कविता : 🌷 ' उघड नयन देवा '
तारिख - २६ सप्टेंबर २०१६
कवितेचं नाव-🌷" उघड नयन देवा "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
आज सहजच विचार डोकावला ...
आता जर ईश्वर फिरुनी जन्मला,
किंव्हा देव-रुपात पुन्हा अवतरला,
पृथ्वी-तलावर सर्व ठीक करायला ...
किती मेहनत घ्यावी लागेल त्याला,
जाड गेंड्याची कातडी असलेल्या,
आजच्या समाजास सरळ करायला ...
सत्-युगातील मूल्यं गळी उतरवायला ...
देव-परमेश्वर वगैरे तो असला तरी,
त्या परलोकातला, येथील ही मंडळी
सगळी, मोडता घालण्यास टपलेली
त्यांचं नेमकं हेच काम आहे 'असली' ...
ते स्वतः काहीही करणार नाहीत,
दुसऱ्यालाही करू देणार नाहीत ...
नुसती चर्चा-सत्र करुन आयोजित,
बसतील दुरून सारी मजा चाखीत ...
भगवन्ता, तुझा काळ होता चांगला ...
मनुष्य अजून "माणूसच " होता भला !
आज त्याचा तोलच आहे पार सुटला,
पशु व मानव दोहोंत फरकच ना उरला ...
तू तर मेहनतीनं बनवलंस मनुजा,
तुझी फसवणूक कशी झाली बा ?!
आम्ही पामर भोगतो आहो सजा ...
सर्वजण खुशाल मारताहेत गमजा ...
यावर एक उपाय योजना म्हणून,
काहींतरी चमत्कारच कर दणकून ...
उघड आता, ढोंगी कुटीलांचे नयन ...
तेंव्हा कुठं जरा जिवास वाटेल चैन ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🌅🕉🙏🌷
Comments
Post a Comment