कविता 🌷 " निरपेक्ष भक्तिची परिभाषा "

तारिख - रविवार, ११ एप्रिल २०१७
कवितेचं नाव-🌷" निरपेक्ष भक्तिची परिभाषा "...
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 

आज आहे, श्रीहनुमान-जयंती ...
शुक्ल-पक्ष,चैत्र-पौर्णिमा-तिथी ...
शुभ-घडी आली, चित्रा नक्षत्री ...

येती जुळून, अमृत-योग, योग-केसरी
मंगलदिनी मंगल-क्षण, होतसे साजरी 

यंदाच्या वर्षी,ग्रह-मान- योग अगदि आहे तोच  
जणू प्रत्यक्ष हनुमानाच्या जन्म-दिवशीचा योग 

एकशेवीस वर्षांनी पुनः जुळून आले संजोग ...
हनुमान-जन्मसमयीचा हा जणू सुवर्ण-योग ...

अंजनीचा पुत्र म्हणून नाव पडले अंजनेय ...
पवन अथवा वायुचा पुत्र, म्हणून "वायुपुत्र"...

कपि-कुळामध्ये झाला त्याचा पावन जन्म ...
म्हणूनही त्या बालकाचे नाव ठेवले हनुमंत ...

अष्टौसिद्धि व नऊ-निधींचा,श्रीहनुमान दाता  
शक्ति-बुद्धि,सेवा-भाव,त्याग-भक्तिचा त्राता 

शेंदूर चर्चित, गदा-धारी रामाचा परम-भक्त,
जो श्रीरामाचा भक्त, त्यावर हनुमान आसक्त ...

करीतसे कृपेचा वर्षाव, नित सद् भक्तांवर ...
कधी ना करी भेद-भाव, रंक असो वा राव ...

आजच्या दिवशी, भल्या पहाटे स्नानापश्चात
शेंदूर-चमेली-तेल,चांदी-वर्खाने पूजा साक्षात 

कसोटीच्या क्षणी, सर्वांच्या समक्ष छाती छेदून,
हृदयी वसलेल्या, श्री राम-सीतेचं केलं दर्शन !

निरहंकारी, त्यागाची परि-सीमा, 
म्हणजे प्रभूरामचंद्रभक्त हनुमान ...

परोपकारी, शक्तिची दिव्य-ऊर्जा ...
म्हणजे प्रभूरामचंद्रभक्त हनुमान ...

निरपेक्ष अशा भक्तिची परिभाषा ...
म्हणजे प्रभूरामचंद्रभक्त हनुमान ...

अत्युच्च कोटीची स्वामी-भक्ति ...
म्हणजे प्रभूरामचंद्रभक्त हनुमान ...  

बोलो सीयावर रामचंद्र की जय ।।
पवनपुत्र श्री हनुमानजीकी जय ।।

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🌅🕉🌷🙏









Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "