कविता 🌷' आठवणींच्या जगात '


तारिख -  शुक्रवार, ७ एप्रिल २०१७
कवितेचं नाव-🌷" आठवणींच्या जगात "...             
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 

लहानपण आठवता तिला आठवते शाळा  
बालपणीचा अविभाज्यं घटक असे शाळा
तिचे सगळे शिक्षक फार-फार होते चांगले,
आजचे हे कवन आहे फक्त सरडे सर यांचे 

ते, तिच्या एका भावाचे-सुरेश अण्णाचे,
मिरजेेचे मित्र-तो शिकत होता, तेव्हाचे    ...
त्यामुळे तिच्यावर जास्तच लक्ष द्यायचे   ...

बालपणी, तिचा आदर्श म्हणजे-शिक्षकवर्ग  
तिला सुदैवाने अत्यंत उत्तम शिक्षकांकडून,
सुसंस्कार,शिक्षण,मार्गदर्शन, सदैव लाभलं  

वास्तविक त्याकाळचे, त्यांचे तुटपुंजे पगार ...
त्यात खाजगी शाळा,विना सरकारीअनुदान

त्यामुळे शिकवण्याची कळकळ असलेलेच
शिक्षक व्हायचे," विद्यार्थ्यांना शिकवण्याचं,
त्यांना घडवण्याचं, ध्येय उराशी बाळगूनच,
अक्षरश: शंभर- टक्के द्यायचे, जीव ओतून

ती चौथीत व सातवी इयत्तेत असताना,
शाळाच निवडायची सुयोग्य विद्यार्थ्यांना,
स्काँलर-शिपची परीक्षा तयारीनं द्यायला,
अन् यथोचित प्रशिक्षणही द्यायची त्यांना !

नंतर परीक्षा-केन्द्रा‌ला न्यायची,
परीक्षा झाली की परत आणायची,
सर्व जबाबदारी त्यांचीच असायची
त्याच काळात ही गोष्ट होती घडली 

तिची शाळा मध्यमवर्गीय कायम गरीब 
पण शिक्षकांचं हृदय मात्र अतिविशाल  
त्यांच्या तुटपुंज्या मिळकती-मधूनही ते,
खर्या आनंदाने विद्यार्थ्यांवर खर्च करायचे

हे पक्कं माहीत असूनही की शाळेकडून,
खर्चाचे पैसे काही परत मिळणार नाहीत 

गंमतीची गोष्ट म्हणजे,

असं असूनही, शिक्षकांत चुरसच असायची
विद्यार्थ्यांना परीक्षेला-कोण नेणार याविषयी

यापुढचा वृत्तांत पाहूया दुसर्या भागात 
व संचार करूया आठवणीच्या जगात  ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले 

🙏🌅🕉🌷🙏















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "