालं म्हणून पुत्राचं नाव ठेवलं शिवाजी !
जिजाऊंनी बालवयातच शिवरायांवर सुसंस्कार करुन खरी मारली बाजी ...

दादोजी कोंडदेवांनी युद्ध-कला, घोडेस्वारी, राजकारणात केलं तरबेज
गुरु समर्थांनी स्वधर्म, मनोबल अन् गनिमी काव्याचे शिकविले डावपेच !
जिजाऊंनी आदेश दिला कर्तव्य-पालन करुन अन्याय करणार्यांना ठेच!

लुटूपुटूच्या खेळात बाल-शिवाजी मावळ्यांचा नेता बनून किल्ला करी सर
पुढे प्रत्यक्षात दर्याखोर्यात शर्थीने लढून कित्येक किल्ले केले, त्यांनीच सर 
म्हणतात, "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" ते अगदी शंभर टक्के खरं !

 'तोरणा' किल्ला जिंकून मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ भक्कमपणे रोवली ...
 धर्मांध मुघल शासकांच्या अघोरी अन्यायांतून आम-जनतेची सुटका केली ...
 प्रसंगी निडरपणे सामोरे जाऊन, कावेबाज शाहिस्तेखानाची बोटंच छाटली !

कट-कारस्थान करुन हल्ले करणार्या अफझल खानाला यमसदनी धाडले !
मराठा साम्राज्यावर चढाई करणार्या प्रत्येक शत्रूंच्या सैन्याला पाणी पाजले ...
शिवबाची यशस्वी वाटचाल पाहून मोगल बादशहाचे चांगलेच धाबे दणाणले !

६जून१६७४ या-सोनेरी-दिनी शिव-राज्याभिषेक-सोहळा थाटात संपन्न झाला ...
विनम्र-विनयी महाराजांनी आजवरचं यश, सारं श्रेय दिलं मातोश्री जिजाऊंना !
शिवाजी महाराजांनी सद्गुरु समर्थांनी दिलेल्या कापडाच्या लहानशा तुकड्याला, 
हिन्दू-शिव-शाहीच्या "साम्राज्याचा-भगवा-झेंडा" म्हणून, अत्युच्च सन्मान दिला !

अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात "न भूतो न भविष्यति" अशी कार्यसिद्धी ...
जोवर नभी सूर्य-चंद्रादि-तारे आहेत, तोवर महाराजांची अपार-अनंत-किर्ती ...
अभिमानानं, हिरीरीनं भावी-पिढ्यान्-पिढ्या गात राहतील छत्रपतींची महती ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "