कवितेचं नाव- 🌷 " कैवारी " तारिख - मंगळवार ३१ जानेवारी २०१७

कवितेचं नाव- 🌷 " कैवारी "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 
तारिख - मंगळवार ३१ जानेवारी २०१७

श्री गणपती बाप्पा मोरया, हे बुद्धीचं दैवत ...
त्या गणाधीश गजाननाचा जो जन्म-दिवस ...
माघी विनायकी चतुर्थी, एक-खास-दिवस ...

शक्ति जरी कितीही असली, अत्यावश्यक ...
शक्तिपेक्षा युक्तीच सदा कामी येते फटाफट ...

महिमा तुझा गाती सर्व-तू आहेस सुख-कारक ...
तुझ्या कृपेंने सुरळीत जीवन, होई लाभदायक ...

वास्तविक, मनाने आहे मुक्काम पोस्ट,अष्टी ...
देह-रूपानं आज, जरी मुंबईतच असले तरी ...

अंतर्यामी सूक्ष्म-रुपे, जन्मोत्सवात सहभागी ...
भजन-किर्तनी रंगून, विसरून सगळ्या गोष्टी ...

गणराज, मोरया, सिद्धिवरदाता तू मंगलमूर्ती ...
तू देतो आम्हां सदा-सर्वदा सद्कार्याची स्फूर्ती ...

तुझ्या पूजने विनाश, सर्व दुःख-दायी कष्टांचा ...
अत्यानंदाचा मूळ-स्रोत तू, असशी रे गणराया ...

अवघ्या जगताचा भार असे, तुझिया खांद्यावरी ...
शुभानना, युक्तिवादाने लीलया तू नित्य सावरी ...
सुशांत-बुद्धिवंत-गंभीर तू, सकल-जन-कैवारी ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🌅🕉🌷🙏





















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "