कविता : 🌷' जगण्याचा खरा आनंद '

तारिख - २४ डिसेंबर २०१६
कवितेचं नाव-🌷" जगण्याचा खरा आनंद " ...
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

हल्ली आपण बऱ्याचदा ऐकतो, पाहतो ...
वयस्क लोकांना मानसिक आजार होतो,
त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना त्रासही होतो ...

त्यात प्रकार जरी बरेच असले,
तरी एक "कॉमन-फॅक्टर"म्हणजे,
एकाकीपणा,जीवनात पोकळी होणे,

"आपण कोणालाही नकोच आहोत"
असे मत होणे,चुकीचा समज असणे ...

त्यातच जर जीवनाचा- जोडीदार,
कालवश होऊन,गेला असेल सोडून ...
तर ह्या धक्क्यातुन सावरून,जीवन 
पूर्ववत जगणं,कठीण होऊ शकतं ...

मुंबई सारख्या मेट्रो-सिटीत,
जागेची टंचाई खास करून ...
मध्यम-वर्गाला न परवडणारे,
जागांचे भाव,गगनाला भिडलेले ...

लोन जरी मिळालं,तरी"ईएमआय "चा हप्ता ...
म्हणजे "नाकापेक्षा,मोती जड"असावा तसा...
दरमहिना पगारातून,२०-२०वर्षे भरणे हप्ता ...

शेवटी,या सगळ्याचं मानसिक दडपण,
जुन्या व नव्या दोन्ही पिढ्यांना वाटणं,
साहजिकच, यावर उपाय मात्र एकच ...

स्वतःला ज्यात निर्भेळ आनंद मिळतो,ते शोधणं ...
किंवा,जे करतो आहोत,त्यातून,आनंद मिळवंणं ...
स्व-आत्मा-रामास नित्यआनंदि अवस्थेत ठेवणं ...

हे ज्याला जमलं,त्याला कोणताही विकार,
मानसिक वा शारीरिक,स्पर्श नाही करणार ...

ज्यांना आधीच रोगानं ग्रस्त केलंय,

त्यांना व त्यांच्या सर्व कुटुंबियांनाच,
मग एक मोठं आव्हानच,उभं ठाकतं ...
ते नक्कीच,पेलता येतं,जर संस्कार,

असतील मौलिक,भर- भक्कम,
मॉरल्स आर क्रिस्टल-क्लिअर ...

" आपलं माणूस "हवंच असणं ...
त्या आपल्या व्यक्तीला जपणं ...
हे आपलं परम -कर्तव्य मानणं ...

जरी ही तारेवरची कसरत करावी लागली,
तरी " पुनर्वास "सारख्या एखाद्या ठिकाणी,

भेट दिल्यास अनेक दुर्दैवी मुलां-मुलींचे,
आई- वडील काय- काय दिव्यं करतात,
कोण-कोणत्या अग्नी-दिव्यांतून जातात,

अशा मुलां- मुलींना,हसत, मोठं करतात ...
त्यांचं आयुष्य " सुखावह " व्हावं म्हणून,

किती आणि कसे धडपडत असतात ...
वैयक्तिक,सामाजिक सर्वच पातळ्यांवर,
खूप त्याग करून,हसत-मुखानं जगतात ...

जर जुनी पिढी,जेव्हा ती " नवीन "होती,
करू शकली, करू शकते,करू शकणार ...

तर तेच"आता जुन्या"झालेल्या पिढीसाठी,
आताची नवीन- पिढी का नाही करणार?
खात्रीनं, नवीन- पिढी नक्कीच करणार ...

कारण,

आत्ताचा प्रत्येक क्षण, पुढच्याच क्षणी,
त्याच्या भूतकाळात रूपांतरित,होणार ...
त्याप्रमाणे, नवीन पिढीही काही वर्षांनी,
जुन्या पिढीत रूपांतरित होणारच आहे ...

हे सूर्य-प्रकाशाइतकं स्वच्छ आहे
हा सृष्टीचा प्राथमिक-नियम आहे ...

ते लवकरात लवकर,स्विकारणं,
नक्कीच चांगलं व भलेपणाचंच...

सर्वच पिढयांसाठी,भविष्यातील
आगामी पिढीसाठी सुद्धा हे एक 
योग्यसं उदाहरण,कोवळ्या वयात,
मनावर, नीट कोरलं जाऊ शकतं ...

जी गोष्ट हजारदा बोलून, 
परिणामकारक नाही होत,
तीच गोष्ट,समोर जिवंत उदाहरण
पाहून,साधू शकते,योग्य परिणाम ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "