कवितेचं नाव-🌷" सु-संस्कारांचं सिंचन "...
तारिख - ३० डिसेंबर २०१६
कवितेचं नाव-🌷" सु-संस्कारांचं सिंचन "...
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तेव्हाची गोष्ट आहे ही ...
सर्वां,असं वाटायचं,की ...
जेव्हा पालक आणि पाल्यं,सर्वांनाच,
" गाईड्स "वापरणं, नामुष्कीची गोष्ट,
"कोचिंग-क्लासला"जाणं,शरमेची-गोष्ट ...
जेव्हा शिक्षक,"टुशन्स"साठी धडपडायचे नाहीत,
किंवा तसा सल्लाही विद्यार्थ्याना द्यायचे नाहीत
"शिकवणं"हा एकमेव,"नोबल- प्रोफेशन" ...
असं सर्व-सामान्यपणे,प्रत्येकास वाटायचं ...
वास्तवीक,आजच्या तुलनेत,तेव्हा शिक्षक,
मासिक-वेतनाच्या बाबतीत,खूपच उपेक्षित ...
तरीही,त्यांचं शिकवणं,पोट-तिडीकिनं,
नेहमी असायचं,अत्यंत आपले-पणानं,
आपल्या हातूनच नवीन-पिढी घडतेय ...
भविष्यातही घडणार आहे,
अशा एकाच,उदात्त भावनेनं
भारलेला,असा तो शिक्षक-वर्ग ...
निदान सर्व शाळांमध्ये तरी,प्रामाणिकपणा,
कडक-शिस्तं असूनही मायेचा,आपलेपणा
हेड-मास्तर व शिक्षक यांचं एकमेव ध्येयं,
"उत्तम- विद्यार्थी "चांगले-नागरिक घडवणं ...
त्यामुळं सतत सुंदर कल्पना,
नवं-नवीन गोष्टिंच्या योजना ...
अभिनव प्रयोग,संकल्प,उपक्रम,राबवंणे ...
आधुनिक, नवं-स्पर्धांचं आयोजन करणे ...
सर्व विद्यार्थ्याच्या,सुप्त-गुणांना पारखणे ...
त्यांच्या कलागुणांना,योग्य,प्रोत्साहन देणे ...
त्या काळात " फर्स्ट-क्लासला "...
म्हणजेच साठ-टक्के गुणांना,
खूप मान-सन्मान, मिळायचा ...
कौतुकास-पात्र समजून,
आदरानं पाहिलं जायचं ...
कारण ,९५ टक्के गुण ...
तेव्हा दिले जात नसत ...
गणित,सायन्स,संस्कृत या विषयांत,
पैकीच्या- पैकी, गुण मिळू शकायचे ...
अन्य विषयांत कापून गुण मिळायचे ...
अशा काळात,
आमच्या शाळेच्या,हेड-मास्तरांनी,
विद्यार्थ्याना "मोटिवेट " करण्याची,
एक अभिनव-शक्कलच, लढवली ...
ज्या विद्यार्थ्याला ८० टक्के वा अधिक-गुण,
त्याचं ठळक-नाव शाळेच्या भिंतीवर कायम,
प्रत्येक इयत्तेतील,पहिल्या पाच क्रमांकाच्या,
विद्यार्थ्यात,त्यामुळे चांगलीच चुरस लागलेली ...
की, कोण ही अट सर्वांत आधी पूर्ण करतंय ...
ही चुरस मात्र,फारच" हेलदी "स्वरूपाची होती
" भिंतीवर नाव-लागणे "याचा खरा अर्थ-काय,
समजण्याचं वय नसलं तरी,ते महत्वाचं आहे,
एवढं अस्मादिकांना नक्कीच समजत होतं ...
शिवाय वर्ग- शिक्षक व शिक्षिका माझ्यावरच,
त्यांच्या सगळ्या-आशा होत्या,केंद्रित करून ...
त्यांची मी "फेवरीट"असं सगळ्यांना वाटायचं ...
योगा-योग असा की,आईच्या आशीर्वादाने,
त्याच वर्षीच्या वार्षिक परीक्षेत, ८६ टक्के,
एकूण गुण,अस्मादिकांना मिळालेही होते ...
माझ्या ठळक नावाची, लाकडी- पाटी,
पेंट करून,खूप उत्साहात,बनविली गेली
मुख्य अतिथिंकडून भिंतीवर लावली गेली ...
भव्य समारंभ,कौतुकाची भाषणेही झाली ...
सर्व शिक्षक वर्ग व माझ्या मैत्रिणींना,
प्रचंड आनंद व अभिमानच वाटला ...
थोडी गंमतीची गोष्ट अशी की,
त्यानंतर कैक वर्षे कोणालाही,
त्या भिंतीवर,स्थान मिळालं नाही ...
नंतर ती गोष्ट,साफ विसरून गेले ...
कॉलेजचे सोनेरी दिवसही संपले ...
जॉब,नंतर बिझनेसमधे रंगून गेले ...
यथावकाश मग शुभ- लग्न झाले ...
विशेष अशी घटना म्हणजे,
शाळा हे मतदान केंद्र होते,
माझे सासरचे- नातेवाईक,
मतदान करण्या,शाळेत गेले ...
आल्यावर केवढ्या कोडकौतुकानं,
माझं नाव पाहिल्याचं वर्णन करून,
आल्या-गेल्या प्रत्येकाला होते सांगत ...
मनातल्या मनात, मी आमच्या,
हेड-मास्तरांना,ज्यांची ही मूळ
संकल्पना, कोटी प्रणाम केले ...
धन्य ते मुख्याध्यापक ...
व धन्य-धन्य ते शिक्षक ...
ज्यांनी अविरत श्रम करून,
सु-संस्कारांचंच केलं सिंचन ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment