कविता 🌷 " दिव्य, निर्मल-अनुभूति "

तारिख - सोमवार, १७ एप्रिल २०१७
कवितेचं नाव-🌷" दिव्य, निर्मल-अनुभूति "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 

दिव्यत्वाची अनुभूति ...
मनस्वी अशी प्रचिती ...
न भूतो न भविष्यति ...

ऊठल्या क्षणापासून,
जीवाची थोडी तगमग ...
कळत नव्हतं, अंतर्मन ...
हे कशामुळं होतं बेचैन ...
मुलांशी संवाद साधून,
झालं काहीसं निवांत ...

काहीली कमी व्हावी म्हणून,
शितल संतत जलधारां-मधून
स्वानंदे,सचैल,मनसोक्त स्नान ...

"शिवोहं"चाच गजर तना-मनात ...
जणू कोसळणार्या, ऊंचावरून, 
स्वर्गीय,अद्भुत, धबधब्यासमान ...

सहस्र- सहस्र जलधारां स्पर्शती ...
सहस्र-सहस्र कमल-दलं उमलती,
सहस्र- सहस्र सहस्रार तेजाळती ...

मन, बुद्धि, चित्त,मानस तेजाने भरून,
सहस्ररश्मिंसहित सूर्यादेवांचं आगमन ...
संपूर्ण भालप्रदेश लखलखित प्रकाशून ...
रक्तवर्ण लालिमा सर्वत्र सहज पसरून ...

मन आकंठ आनंदरसाने तृप्त होऊन ...
अखंड ब्रह्मांडाचं दर्शन स्पष्ट होऊन,
अंतर-बाह्य काया-पालट जणू होऊन,

सदा निर्मल-निर्विचार-अवस्था प्राप्त 
स्थळ-काळाचे सर्वच देह-भान लुप्त ...

शत- शत प्रणाम सर्व गुरूवर्यांना ...।
लक्ष-लक्ष आद्यगुरू-चरण-वंदना ...।।
🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🌅🕉🌷🙏

Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "