Posts

Showing posts from September, 2023

कविता 🌷 ' बाप्पा बाप्पा '

कविता 🌷 ' बाप्पा बाप्पा ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३ वेळ : ११ वाजून ३३ मि. बाप्पा बाप्पा या हो या सोंड इकडे वळवा जरा  गा-हाणी सारी हो ऐका दुष्ट-वृत्ती संपवून टाका || ध्रु || पूर्वी चुका झाल्या हातून पश्चात्तापानं दग्ध होऊन आता करु द्या परिमार्जन सारा -हास-त्रास थांबवा || १ || साध्या सरळ रेषेत जीवन तुम्हीच देता सर्वां संजीवन सुख-शांतीचं होऊन मिलन नांदू द्या प्रसन्नता घरा-दारा || २ || हेवेदावे संपून, व्हावी मित्रता  मी-तूपण संपून शुद्ध पवित्रता सद्-शक्ती सद्-विद्येची पात्रता अलौकिक आनंद द्या घरा-घरा || ३ || 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता : 🌷' दुसरं मागणं नसे ईश्वरापाशी '

तारिख - २८ सप्टेंबर २०१६ कवितेचं नाव - 🌷"दुसरं मागणं नसे ईश्वरापाशी" कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले सळसळणारं हे नव-तारुण्य ... जणू बहरलेलं नवं-लावण्य ... स्वर्गच भासे मज घन-अरण्य ... सारी सुखं उभी, कांही नसे नगण्य ... फुलां-परि सारं-कांही ताज-टवटवीत वाटतय ... झुळुकीच्या झोक्यावर आज डोलावंसं वाटतंय ... इवल्याशा दव-बिंदूलाही खूप-खूप जपायचंय ... मन-मोहक भ्रमराला गुंगवायंचंय-गुंतवायचंय ... गुन-गुन गुंजारवाच्या तालावर, प्रसन्नतेची हलकीच उठते लहर ... तन-मन धुंद-फुंद होऊन उमलतंय ... मज कळीचं जणू रूपांतर होतंय ... सुरेख रंगीबिरंगी सुमनासमान वदन ... चहू-दिशानी आनंदी-आनंद ओसंडून ... वाहतो मंद-सुगन्ध फुला-फुलामधून ... अवघी धरणी-माय तेजाळली तृप्तीतून ... का लाज उतरे अशी गोड गुलाबी गाली ... जणू रविस भेटण्या संध्या सजलीधजली ... कुणी बरं लावली ओठास आज ही लाली ... सजले-नटलेे आज मी लेवून कुंकुम भाळी ... प्रत्येक श्वास झाला सुगंधी ... रात्रीच्या प्रहराची अजुनी धुंदी ... क्षणनक्षण मन झालं हे आनंदी ... जीवनी नव-पर्वाची ही तर नांदी ... वाटे हा सुवर्णकाळ संपू नयेच कधी ... सृष्टी देखील सामील राहून...

कविता : 🌷 ' जीवन-रहस्य '

तारिख - शुक्रवार २९ सप्टेंबर २०१७  कवितेचं नाव -🌷 " जीवन-रहस्य " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले मधुर निनादंत श्याम-बासरी,  झंकारतच जणू सृष्टी हासरी दूर-दूरवरुन हळुवार फुंकर राधेचा अलगद उडवी पदर साद घालता, पशु-पक्षी-हरिणी,  दुडूदुडू धावत पोहोचले तत्क्षणी अनामिक असे हे मधाळ हितगुज  नकळत मज,ओढ लावी अलगुज शब्दांपलिकडले हे अथांग क्षितिज मनास मोहवते मज, खुणावते तुज खुणावते, मोहक मनी रुजता बीज  उन्मनी अगणित उठतात, जल-लहरी असंख्य श्रुति,कर्ण-मधुर ध्वनि-लहरी शांत-निश्चल पर्वतमाला,घनदाट वनराई मंद-मंद, शितल पवन, जोजवी अंगाई निजला कान्हा, सुशांत राधा अन् गोपी थिजला वारा, अवघं गोकुळ गेलं झोपी हलके आली दबक्या पावली, उषा-सुंदरी सोन-सकाळी,रवी-किरणेही झाली नाचरी हर्षाने धरती खुलली,सोनेरी किरणात न्हाली राधा लाजरी, कृष्ण-मय-जगी, विलीन   झाली  कणा-कणात कृष्ण, श्रुति-श्रुतित कृष्ण तना-मनात झंकार राधे-कृष्ण,राधे-कृष्ण धारा-धारा-धारा-धारा बनत गेली राधा जीवन-धारेमध्ये धारा मिसळत जाता,  बनला कृष्ण-महासागर, बघता-बघता जीवनाचे-सत्य, कथिले जेंव्हा पार्था,  भगवत्-गीतेची ...

कविता : 🌷 ' उर्जेचा झंकार '

तारिख -रविवार, १५ जानेवारी २०१७ कवितेचं नाव- 🌷" उर्जेचा झंकार " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले जणू रवि-तेजाचा-पुतळा,अशा स्वामींचं, स्कॉट-लँड-नॅशनल पार्कला भाषण होतं ... अपेक्षेप्रमाणे, जमली होती, अफाट-लोकं ... भाषण छान रंगलं,सर्व लोकांनी नावाजलं ... भाषणात,विश्वाचं रूप बदलवण्यास,२०जणं, आवश्यक आहेत,असं त्यांनी होतं, सांगितलं, टाळ्यांचा गजर,स्टँडिंग-ओवेशनही मिळालं पण वीस जणांपैकी एकही पुढे नव्हतं आलं, पहाटे, स्वामी विवेकानंदांच्या दरवाजातच, एकविदेशी तरुणी उभीच होती कुडकुडंत ... विचारपूस करून,येण्याचं कारण विचारलं, क्रिस- नोबल नामक युवती, प्रेरित होऊन, ती म्हणाली," स्वामी, तुमच्या भाषणानंतर, मी ठरवलंय, बाकीच्या १९ चं नाही माहीत, पण तुमच्या कामात,माझं जीवंन, समर्पित "... असा जबरदस्त प्रभाव होता स्वामींचा,सर्वत्र एकदा,योकोहामा ते शिकागोच्या प्रवासात, स्वामींचा,जमशेटजी टाटांशी झाला परिचय, त्याची परीणती म्हणजे, आयआयटीचा, जन्म आणि टाटा-रिसर्च-युनिव्हर्सिटीचा झाला,उगम  टाटांची इच्छा,स्वामींनीच मुख्य-पदं, भूषवावं स्वामींनी,साधनेत विघ्न नको,म्हणून नाकारलं त्यांच्या अवघ्या ३९ ...

कविता : 🌷 ' रिक्त मन '

कविता : 🌷' रिक्त मन ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : शनिवार , १६ सप्टेंबर २०२३ वेळ : दुपारी, ०१ वाजून ०६ मि. मनापासून पूर्ण-रिक्त होणं म्हणजे नेमकं काय ? संपूर्ण निचरा करणं, जे काही त्यात साचलंय ! कुणा वाटेल हात्तिच्या त्यात काय एवढंच ना ? चुटकीसरशी होतं की नाही पाहा, बघता बघता खूप नंतर समजतं जसं घराला रिकामं करताना, डोकं फिरतं, जमवलेला प्रचंड पसारा बघताना ! गोळा करुन मनाच्या काना-कोपऱ्यात भरलेला निरुपयोगी कचरा वर्षानुवर्ष धूळ खात पडलेला  त्याची विल्हेवाट लावणं वाटतं तितकं सोपं नव्हे हे कुणा येर्या-गबाळ्याचं काम तर नक्कीच नव्हे  माझं-माझं हवं-हवं, हव्यासानं उभारलेला संसार त्यातच पूर्णतः गुरफटलेलं तन-मन-धन अपरंपार या "मायेचा" त्याग करुन, मनानं पुरतं विरक्त होणं हे तर मध-पोळ्यातून राणी-माशीला बाहेर काढणं मन एवढं कोडगं की क्षणार्धात कवटाळूनच बसतं, ते अजिबात विचलित होऊ न देणं, कठीण असतं  जे प्राजक्ताचा वृक्ष दररोज सहजपणे करु शकतो,  सुंदर-नाजुकशा-फुलांचा फुलोरा रोजच फुलवतो अन् विरक्त वृत्तीने रोजच्या-रोज तो धरेला अर्पितो ना राग-ना लोभ ना मोह सदा तो निर्विकार असतो...

कविता : 🌷 ' भाबडं विश्व '

कविता : 🌷 ' भाबडं विश्व '           कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : गुरुवार, १२ जुलै २०१२    वेळ : संध्याकाळी, ७ वाजून १९ मि. ऊनं-पावसाचा खेळ चाले अखंड गं श्रावणात,  किती किती आठवांवं मनं गुंतलं उंच झोक्यात  नभ गेले झाकोळून दिशा साऱ्या गं अंधारल्या टपोर्या थेंबांच्या गं सरी भुमी-वरती बागडल्या... त्याच सरींच्या गं संगे नाचू लागते माझेही मन,  पावसाच्या थेंबोथेंबी मनं झिम्माड ओलं चिंब ! घरा-समोरील तो रस्ता होता अरुंद उताराचा, धुव्वांधार पावसात, वाहे ओहळ गं पाण्याचा ... हिरव्या नाजुक पानांनी नटला तो गुल-मोहर, अंगणात अंथरली जणू लाल चादर गं मनोहर... लाल धुतल्या कौलारी, पागोळ्यांची ओघळंण भातुकलीच्या बोळक्यात, त्याची सये साठवंण नवं वर्ष, नवा वर्ग, नवे कोरे बूट, नवा रेनकोट  सगळा आनंदच असे, नवा कोरा गं सारा थाट श्रावणाच्या सोमवारी अर्ध्या दिवसाची गं शाळा  सणावाराची मज्जा-आईच्या खमंग पुरणपोळ्या गच्चीवरती खेळताना इन्द्र-धनु  नभी उंच दिसे, सप्त-रंगांच्या आठवाने आजही गाली येई हसे... पावसाच्या धारांसंगे कित्ती दूर गेले, वेडे हे म...

कविता 🌷 ' काळ नावाचं औषध '

तारिख - ३० ऑगस्ट २०१६ कविता - 🌷" काळ नावाचं औषध "  कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  महा-विचित्र प्राणी हा, माणूस नावाचा... न सुटलेलं कोडं, त्या विधात्याला सुद्धा... मानवी मन म्हणजे उनाड वानर... चंचल, स्वच्छन्दि, बेछूट अनावर... मानवी विचार जणू वळवाचा पाऊस... वेळी अवेळी धो-धो-धो कोसळणारा... कधी न पडता, दुष्काळाने रडवणारा, कधी अतिवृष्टी-थैमानाने सर्वस्व नेणारा... घटिका, पळे, दिवस पळतच राहतात... जश्या मुंग्यांच्या ह्याs लांबलचक रांगा... बघता-बघताच अवघं आयुष्यही सरतं, कसं अन् कधी, कुणा कळतं का सांगा... माणूस अति-हुशार-चलाख जरी असला, तरी एकाच गोष्टीला तो घाबरतो खरा... काळाचाच त्याच्यावरती प्रचंड दरारा ! जसा घोड्यासाठी चाबकाचा फटका, माणसालाही बसतो काळाचा दणका...! असा हा काळ माणसास खूप काही शिकवतो, प्रथम आंबट-कडू-गोड रीत्या तो पोळून टाकतो... अनुभवातूनच, सरते-शेवटी तो शहाणंही करतो... काळ आणि वेळ आहेत अगदीच भिन्न ... काळ आला चालून तर करतो छिन्नभिन्न... वेळ आली चालून मात्र, वर्मीच घालतेे घाला ! माणूस मनातच म्हणतो, "वेळ नव्हती आली,  पण अंगावर प्रत्यक्ष चालून, काळ होता आला...!" ...

कविता : 🌷 ' उघड नयन देवा '

तारिख - २६ सप्टेंबर २०१६ कवितेचं नाव-🌷" उघड नयन देवा " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले आज सहजच विचार डोकावला ... आता जर ईश्वर फिरुनी जन्मला, किंव्हा देव-रुपात पुन्हा अवतरला, पृथ्वी-तलावर सर्व ठीक करायला ... किती मेहनत घ्यावी लागेल त्याला, जाड गेंड्याची कातडी असलेल्या, आजच्या समाजास सरळ करायला ... सत्-युगातील मूल्यं गळी उतरवायला ... देव-परमेश्वर वगैरे तो असला तरी, त्या परलोकातला, येथील ही मंडळी सगळी, मोडता घालण्यास टपलेली त्यांचं नेमकं हेच काम आहे 'असली' ... ते स्वतः काहीही करणार नाहीत, दुसऱ्यालाही करू देणार नाहीत ... नुसती चर्चा-सत्र करुन आयोजित, बसतील दुरून सारी मजा चाखीत ... भगवन्ता, तुझा काळ होता चांगला ... मनुष्य अजून "माणूसच " होता भला ! आज त्याचा तोलच आहे पार सुटला, पशु व मानव दोहोंत फरकच ना उरला ... तू तर मेहनतीनं बनवलंस मनुजा, तुझी फसवणूक कशी झाली बा ?! आम्ही पामर भोगतो आहो सजा ... सर्वजण खुशाल मारताहेत गमजा ... यावर एक उपाय योजना म्हणून, काहींतरी चमत्कारच कर दणकून ... उघड आता, ढोंगी कुटीलांचे नयन ... तेंव्हा कुठं जरा  जिवास  वाटेल चैन ... 🌷@तिलोत्त...

कविता 🌷 " संवेदनशील-मन "

तारिख - रविवार, १६ एप्रिल २०१७ कवितेचं नाव-🌷" संवेदनशील-मन " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  गौतमच्या बोलण्यातच एक मातीचा, वाईच्या भाषेचा सुगंधीत हेल यायचा,   त्याचाही त्याला अभिमानच वाटायचा ... इतरांचं चिडवणं तो काणाडोळा करायचा  कशाचा त्याला न्यूनगंड, नाही येऊ द्यायचा  मात्र त्याची " हिंदी " ऐकूनही हसू आवरणं, म्हणजे सर्वांना व्हायचं अत्यंत कर्म कठीण ... ती त्याला बजावायची नुसतं "है" लावलं की, भाषा बदलत नाही, लक्ष देऊन शिकून घे की ... मग त्याचं, खजिल होऊन," मॅडम सॉरी सॉरी " हे ऐकून तिला हसावं की रडावं कळायचं नाही ... "अजून सराव झालेला न्हाई,   वाईच थांबा, मंग फाड-फाड हिंदीच न्हाई तर इंग्रजीत सुध्दा बगा, बोलतो की न्हाई "... हे इतक्या मनापासून निष्पापपणे म्हणायचा, की हसून-हसूनच पोटात लागायचं, दुखायला  त्याला शेवट पर्यंत कारणच नाही, समजायचं अचानक असं काय झालं, सगळेजण हसण्याचं  रविवार सोडला तर दररोज, ती अजंठाच्यां घरी सकाळी नाश्ता उरकून-सासरचा मेनू ठरवायची, स्वैपाक्याला सामान देऊन मग,आँफिस गाठायची ह्यामुळेच अजंठाच्यां घरी, झाडू-पोतं ...

कविता 🌷 " दिव्य, निर्मल-अनुभूति "

तारिख - सोमवार, १७ एप्रिल २०१७ कवितेचं नाव-🌷" दिव्य, निर्मल-अनुभूति " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  दिव्यत्वाची अनुभूति ... मनस्वी अशी प्रचिती ... न भूतो न भविष्यति ... ऊठल्या क्षणापासून, जीवाची थोडी तगमग ... कळत नव्हतं, अंतर्मन ... हे कशामुळं होतं बेचैन ... मुलांशी संवाद साधून, झालं काहीसं निवांत ... काहीली कमी व्हावी म्हणून, शितल संतत जलधारां-मधून स्वानंदे,सचैल,मनसोक्त स्नान ... "शिवोहं"चाच गजर तना-मनात ... जणू कोसळणार्या, ऊंचावरून,  स्वर्गीय,अद्भुत, धबधब्यासमान ... सहस्र- सहस्र जलधारां स्पर्शती ... सहस्र-सहस्र कमल-दलं उमलती, सहस्र- सहस्र सहस्रार तेजाळती ... मन, बुद्धि, चित्त,मानस तेजाने भरून, सहस्ररश्मिंसहित सूर्यादेवांचं आगमन ... संपूर्ण भालप्रदेश लखलखित प्रकाशून ... रक्तवर्ण लालिमा सर्वत्र सहज पसरून ... मन आकंठ आनंदरसाने तृप्त होऊन ... अखंड ब्रह्मांडाचं दर्शन स्पष्ट होऊन, अंतर-बाह्य काया-पालट जणू होऊन, सदा निर्मल-निर्विचार-अवस्था प्राप्त  स्थळ-काळाचे सर्वच देह-भान लुप्त ... शत- शत प्रणाम सर्व गुरूवर्यांना ...। लक्ष-लक्ष आद्यगुरू-चरण-वंदना ...

कविता 🌷 " निरपेक्ष भक्तिची परिभाषा "

तारिख - रविवार, ११ एप्रिल २०१७ कवितेचं नाव-🌷" निरपेक्ष भक्तिची परिभाषा "... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  आज आहे, श्रीहनुमान-जयंती ... शुक्ल-पक्ष,चैत्र-पौर्णिमा-तिथी ... शुभ-घडी आली, चित्रा नक्षत्री ... येती जुळून, अमृत-योग, योग-केसरी मंगलदिनी मंगल-क्षण, होतसे साजरी  यंदाच्या वर्षी,ग्रह-मान- योग अगदि आहे तोच   जणू प्रत्यक्ष हनुमानाच्या जन्म-दिवशीचा योग  एकशेवीस वर्षांनी पुनः जुळून आले संजोग ... हनुमान-जन्मसमयीचा हा जणू सुवर्ण-योग ... अंजनीचा पुत्र म्हणून नाव पडले अंजनेय ... पवन अथवा वायुचा पुत्र, म्हणून "वायुपुत्र"... कपि-कुळामध्ये झाला त्याचा पावन जन्म ... म्हणूनही त्या बालकाचे नाव ठेवले हनुमंत ... अष्टौसिद्धि व नऊ-निधींचा,श्रीहनुमान दाता   शक्ति-बुद्धि,सेवा-भाव,त्याग-भक्तिचा त्राता  शेंदूर चर्चित, गदा-धारी रामाचा परम-भक्त, जो श्रीरामाचा भक्त, त्यावर हनुमान आसक्त ... करीतसे कृपेचा वर्षाव, नित सद् भक्तांवर ... कधी ना करी भेद-भाव, रंक असो वा राव ... आजच्या दिवशी, भल्या पहाटे स्नानापश्चात शेंदूर-चमेली-तेल,चांदी-वर्खाने पूजा साक्षात...

Poem -🌷" Unique Dot On, Divine Canvas "

Date - Saturday, 18 February 2017 Poem -🌷" Unique Dot On, Divine Canvas " Poetess - Tilottama Vijay  Lele               You Know What, Everyone Is A Microscopic,  Tiniest Black Or Brown,  Yellow Or White Dot ... On An Infinite,  Extremely, Transparent ... Canvas Of God ... The Sooner One Realizes This, The Better One Gets Settled,  In One's Own Life ... In One's Own Home, He/She Is A King Or Queen ... In One's Neighborhood, One Is A Good Soul ... In The Society Where One Is From, One Is A Good Family Member ... In That Suburban Place, Region Or Area,  One Belongs To, One Is A Prudent Person ... In One's City, One Is A Voter ... Required While Election ... For The Purpose Of Voting ... In One's Country, One Is A Citizen ... Representing One's Country ... All The Time ... On The Global Scene, One Is A Human Being, Representing A Human Race ... In The Universe, There Are Multiple Galaxies ... With Centers Occupied ......

कविता : 🌷 " सद्-कर्म-यज्ञ, आईचा "

तारिख - रविवार, १९ मार्च २०१७ कवितेचं नाव-🌷" सद्-कर्म-यज्ञ, आईचा "  कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  एका गोष्टीची आहे खात्री  शंभर टक्के अगदि नक्की ... गेल्या,शत-जन्मांत एखादं काहीतरी, सत्कर्म हातून घडलं असावं नक्की त्या शिवाय इतक्या महान, आई-वडिलांच्या पोटी जन्म ... घेऊ शकणं केवळ अशक्यच ... आई जी आद्य-गुरू,तिच्या विषयी  कितीही लिहीलं तरीही आहे कमी ... जेव्हा एखादि व्यक्ति आपल्याला,  रात्रं-दिवस नजरे-समोरच दिसते, गृहीत धरतो बर्याचदा, आपण तिला तिची होती,अत्यंत साधीशी राहणी ... अन् उच्चतम कृती व विचारसरणी ... नावाप्रमाणेच शांत स्वभाव लाखामध्ये एखाद्या व्यक्तित शोधून मिळणं कठीण असतं  जे भाग्यानं,पदरी आहे त्यातच आनंदी ... असिम-कष्टांची पर्वा केली नाही कधी ... कितीही संकटं जरी आली, तरी तोंडातून चकार, ब्रं नाही ... की ती कधी डगमगली नाही ... स्वकर्तव्य  नीट  काटेकोरपणे  पण नेहमी आनंदानेच करणे ... कोणत्याही त्रुटि, तिला कधीच " त्रुटि " म्हणून वाटल्या नाहीत ... मिरजेच्या प्रशस्तं जागेमधून, गोरेगावच्या दोनच खोल्यांत, राहूनही घेतलं सारं सांभा...

कविता : 🌷 ' अमोघ बाण '

कविता : 🌷 ' अमोघ बाण ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारीख : मंगळवार, ५ सप्टेंबर २०२३ वेळ : संध्याकाळी, ६ वाजून ०३ मि. झाडा-समानच महान असती, समस्त गुरु-जन नित करिती सर्वांवरी अमूल्य-ज्ञान-कण-सिंचन रणरणत्या उन्हात वृक्ष, सावली करिती शितल किंचितही लागू न देती गुरु, भव-तापाची झळ ! फळं-फुलं-पानां-मुळांचं, अमूल्य असं हे वरदान अथक परिश्रमांतून शिक्षक करीती ज्ञानाचे दान इवल्या-शुध्द-बीजापोटीच सदैव होते वृक्षारोपण कधी प्रेमानं-कधी रागावून, गुरु करिती मार्गदर्शन हिरव्या भाज्या-वनौषधी, सुप्त सारीच पोषक-सत्वं सदाचार-सुविचारांची, सत्गुरु शिकविती जीवनतत्वं पूर येता झाडं-झुडपं पाणी अडवून नुकसान रोखती, अज्ञानरुपी अंधार उजळून, गुरु ज्ञान-सिंचन-करिती निसर्ग-दत्त अनमोल-अमाप, ठेवा हाच तो संपत्तीचा ज्ञानार्जनातूनच उदय होतो, सुखद-समृद्ध-उन्नतीचा ! पृथ्वीतलावर झाडं म्हणजे, हिरव्या-सोन्याची-खाण सुयोग्य गुरु-जन-लाभ म्हणजे रामाचा-अमोघ-बाण ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆  

कविता : 🌷"अहो-आईंची "कॉलर ताठ

तारिख - शुक्रवार, १० मार्च २०१७ कवितेचं नाव-🌷"अहो-आईंची "कॉलर ताठ "...               कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तिचं नुक्तं लग्न होऊन दोनच महिने झालेले ... लग्नाआधीचा,बिझनेस,ऑफिस सुरु झालेले ... एकूण फक्त बाराच दिवस ऑफिस बंद होतं ...  ती ऑफिसला नव्हती, हनिमुनचे दहा दिवस, ... एक दिवस केळवणामुळं, एक दिवस लग्न ... काश्मिरहून आल्यापासून,तर ती घरातूनच, ऑफिसचं काम बघायची, स्टाफला घरीच, बोलावून दीड तासभर,वेगळ्याच खोलीत, तिचं, तात्पुरतं झटपट- ऑफिस थाटायचं, नंतर सर्व स्टाफ कामं घेऊन गेल्यावर मात्र ... ती नवी-नवेली नवरी, सून, वहीनी सर्व काही ... रोल-मध्ये शिरायची, अगदी सराईता सारखी ... एकदा बडोद्याहून,महत्वाचे पाहूणे आलेले ... त्यांना लग्नाला हजर रहाणे, नव्हते जमले ... ती रोजच्यासारखी तिच्या"टेम्पररी ऑफिसमधे"... स्टाफ-कडून रिपोर्ट घेऊन, त्यांना त्यांची कामे, देण्यात मग्न होती, तिला काहीच माहित नव्हते ... इकडे तिच्या सासूबाई, झालेल्या टेन्स ... एव्हाना,बिझनेस करणारी सून,ही गोष्ट ... सर्वांना माहित झालेलीच होती नात्यात ... त्यामुळेही सगळ्यांना उत्स...

कविता : 🌷" मुद्दतें हो गयीं "...

तारिख - ७ जानेवारी २०१७ कवितेचं नाव-🌷" मुद्दतें हो गयीं "... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले रियुनियन-कार्यक्रमाचा "डी-डे " उगवला ... सारी रात्र जागून,विश्वासनी हॉल सजवला ... मुंबईला,लाम्बून आलेली मंडळी, आदल्या दिवशीच पोचली होती ... पुणे,गोवा,नाशिक,सोलापूर,चिकमंगळूर, येथपासून आलेली मंडळी,होती जोशात ठरलेल्या वेळी सकाळीच,जमले सर्वजण  फोटोग्राफर,लाईट्सपासून, म्युझिकपर्यंत, सगळ्या गोष्टिंचं उत्कृष्ट होतं व्यवस्थापन   प्रवेश-द्वारी अत्तर,गुलाब-जलाचा छिडकाव  थोडं पुढे, सुगंधी फुलं-पाकळ्यांचाच वर्षाव  त्यापुढं पुरुषांना एक-लाल-गुलाब,भेट स्त्रियांना मोगऱ्याचा मस्त- गजरा-भेट त्यानंतर वाईच्या-कंदी-पेढ्याचा पुडा, थाट पाहून, लग्नाचा घाटच आठवावा हॉलमधे सनई,चौघडा,तबला,संतूर ... कानांवर पडत होते यांचे मिश्र-सूर ... हॉल मोठा होता म्हणून,त्याच्या अर्ध्या-भागात, मांडणी,लोड-तक्क्या-गाद्यांची भारतीय बैठक दुसऱ्यात, टेबल-खुर्च्या-ट्रे अशी विदेशी पद्धत विश्वास, रमेश व अस्मादिक आयोजक ... त्यामुळं प्रत्येकाचं जातीनं,आगत-स्वागत ... स्वागत करून आगतास, नाष्टयाच्या भागात नेऊन, पाणी,सरबत,कैर...

कविता : 🌷" ॠणानुबंध "...

तारिख - शनिवार, १५ एप्रिल २०१७ कवितेचं नाव-🌷" ॠणानुबंध "... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  बरीच वर्ष जुनी, ही गोष्ट आहे, गौतमची ... जेव्हा तिचं आँफिस फोर्टला होतं तेव्हाची ... फोर्टला तिच्या आँफिसमधे, चार डेलिव्हरी-बाँईज होते ... त्यापैकी एक होता गौतम ... त्याचं खरं नाव होतं,संजय ... पण सर्रास वापरातलं,त्याचं   नाव मात्र, गौतमच होतं ... थेट वाईहून मुंबापुरीला, नोकरी शोधत, आलेला ... नुकतच मिसरूड फुटलेला, अगदिच एकोणीस वर्षांचा ... स्वभावानं गरिब,भोळा-भाबडा ... बिल्कुलच छक्के-पंजे नसलेला ... त्याचं स्वच्छ, सरळ वागणं-बोलणं, थेट भिडलं, म्हणून त्याला निवडलं खूष होऊन, तो चक्क, तिच्या पाया पडला  त्यामुळे, तिला आश्चर्याचा धक्काच बसला   आँफिसमधे असं घरासारखं वागायचं नाही, अशी तंबी भरून,त्याची तिने बोळवण केली   अन्य स्टाफला त्याला शिकवायला चार गोष्टी  सांगून,याची निवड करुन चूक तर नाही केली, अशी एक शंका तिच्या मनात डोकावून गेली ... गौतमसाठी" मँडम "म्हणजे,एक आदर्श, त्यांचा शब्द म्हणजे,राजाचं जणू फर्मान ... त्याला काम दिलं,की फत्ते होण्याची ...

कविता : 🌷 ' खरा कर्मयोगी '

तारिख - रविवार, ९ एप्रिल २०१७ कवितेचं नाव-🌷" खरा कर्मयोगी " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  अशारितीनं सरडे सरांनी, सगळ्याच परीक्षार्थींची मस्त-साग्र-संगीत-खाशी बडदास्त ठेवलेली होती...! विशेष म्हणजे त्यांना बेगडी मोठेपणाची, किंचितशीही अपेक्षा अजिबातच नव्हती ! स्वतः त्याचा कधी उच्चारही  सरडे सरांनी, केला नव्हता, ना शाळेत-ना बाहेर कुठेही ... पण विद्यार्थ्यांच्या र्तोंडात,   तीळ भिजेल तर शप्पथ ! दुसरा दिवस उजाडताच   सगळ्या परीक्षार्थींच्या तोंडून रसभरीत असं वर्णन ऐकून,   ही गोष्ट शाळाभर झाली  शाळा-व्यवस्थापनाच्या कानी   तपशीलवार बातमी गेली  मुख्याध्यापकांनी तातडीची,   सर्व-शिक्षक बैठकच बोलावली  लेकी बोले सूने लागे-या धर्तीवर  पण  सद्हेतुनं- चांगल्याअर्थी सरडे सरांचं खूप कौतुक केलं, मग   गुपचुप उर्वरित  शिक्षकांनी   खर्चाचा अंदाज बांधून,  आपसात ऐच्छिक रक्कम गोळा केली  सरडे सरांना, सन्मान-पूर्वक  तेच पैसे एका पाकीटात घालून टाळ्यांच्या गजरांत ते पाकीट  मुख्याध्यापकांच्या हस्ते  दिलेलं...

कविता 🌷' मुक्काम पोस्ट रामेश्वरम् '

तारिख - सोमवार, २१ फेब्रुवारी २०१७ कवितेचं नाव-🌷" मुक्काम पोस्ट रामेश्वरम् "...  कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले खूपच जुनी गोष्ट आहे आजची ... रामेश्वरमला गेलो होतो तेंव्हाची ... एक वर्षी " अहो आईना " घेऊन, त्यांच्या इच्छेनुसार,रामेश्वरम् केलं ... मुंबईहून विमानाने गेलो,कोयम्बतूरला ... कार हायर करून,पुढं,गेलो रामेश्वरमला ... खूप सुंदरसं ठिकाण,मंदिराच्या जवळचं, एक छानसं हॉटेल सर्वांत जास्त आवंडलं  मस्त समुद्र-किनारा, स्वच्छ मऊ रेत ... नारळी-पोफळीची झाडं,निसर्ग मस्त ... खायला टेस्टी,साऊथ-इंडियन पदार्थ आल्हाद-दायक हवामान,सुंदर गार्डन फुलांनी डवरलेली वेली-झाडं-झुडूपं ... एकूण,निसर्ग-सौंदर्य फार उत्कृष्ट होतं ... बाहेरच्या बाजूलाच,झुलायला हॅमॉक्स ... मोठा,स्विमिंग पूल,कंफी-गार्डन-चेअर्स, साईड-टेबलवरून, खात-पीत वाचन ... मस्त तब्बेतीनं, प्रत्येक क्षण,आनंदानं ... सर्वप्रथम स्नान केल्याने, तन व मनं ... झालं होतं एकदम मस्त ताज-तवांनं ... नंतर समुद्रावर मारली एक चक्कर ... नवरोजी हॉटेलवर आराम करणार ... मग मी, सासूबाई, दोन लहान मुलं, अन हे मोठं-थोरलं, पूजेचं-साहित्य ... अशी वरात...

कविता 🌷' आठवणींच्या जगात '

तारिख -  शुक्रवार, ७ एप्रिल २०१७ कवितेचं नाव-🌷" आठवणींच्या जगात "...              कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  लहानपण आठवता तिला आठवते शाळा   बालपणीचा अविभाज्यं घटक असे शाळा तिचे सगळे शिक्षक फार-फार होते चांगले, आजचे हे कवन आहे फक्त सरडे सर यांचे  ते, तिच्या एका भावाचे-सुरेश अण्णाचे, मिरजेेचे मित्र-तो शिकत होता, तेव्हाचे    ... त्यामुळे तिच्यावर जास्तच लक्ष द्यायचे   ... बालपणी, तिचा आदर्श म्हणजे-शिक्षकवर्ग   तिला सुदैवाने अत्यंत उत्तम शिक्षकांकडून, सुसंस्कार,शिक्षण,मार्गदर्शन, सदैव लाभलं   वास्तविक त्याकाळचे, त्यांचे तुटपुंजे पगार ... त्यात खाजगी शाळा,विना सरकारीअनुदान त्यामुळे शिकवण्याची कळकळ असलेलेच शिक्षक व्हायचे," विद्यार्थ्यांना शिकवण्याचं, त्यांना घडवण्याचं, ध्येय उराशी बाळगूनच, अक्षरश: शंभर- टक्के द्यायचे, जीव ओतून ती चौथीत व सातवी इयत्तेत असताना, शाळाच निवडायची सुयोग्य विद्यार्थ्यांना, स्काँलर-शिपची परीक्षा तयारीनं द्यायला, अन् यथोचित प्रशिक्षणही द्यायची त्यांना ! नंतर परीक्ष...

कविता : 🌷' जगण्याचा खरा आनंद '

तारिख - २४ डिसेंबर २०१६ कवितेचं नाव-🌷" जगण्याचा खरा आनंद " ... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले हल्ली आपण बऱ्याचदा ऐकतो, पाहतो ... वयस्क लोकांना मानसिक आजार होतो, त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना त्रासही होतो ... त्यात प्रकार जरी बरेच असले, तरी एक "कॉमन-फॅक्टर"म्हणजे, एकाकीपणा,जीवनात पोकळी होणे, "आपण कोणालाही नकोच आहोत" असे मत होणे,चुकीचा समज असणे ... त्यातच जर जीवनाचा- जोडीदार, कालवश होऊन,गेला असेल सोडून ... तर ह्या धक्क्यातुन सावरून,जीवन  पूर्ववत जगणं,कठीण होऊ शकतं ... मुंबई सारख्या मेट्रो-सिटीत, जागेची टंचाई खास करून ... मध्यम-वर्गाला न परवडणारे, जागांचे भाव,गगनाला भिडलेले ... लोन जरी मिळालं,तरी"ईएमआय "चा हप्ता ... म्हणजे "नाकापेक्षा,मोती जड"असावा तसा... दरमहिना पगारातून,२०-२०वर्षे भरणे हप्ता ... शेवटी,या सगळ्याचं मानसिक दडपण, जुन्या व नव्या दोन्ही पिढ्यांना वाटणं, साहजिकच, यावर उपाय मात्र एकच ... स्वतःला ज्यात निर्भेळ आनंद मिळतो,ते शोधणं ... किंवा,जे करतो आहोत,त्यातून,आनंद मिळवंणं ... स्व-आत्मा-रामास नित्यआनंदि अवस्थेत ठेवणं ... हे ज्...

कवितेचं नाव-🌷" सु-संस्कारांचं सिंचन "...

तारिख - ३० डिसेंबर २०१६ कवितेचं नाव-🌷" सु-संस्कारांचं सिंचन "... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तेव्हाची गोष्ट आहे ही ... सर्वां,असं वाटायचं,की ... जेव्हा पालक आणि पाल्यं,सर्वांनाच, " गाईड्स "वापरणं, नामुष्कीची गोष्ट, "कोचिंग-क्लासला"जाणं,शरमेची-गोष्ट ... जेव्हा शिक्षक,"टुशन्स"साठी धडपडायचे नाहीत, किंवा तसा सल्लाही विद्यार्थ्याना द्यायचे नाहीत "शिकवणं"हा एकमेव,"नोबल- प्रोफेशन" ... असं सर्व-सामान्यपणे,प्रत्येकास वाटायचं ... वास्तवीक,आजच्या तुलनेत,तेव्हा शिक्षक, मासिक-वेतनाच्या बाबतीत,खूपच उपेक्षित ... तरीही,त्यांचं शिकवणं,पोट-तिडीकिनं, नेहमी असायचं,अत्यंत आपले-पणानं, आपल्या हातूनच नवीन-पिढी घडतेय ... भविष्यातही घडणार आहे, अशा एकाच,उदात्त भावनेनं भारलेला,असा तो शिक्षक-वर्ग ... निदान सर्व शाळांमध्ये तरी,प्रामाणिकपणा, कडक-शिस्तं असूनही मायेचा,आपलेपणा हेड-मास्तर व शिक्षक यांचं एकमेव ध्येयं, "उत्तम- विद्यार्थी "चांगले-नागरिक घडवणं ... त्यामुळं सतत सुंदर कल्पना, नवं-नवीन गोष्टिंच्या योजना ... अभिनव प्रयोग,संकल्प,उपक्रम,राब...

कवितेचं नाव-🌷"सद्गुरू व अध्यात्मिक मार्ग-क्रमण "...

तारिख - ४ जानेवारी २०१६ कवितेचं नाव-🌷"सद्गुरू व अध्यात्मिक मार्ग-क्रमण "... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले दत्त-गुरुंनी चोवीस गुरू केले ... प्रत्येकाकडून गुण घेत राहीले ... माणसाच्या जन्मोजन्मा पासून, किंवा त्याही खूप आधी पासून, त्याचा जीवन-प्रवास होतो सुरु ... त्यामुळं आद्य- गुरूचे स्थान,फार महत्वाचे ... तेवढेच महत्वाचे स्थान आहे,माता-पित्याचे ... पुढें- पुढे जीवन-क्रमानुसार,वाढते ... अन्य गुरूंचे स्थानही निर्माण होते ... आपापल्या अध्यात्मिक, स्थितीनुसारच,  मोकळा होतो कार्मिक मार्ग,आपोआपच पुढे होतो त्याचाच विस्तार, आणखीनच ... गुरू शिष्याच्या व शिष्य योग्य गुरूच्या ... दोघेही असतात शोधात, एकमेकांच्या ... नव्हे, ती तशी बहुधा आखणीच केलेली असते  प्रश्न असतो, शोधक नजरेचा ... आंतरिक तीव्र इच्छा-शक्तिचा ... जशी जशी प्रगतीची पावलं पडतात ... अध्यात्मिक वाटचालीत, नवं-नवीन, ज्ञानी सद्गुरुंहीं उदय पावतच जातात ...   गुरुंकडून जस-जशी ज्ञान प्राप्ती होते, शिष्याचे,अज्ञान कमी-कमी होत जाते ... ज्ञान-अज्ञानाची अति-सूक्ष्म-प्रकारे, देवाण- घेवाण, निरंतर चालू राहाते ... शिशु-वर्गातून जसे,...

कविता 🌷' जेव्हा ज्ञानदिप उजळला '

कवितेचं नाव-🌷" ज्ञान-दिप जेव्हा उजळला "... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - ३ जानेवारी २०१६ खेळ असे मांडला ... अंतर्यामी आपल्या ... कळेना आपल्याला ... मुंगी होऊनी चाली ... हळूच ती अंगावरी ... समजे आपल्याला,परी ... शरीरी, रक्त संचार करी ... चोवीस तास भ्रमण करी ... न कळे, आपल्याला परी ... वारा हळूच स्पर्श करी ... येई सुखदशी शिरशिरी ... वीस वायूंचा संचार शरिरी ... न कळे आपल्याला परी ... झाडे हलती, फुले डोलती ... नेत्र पाहती, अन सुखावती ... अंतरचक्क्षु जे अनुभवती ... न आकळे परी प्रत्येकासी ... फुलांचा मधुर सुगंधं ... नित्यच करीतसे धुंद ... अंतर्मनीचा दिव्य परिमळ, ना येतसे परी, प्रत्येकास ... सप्त सूर अन अगणित श्रुती ... तन- मनास गुंगच करती ... प्रणवाचा तो दिव्य नाद ... न अनुभवा येई प्रत्येकास ... नवं- रसांचा स्वादं ... रसना घेई हमखास ... अंतरीचा अनोखा रसं ... चाखंण्या न मिळे, दरेकास ... सूर्य- चंद्राचा प्रकाश ... उजळे अवघ्या चराचरासं ... अंतरंगातील दिव्य-प्रकाश ... उजळून टाकी अज्ञानासं ... खेळ असा हा रंगला ... आत्माराम त्यात दंगला ... तमाम तमाचा, निचरा झाला ... ज्ञान- दिप ...

कविता : 🌷 ' अज्ञानाचं ज्ञान '

कविता 🌷' अज्ञानाचं ज्ञान ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : गुरुवार, ३१ ऑगस्ट २०२३ वेळ : १२ वाजून ०३ मि. " बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ",  "अंगे झाडीन अंगण, त्याचे दास्यत्व करीन" "जो बोलतो तसंच प्रत्यक्षात वागून दाखवितो," "अशा महान विभूतीचा सेवा-लाभ मी इच्छितो" ! संत तुकाराम महाराज अभंगवाणीतून, म्हणाले  मोजक्या शब्दांत त्यांनी किती अगाध ज्ञान दिले ! स्वतःहून शिकल्यावीण ज्ञान-दीप कसा उजळेल स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग तरी कसा काय दिसेल ? मुळात आपल्या 'अज्ञानाचं ज्ञान' जरुरी आहे होणं, जगी सर्व-व्यापी, सर्व-ज्ञानी ईश्वराविना आहे कोण ? सकारात्मक भावाने त्याला संपूर्णपणे शरण जाता,  आपल्याच-अज्ञानाचं ज्ञान-होऊन, हरते भव-चिंता ! अलिप्त-मनानं बाह्य-दुनियेचे मायावी-पाश तोडणं, अध्यात्म म्हणजे ते आत वळवून स्वयं केन्द्रित करणं  अथांग महासागराच्या अक्राळ-विक्राळ स्वरुपातून, 'स्वतः क्षुद्र-नगण्य-जीव', कळतं तुटपुंज्या कुवतीतून लांब-लांबपर्यंत हिमाच्छादित महा-काय पर्वत-रांगा, 'रेती-कणाहून तुच्छ आपलं अस्तित्व', फुकट हा त...

कविता : 🌷' भरती '

कविता :🌷' भरती ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : मंगळवार, २९ ऑगस्ट २०२३ वेळ : संध्याकाळी, ७ वाजून ४० मि. हे गज-वदना, देवा गणराया  कृपा-वर्षा करण्या सत्वर या प्राण कंठाशी हे आले आता, तुमच्या विना कोण हो त्राता ? आस लागलीसे आगमनाची वळवा हो, कृपा-दृष्टी तुमची आम्हां नादान बालक समजून रक्षण करा हो विनाशा पासून रात्रं-दिवस गाऊ देवाचे गुणगान सद्बुद्धी-सद्शक्तिचं द्यावं वरदान भरकटलेल्या मना द्यावी जागृती इतुकीच ही कळकळीची विनंती निरामय आनंदाची वृष्टी व्हावी, सर्वांच्या सुखाला भरती यावी ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆