कविता 🌷' जेव्हा ज्ञानदिप उजळला '
कवितेचं नाव-🌷" ज्ञान-दिप जेव्हा उजळला "...
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ३ जानेवारी २०१६
खेळ असे मांडला ...
अंतर्यामी आपल्या ...
कळेना आपल्याला ...
मुंगी होऊनी चाली ...
हळूच ती अंगावरी ...
समजे आपल्याला,परी ...
शरीरी, रक्त संचार करी ...
चोवीस तास भ्रमण करी ...
न कळे, आपल्याला परी ...
वारा हळूच स्पर्श करी ...
येई सुखदशी शिरशिरी ...
वीस वायूंचा संचार शरिरी ...
न कळे आपल्याला परी ...
झाडे हलती, फुले डोलती ...
नेत्र पाहती, अन सुखावती ...
अंतरचक्क्षु जे अनुभवती ...
न आकळे परी प्रत्येकासी ...
फुलांचा मधुर सुगंधं ...
नित्यच करीतसे धुंद ...
अंतर्मनीचा दिव्य परिमळ,
ना येतसे परी, प्रत्येकास ...
सप्त सूर अन अगणित श्रुती ...
तन- मनास गुंगच करती ...
प्रणवाचा तो दिव्य नाद ...
न अनुभवा येई प्रत्येकास ...
नवं- रसांचा स्वादं ...
रसना घेई हमखास ...
अंतरीचा अनोखा रसं ...
चाखंण्या न मिळे, दरेकास ...
सूर्य- चंद्राचा प्रकाश ...
उजळे अवघ्या चराचरासं ...
अंतरंगातील दिव्य-प्रकाश ...
उजळून टाकी अज्ञानासं ...
खेळ असा हा रंगला ...
आत्माराम त्यात दंगला ...
तमाम तमाचा, निचरा झाला ...
ज्ञान- दिप जेव्हा उजळला ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment