कवितेचं नाव-🌷"सद्गुरू व अध्यात्मिक मार्ग-क्रमण "...
तारिख - ४ जानेवारी २०१६
कवितेचं नाव-🌷"सद्गुरू व अध्यात्मिक मार्ग-क्रमण "...
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
दत्त-गुरुंनी चोवीस गुरू केले ...
प्रत्येकाकडून गुण घेत राहीले ...
माणसाच्या जन्मोजन्मा पासून,
किंवा त्याही खूप आधी पासून,
त्याचा जीवन-प्रवास होतो सुरु ...
त्यामुळं आद्य- गुरूचे स्थान,फार महत्वाचे ...
तेवढेच महत्वाचे स्थान आहे,माता-पित्याचे ...
पुढें- पुढे जीवन-क्रमानुसार,वाढते ...
अन्य गुरूंचे स्थानही निर्माण होते ...
आपापल्या अध्यात्मिक, स्थितीनुसारच,
मोकळा होतो कार्मिक मार्ग,आपोआपच
पुढे होतो त्याचाच विस्तार, आणखीनच ...
गुरू शिष्याच्या व शिष्य योग्य गुरूच्या ...
दोघेही असतात शोधात, एकमेकांच्या ...
नव्हे, ती तशी बहुधा आखणीच केलेली असते
प्रश्न असतो, शोधक नजरेचा ...
आंतरिक तीव्र इच्छा-शक्तिचा ...
जशी जशी प्रगतीची पावलं पडतात ...
अध्यात्मिक वाटचालीत, नवं-नवीन,
ज्ञानी सद्गुरुंहीं उदय पावतच जातात ...
गुरुंकडून जस-जशी ज्ञान प्राप्ती होते,
शिष्याचे,अज्ञान कमी-कमी होत जाते ...
ज्ञान-अज्ञानाची अति-सूक्ष्म-प्रकारे,
देवाण- घेवाण, निरंतर चालू राहाते ...
शिशु-वर्गातून जसे,दहावीत जाऊन
मगच कॉलेजला प्रवेश मिळू शकतो,
ज्ञान-मार्गात, एकेक टप्पा ओलांडून
शिष्य पदवी परीक्षेला पोहोचू शकतो ...
शिष्याच्या प्रगती-नुरूप,
पूर्ण- गुरुंचा उदय होऊन,
तेही शिष्या-पर्यंत येऊन
स्व-खुशीने"ज्ञानदानयज्ञ " ...
पूर्ण- गुरुंची दिक्षा घेऊन,
वाटचाल होते रुंद अजून ...
विशाल सागरा-समान भव्यता ...
नजरेस आली पाहिजेच पेलता ...
मग उदय होतो, अंतरस्थित- गुरुंचा ...
त्वरित विनाश होई,पूर्व-कृत तमाचा ...
प्रत्येक क्षणो- क्षणी मार्ग-दर्शन,
सतत मिळत राहतं अंतर्मनातून ...
पुन्हा विविध पायऱ्यांची चढण,
नेटानं प्रयत्नांती करीता,ती पूर्ण ...
आकाशस्थ गुरुंचं महान-दर्शन ...
नित्य नेमानं,लाभे नजर टाकून ...
नयन झरझर वाहती आनंदून,
हृदयस्थ- गुरु देई आशिर्वचन ...
ज्ञान दरेक पावला-गणिक,
दिशा- ज्ञान करी जागरूक ...
आतुरता शिगेला पोहोचून,
अनुभूती-प्राप्ती रात्रं- दिन ...
काय चूक अन काय बरोबर,
होणारच योग्य- मार्ग-क्रमण ...
अंतर्गत संचित होऊन स्वच्छ,
मनीचं-आभाळ, सदैव निरभ्र ...
भाल- प्रदेशी, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र ...
सर्वकाही,मग एकदम शान्त-पवित्र ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment