कविता - बालगीत 🌷 ' जादूचे बुडबुडे ' तारिख - सोमवार, ५ फेब्रुवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' जादूचे बुडबुडे '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - सोमवार, ५ फेब्रुवारी २०२४
वेळ - १० वाजून ०५ मि.

सप्तरंगी चमचमणारे बुडबुडे
फुंकर मारताच हवेत उडणारे ...
गोबर्या गाली आनंदाचे फवारे
टाळ्या वाजवीती हात गोरे गोरे ...

क्षणार्धात सर्वत्र भिरभिरणारे
गोल-रंगी-बेरंगी लकलकणारे ...
नाजुक जसे की काचेची झुंबरे 
हलक्याशा स्पर्शानेही फुटणारे ...

झटपट बनतात-जादूही करतात 
त्यांना पकडायला सारे धावतात
जादू संपल्यावर, झटपट विरतात 
असे बुडबुडे अर्जुनला आवडतात ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
 





















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "