कविता - 🌷" मनोमनी मोगरा दरवळला " तारिख - ८ नोव्हेंबर २०१६
कविता - 🌷" मनोमनी मोगरा दरवळला "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख -८ नोव्हेंबर २०१६
साथीला, असं कोणी जे हवंहवंसं वाटतं ...
अन टिपूर चांदणं असावं,वर आभाळात ...
थेट स्पर्शी,थंडगार गुळगुळीत रेत पायाला
अन ओझरताच स्पर्श,हो अचानक हाताला ...
गुद-गुल्या हो पायाला अन मनाला ...
सरकणाऱ्या मऊ रेतीमुळे पायाला ...
अन हलक्या हस्त- स्पर्शानं मनाला ...
बीजलीचा " करंट "जणू काही लागला ...
झर्रकन स्पर्शून,गेला की हो तनं-मंनाला ...
वेळ जणू दौडे,सशाच्या गतीनं
न कळे दोघा,कधी गेला पळूनं ...
घड्यालाचे काटे,थोडे थांबणार चुकून ...
दोघेही होती प्रसन्न,चांदण्यात फिरून ...
रजनीचा प्रहर,शितल,मंद-पवन ...
दोन आतूर जीव,अंधुकसं बंधन ...
मनी भाव-अधीर,करण्या समर्पण,
निरव शांतता,आवाज फक्तं चांदण्यांचे ...
मूक दोघे असूनही,बोलके भाव मनीचे ...
चांद-रातीला,संगे तारा-तारका असता,साक्षीला ...
नभी चंद्राचा,जादुभरा मंद-धुंदसा प्रकाश पडला
त्याच पिवळंसर उजेडात, ती दोघे
अवतार जणू,देखण्या रती-मदनाचे ...
द्वाड वारा तिच्या पदराशी खेळे,
मधेच त्यास, वारा पदरात गुरफटे...
तिचे भुरुभुरु उडणारे केस सोडवतो
त्यां हळूच स्पर्शून, तो उत्तेजित होतो
ती लाजून चूर होता,तिच्याकडे पाहातो
न बोलताही,नजरच दोहोंची बरंच काही बोलते
निसर्ग-राणी जणू,मिश्किलपणे सर्व न्याहाळते
सागर-लहरींचं द्रुत-लयीतलं गाणं ...
चंद्राचं हळूच ढगात जाऊन लंपणं ...
किनाऱ्यावर पानांचं खुशीत सळसळणं ...
दूरवर समुद्रात सुंदर होड्यांचं वलंहवणं
तो आणि ती,एकमेकां हळूच चोरून पाहती
नकळत एकमेकांकडे प्रेमाने,आकर्षित होती
बोलण्याची हिम्मत दोहोंत अजिबात,नव्हती
अखेरीस,देवदूत बनून,कुल्फीवाला येतो मदती
खाता-खाता,कुल्फी-सह ती ही पिघळते
त्याला उत्स्फूर्तपणे होकार देऊन टाकते
तो ही मग कुल्फीवाल्याला येऊन,खुशीत
" उपरका पैसा रहने दो "म्हणत देतो टीप
तेवढयात मोगऱ्याचा धुंद सुवास घेऊन
गजरे- वाला उभा समोर " दत्त " म्हणून
लगेच पुढे सरसावून, तो सहा - गजरे घेतो
तिच्या,लांब-सडक केसांवर हात फिरवतो
तिच्या केश-संभारावर तो प्रचंड फिदा असतो
ती हसुन पाठमोरी होते,तो मग गजरे माळतो
ओठी, मलई- कुल्फीची मिठास,
हृदयी जागें,प्रीतीची-मधुर-आस ...
दोघांच्या मनोमनी मोगरा,बराच काळ दरवळतो
Comments
Post a Comment