कविता - 🌷 " तर काय बहार येईल " तारिख - २४ नोव्हेंबर २०१६
कविता - 🌷 " तर काय बहार येईल "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २४ नोव्हेंबर २०१६
तर काय बहार येईल ...
चुटकीमधे, काही वर्षे मागं जाऊन,
काल-यंत्राचा योग्यसा वापर करून,
अविस्मरणीय तेे क्षण,
परत जर जगू शकलो,
तर काय बहार येईल ...
काही गोष्टी, ज्या हुकल्याच होत्या,
पुनःआत्मसात करता आल्या त्या ...
तर काय बहार येईल ...
जुन्याच,कोऱ्या-पाटीवर जर पुन्हा,
नव्यानं गीरवता येईल, श्री- गणेशा ...
तर काय बहार येईल ...
आपल्या- परक्यातला फरक
जर, नीट समजून घेता आला,
अन् अंमलात आणता आला,
तर काय बहार येईल ...
हिरा आणि गारगोटी मधून,
अनमोल हिरा जर गवसला,
अन् तो सांभाळताही आला,
तर काय बहार येईल ...
काड्या- काड्या जमवून,
अपार मेहनत कर-करून,
बनवलेल्या घरट्याला जर,
घर-पण परत देता येईल,
तर काय बहार येईल ...
छोटया गोडशा पिल्लांना,
उबदार कुशीत कवटाळून,
गुंगवून, गुंतवून ठेवता येईल,
तर काय बहार येईल ...
आयुष्याच्या सोन-सकाळी,
हुशार पाखरांसम उंच भरारी,
जर आभाळात झोकून देऊन
सहजा - सहजी घेता येईल,
तर पुनः-पुनः बहार येईल ...
पुनः पुनः बहार येत राहील ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment