कविता - भक्तिगीत - 🌷 ' मोरया ' तारिख - मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४
कविता - भक्तिगीत - 🌷 ' मोरया '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - मंगळवार, १३ फेब्रुवारी २०२४
वेळ - दुपारी, ४ वाजून ०२ मि.
गजवदना-मोरया तू मूर्तिमंत बुध्दी-मत्ता ...
तुझ्यापुढे ना कधी, चाले कोणाची सत्ता ...
या जगी कोणीही न राहो दुःखी वा कष्टी ...
कारण आज तर आहे, श्री गणेश चतुर्थी ...
त्रास-दुःख, राग-लोभ, रोगराई-कलहादी ...
भवताप निवारण करी श्री गणेश-जयंती ...
निर्मळ अंत:करणे त्याची घेता शरणा-गती,
जीवनी येई विकास-समाधान-सुखसमृध्दी ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment