कविता : 🌷"अहो-आईंची "कॉलर ताठ

तारिख - शुक्रवार, १० मार्च २०१७
कवितेचं नाव-🌷"अहो-आईंची "कॉलर ताठ "...              
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

तिचं नुक्तं लग्न होऊन दोनच महिने झालेले ...
लग्नाआधीचा,बिझनेस,ऑफिस सुरु झालेले ...

एकूण फक्त बाराच दिवस ऑफिस बंद होतं ... 
ती ऑफिसला नव्हती, हनिमुनचे दहा दिवस, ...
एक दिवस केळवणामुळं, एक दिवस लग्न ...

काश्मिरहून आल्यापासून,तर ती घरातूनच,
ऑफिसचं काम बघायची, स्टाफला घरीच,

बोलावून दीड तासभर,वेगळ्याच खोलीत,
तिचं, तात्पुरतं झटपट- ऑफिस थाटायचं,
नंतर सर्व स्टाफ कामं घेऊन गेल्यावर मात्र ...

ती नवी-नवेली नवरी, सून, वहीनी सर्व काही ...
रोल-मध्ये शिरायची, अगदी सराईता सारखी ...

एकदा बडोद्याहून,महत्वाचे पाहूणे आलेले ...
त्यांना लग्नाला हजर रहाणे, नव्हते जमले ...

ती रोजच्यासारखी तिच्या"टेम्पररी ऑफिसमधे"...
स्टाफ-कडून रिपोर्ट घेऊन, त्यांना त्यांची कामे,
देण्यात मग्न होती, तिला काहीच माहित नव्हते ...

इकडे तिच्या सासूबाई, झालेल्या टेन्स ...
एव्हाना,बिझनेस करणारी सून,ही गोष्ट ...
सर्वांना माहित झालेलीच होती नात्यात ...
त्यामुळेही सगळ्यांना उत्सुकता होतीच ...

लग्न-घरी आलेली,वडीलधारी पाहुणे-मंडळी,
नविन जोडप्याचा, नमस्कार-चमत्कार नाही, ...
असं पाहिल्यावर, त्यांची चूळबूळ सुरु झाली ...

त्या दिवशी,नवरोबाला ऑफिसला जायला,
बराच अवधी होता, म्हणून तो घरीच होता ...
त्यामुळं पाहूण्यांना दिसत होता,फक्त नवरा,
पण नवीन नवरी मात्र त्यांना कोठेच दिसेना ...
 
याच गोष्टीचं त्यांना आश्चर्य वाटलेलं,
अन त्यांच्या मनात कुतूहल दाटलेलं ...

बडोद्याच्या पारंपारिक वातावरणात,
वाढलेली जुन्या विचारांची ती माणसं ...

शेवटी एकानं, हिय्या करून विचारलं ...
"नवीन सूनबाई कुठं दिसत नाहीत बरं ...
त्यांचं थोडं फार,कौतुक करायचं होतं "...

"त्यांनी जोड्यांनं नमस्कार केल्यावर,अहो,
 त्यांना दोघांना, आशिर्वाद द्यायचे होते हो "...

"बाकी आम्ही जुनी-पानी खोडं,
काय देणार अहो त्यांना अजून "...
नवीन पिढी, दोघे हुशार आहेत "...

आधीच,तिनं सूचना दिल्या होत्या ...
ऑफिसचं तासभर काम करताना,
"नो डिस्टर्बन्स प्लीज,असं समजा,"

"मी येथे नसून फोर्ट-ऑफिसला गेले आहे "
नंतर मात्र पूर्ण दिवसभर,ती मोकळी असे ...
त्यामुळं सगळेच थोडेसे अवघडलेले होते ...

अखेरीस नवरोबानंच शक्कल लढवली ...
हळूच बाहेर जाऊन तिलाच फोन केला, ...
आणि,थोडक्यात परिस्थिती सांगितली ...

ती म्हणाली," इश्यं एव्हढंच ना ? ...
पाच मिनिटात येतेच मी बाहेर ...
करू जोडया-बिड्यानं नमस्कार "... 
आता बिल्कुल नको करू चिंता "...

म्हणताना तर म्हणून गेली,
मग तिच्या लक्षात आलं की,
ती तर पंजाबी ड्रेसमधे होती ...

वयस्क-मंडळींना,साडी नेसलेली ...
नवीन सूनच फक्त अपेक्षित होती ...

काहीतरी कल्पना,लढवायलाच हवी होती ...
तिनं पटकन् निर्णय घेऊन, पावलं टाकली ...

याच परिस्थितित संपतो पहिला भाग ...
नंतरची धमाल बघूया पुढच्या भागात ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏�🌅🕉🌷🙏






Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "