कविता : 🌷" मुद्दतें हो गयीं "...

तारिख - ७ जानेवारी २०१७
कवितेचं नाव-🌷" मुद्दतें हो गयीं "...
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

रियुनियन-कार्यक्रमाचा "डी-डे " उगवला ...
सारी रात्र जागून,विश्वासनी हॉल सजवला ...

मुंबईला,लाम्बून आलेली मंडळी,
आदल्या दिवशीच पोचली होती ...

पुणे,गोवा,नाशिक,सोलापूर,चिकमंगळूर,
येथपासून आलेली मंडळी,होती जोशात

ठरलेल्या वेळी सकाळीच,जमले सर्वजण 
फोटोग्राफर,लाईट्सपासून, म्युझिकपर्यंत,
सगळ्या गोष्टिंचं उत्कृष्ट होतं व्यवस्थापन  

प्रवेश-द्वारी अत्तर,गुलाब-जलाचा छिडकाव 
थोडं पुढे, सुगंधी फुलं-पाकळ्यांचाच वर्षाव 

त्यापुढं पुरुषांना एक-लाल-गुलाब,भेट
स्त्रियांना मोगऱ्याचा मस्त- गजरा-भेट

त्यानंतर वाईच्या-कंदी-पेढ्याचा पुडा,
थाट पाहून, लग्नाचा घाटच आठवावा

हॉलमधे सनई,चौघडा,तबला,संतूर ...
कानांवर पडत होते यांचे मिश्र-सूर ...

हॉल मोठा होता म्हणून,त्याच्या अर्ध्या-भागात,
मांडणी,लोड-तक्क्या-गाद्यांची भारतीय बैठक
दुसऱ्यात, टेबल-खुर्च्या-ट्रे अशी विदेशी पद्धत

विश्वास, रमेश व अस्मादिक आयोजक ...
त्यामुळं प्रत्येकाचं जातीनं,आगत-स्वागत ...

स्वागत करून आगतास,
नाष्टयाच्या भागात नेऊन,
पाणी,सरबत,कैरीचं पन्हं,
मठ्ठा,लस्सी अथवा पियुष ...

नाष्टयात साबुदाणा खिचडी,
उपमा व बटाटा पोहे,चटणी
असा बेत अस्सल ब्राह्मणी ...

गप्पा मारत, न्याहरी करून,
सर्व झाले जेव्हा स्थानापन्न,

सगळ्यांच्याच प्रेमळ- आग्रहांनं,
अस्मादिकांनी केलं,सूत्र-संचालन ...

सर्वप्रथम जे आम्हा सोडून,महा-प्रवासा गेले,
त्या सर्वांना स्मरून,दोन मिनिटं,प्रार्थना केली 

मग उपस्थितांना एकेकास बोलावून,
ठळक माहीती माईकमध्ये,विचारून,
तो एक गंमतीचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम ...

नंतर जोक्स,कविता वाचन ...
कथा-कथन असे मनोरंजक
भाग होताच,जेवणाची पंगत ...

आमरस-पुरी,डाळिंब्यांची उसळ,मसाले-भात,
रायतं,खमंग काकडी,चटणी,अळू व पंचामृत
साग्र-संगीत पण सगळ्यांना आवडेलसा बेत 
प्रत्येकास आग्रहानं वाढण्याचं आवडतं काम,
अस्मादिकांचं ...

सगळ्यांना विडा,तंबुल,मुखवास,बडीशोप
सर्व काही हवं-नको देऊन, शाळेचा स्टाफ,
सफाई कर्मचारी,इत्यादींना,मग वाढून दिलं ...

मग ग्रूप-फोटो काढले,
सर्व-वेळ फोटोग्राफर,
विविध क्षण टिपतच,
होता व कॅमेऱ्यात बंद
होता,त्याना करून ठेवत ...

नंतर गप्पा,भेंड्या, गाणी अंताक्षरी ...
म्युसिकल-चेअर अशा खेळांची बारी

संध्याकाळी चहा,कॉफी,समोसा,खमण
अन गरमागरम बटाटे-वड्याचा आस्वाद
एकूणच जमलेली मंडळी एकदम खुश
शेवटी आभार-प्रदर्शन चार शब्द बोलून

प्रत्येकास कार्यक्रमाची गोड-स्मृती म्हणून
आमचा अकरावीचा ग्रुप-फोटो लॅमिनेटेड,
नवा ताजा-ग्रुप-फोटो,खाऊ व मेमरी-बँक,

दरवर्षी आता नक्की भेटण्याचं प्रॉमिस ...
या " नोटवर " लांबच्यांनी निरोप घेतला ...
जवळच्यांनी अधिक वेळ गप्पा मारल्या

खूप छान रंगला कार्यक्रम
जसा व्हायला हवा, तसाच
तो प्रत्यक्षात झाला म्हणून
आयोजनाचं खूप समाधान ...

आम्हाला, क्रेडिट सगळ्यांनी जरी दिलं,
तरी मुख्यतः विश्वासच त्यास होता पात्र,
माझी आरतीला फक्त,चार बोटांची साथ ...

आज जर मागे वळून पाहिलं,तर
त्या ग्रुप- फोटोत असलेल्यांतून,

कमीत- कमी पाच-सहा जण
हे जगच सोडून गेलेले आहेेत ...

अगदी उत्साहाचा धबधबा, 
असलेल्या विश्वास- सकट
गोड-गळ्याच्या शशी- सकट ...

खटाटोप करून,
ज्यानं गोड-आठवणींचा हा संग्रह दिला,
तो विश्वास सुद्धा,
त्याच्या कॅन्सरच्या लढाईत कामी आला ...

आज सोचा तो आंसू भर आए ...
मुद्दतें हो गयीं, हम सबसे मिलें ...




Comments

Popular posts from this blog

कविता - 🌷 " परी या-सम-हा " तारिख - १० डिसेंबर २०१६

कविता 🌷 " एहसास "

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025