कविता : 🌷 ' भाबडं विश्व '

कविता : 🌷 ' भाबडं विश्व '         
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, १२ जुलै २०१२  
वेळ : संध्याकाळी, ७ वाजून १९ मि.

ऊनं-पावसाचा खेळ चाले अखंड गं श्रावणात, 
किती किती आठवांवं मनं गुंतलं उंच झोक्यात 

नभ गेले झाकोळून दिशा साऱ्या गं अंधारल्या
टपोर्या थेंबांच्या गं सरी भुमी-वरती बागडल्या...

त्याच सरींच्या गं संगे नाचू लागते माझेही मन, 
पावसाच्या थेंबोथेंबी मनं झिम्माड ओलं चिंब !

घरा-समोरील तो रस्ता होता अरुंद उताराचा,
धुव्वांधार पावसात, वाहे ओहळ गं पाण्याचा ...

हिरव्या नाजुक पानांनी नटला तो गुल-मोहर,
अंगणात अंथरली जणू लाल चादर गं मनोहर...

लाल धुतल्या कौलारी, पागोळ्यांची ओघळंण
भातुकलीच्या बोळक्यात, त्याची सये साठवंण

नवं वर्ष, नवा वर्ग, नवे कोरे बूट, नवा रेनकोट 
सगळा आनंदच असे, नवा कोरा गं सारा थाट

श्रावणाच्या सोमवारी अर्ध्या दिवसाची गं शाळा 
सणावाराची मज्जा-आईच्या खमंग पुरणपोळ्या

गच्चीवरती खेळताना इन्द्र-धनु नभी उंच दिसे,
सप्त-रंगांच्या आठवाने आजही गाली येई हसे...

पावसाच्या धारांसंगे कित्ती दूर गेले, वेडे हे मन
भानावर येऊन बघता पडलं होतं गं लख्खं ऊन्ह

सदा मना लागे गं ओढं, चिंब-चिंब त्या पावसाची...
कशी फिरुनं मी जाऊ, आता लाज वाटते जनाची 

नशिबानं हाती जर " काल-यंत्र " लागेल गं माझ्या,
भुर्रकन् भरारी घेऊन, जाईन विश्वात बालपणीच्या...

भाबंड्या गं आठवणी, भाबडं-लोभस ते लहानपणं 
भाबडं ते विश्वंच सारं, नको नको गं बाई मोठ्ठं होणं ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆























Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "