Posts

Showing posts from March, 2024

कविता -🌷 ' महान् संस्कृती ' तारिख - रविवार, २४ मार्च २०२४

कविता -🌷 ' महान् संस्कृती ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - रविवार, २४ मार्च २०२४ वेळ - संध्याकाळी, ५ वाजून ३७ मि. गुलाबी-गुलाबी गोड-थंडी धूम पळाली रे पळाली ... होळी-फाल्गुन-पौर्णिमेची, आज आली हो आली ... सारेजण उत्सुक, लाकूड-फाटादी करण्या गोळा, टाकाऊ सामान-गोवर्या जमवा-जमवीसाठी पळा ... सूर्यास्त होताच लहानथोर-सर्व उत्साहाने जमती, पूजा करुन फेर धरती, होळीच्या अवती-भोवती ... तरुण मंडळी जेव्हा करिती होळी-निमित्त शिमगा, नाव घेऊन"बैलाला ढोल"असा, तेही दाविती इंगा ! दैत्य-हिरण्यकश्यपूने महाभयंकर कट होता रचला, होलिकेमार्फत जाळून मारण्याचा, भक्त प्रल्हादाला ... हिरण्यकश्यपूचा दुष्ट डाव भगवंतांनीच उलटविला, होलिका-दहन करुन, भक्त-प्रल्हादाला वाचविला ! स्वयं नृसिंह-अवतारात पोट फाडून, राक्षस वधीला ... परम विष्णू-भक्त-प्रल्हादाचा जीव पुनःपुन: रक्षिला ! त्याचा आनंदोत्सव साजरा करण्या, होळी-रंग-पंचमी ... मतभेद-हेवेदावे पूर्ण विसरुन-निखळ आनंदाची हमी ! सुग्रास पुरणपोळीच्या भोजनाने सर्वजण होती तृप्त ... शत्रुता विसरुन गळाभेटीने शत्रुत्व संपून, होई लुप्त ! अशी महान् हिंदू संस्कृती,...

कविता - 🌷 " जीव जेथे गुंतला " तारिख - १० नोव्हेंबर २०१६

कविता - 🌷 " जीव जेथे गुंतला " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १० नोव्हेंबर २०१६ जीव जेथे गुंतला ... तेथेच लागला लळा  जलात सुगंधी वाळा ... सदा प्रेम लाभे प्रेमळा ... जीव जेथे गुंतला ... तेथे अरुणोदय झाला प्रेमाचा सूर्य उगवला ... भक्तिचा उजेड पसरला ... जीव जेथे गुंतला ... गौमातेस पान्हा फुटला वासरु झेप घेई दुग्धपानाला गायीसह बछडा, तृप्त झाला ... जीव जेथे गुंतला ... काडी काडी केली गोळा ... खोपा, पिल्लांसाठी केला ... "आ"वासलेल्या पिल्लाला, दाणा-दाणा तिनं भरवला ... शब्द जरी एकच "जिव्हाळा", दरेक नात्यातील भाव निराळा ... माय-लेक मायेचा ओलावा, पिता-पुत्र-पुत्री लाडाचा सोहळा ... भावा-बहिणीच्या नात्यात, सूक्ष्मभाव जे स्पर्शती काळजाला ... देवानेच तिच्या रक्षणा योजिला-सदैव ढाल होऊनी लढायला ... प्रियकर-प्रेयसीच्या नात्याला, हा तर असे " दिलका मामला " विधात्याने तरल-भाव निर्मिला, जीव ओतून प्रेम करायला ... पती-पत्नीच्या नात्याला, जणू भगवंतच बांधे ब्रह्म-गाठीला ... प्रेम-ओढ-कर्तव्य-भावनेच्या त्या स्वर्गीय पवित्र-बंधनाला ... लेकरं असती सोबतीला, तेव्हाच ...

कविता - 🌷 " आप-पर-भाव " तारिख - २५ ऑगस्ट २०१६

कविता - 🌷 " आप-पर-भाव " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २५ ऑगस्ट २०१६ झुंझु-मुंझु झालं आणि, गोड साद आली कानी, धुंद-मधुर त्या स्वरांनी ... काळजाचं झालं पाणी ... माध्यान्हीच्या शांत वेळी,  द्वाड कान्हा, शीळ घाली ... खट्याळ हरीच्या खोड्यांनी, पुरती बावरली  राधा-भोळी  ... तीन्ही सांज होऊ घातली, गायी-वासरे घरा परतली ... ऐकूनी कान्हाची मुरली, सृष्टीही देहभान विसरली ... रजनीचा प्रहर काळा, सावळाच तो घन-निळा ... राधेलाही विसर पडला ... आप-पर-भाव मिटला ... कोण ही राधा अन् कोण कन्हैया ... कोण देवकी, कोण यशोदा मैय्या ... कणा-कणात आहे, सुंदरसे स्वप्न मना-मनात नांदे  सदा  राधा-कृष्ण ... राधा-कृष्ण गोपाल-कृष्ण... राधा-कृष्ण गोपाल-कृष्ण... युगानु-युगांपासून चालत आला हा खेळ ... प्रत्येक स्त्री-पुरुष जणू राधा-कृष्ण-मेळ ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता -🌷 " माणूस नावाचं बेट " तारिख - ९ नोव्हेंबर २०१६

कविता -🌷 " माणूस नावाचं बेट " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - ९ नोव्हेंबर २०१६ माणूस नावाचं बेट ... आहे अगदी मुंबा-पुरीसारखं ... पाणी चहू दिशांना,  पण पिण्या-योग्य पाण्याचा ...  सदा-अन-कदा अभाव ... जणू माणसांचा महा-प्रचंड पूर,  पण सद्-जनां चा अभाव ... माणूस नावाच्या बेटावर  रेतीच्या कणागणिक, माणसच माणसं ... अगणित... अनंत ... चहू-बाजूंनी वेढलेल्या, अथांग सागरा-समान ... जिकडे-तिकडे,  माणसच माणसं ... माणसांना नाही तोटा ... पण माणुसकीचा मात्र अभाव ... तुटवडा ... माणूस नावाच्या बेटावर ... माणूस म्हणजे एक-कोडं ... सुटेल- सुटेल असं वाटतं ... पण उलगडत नाही ... उकलंत नाही ... का ते उमंजत नाही ... माणसं वाचण्याचा छंद चांगला ... वाचता- वाचता अवघे आयुष्य, केव्हा सरेल ... पत्ताच लागणार नाही ... पण पानं मात्र अनंत ... कधीच संपणार नाहीत... माणूस नावाच्या बेटावर, माणूस म्हणजे भला-मोठा हिम-नगं ... पाण्यावर अलगद तरंगणारा ... जेव्हडा डोळ्यांना दिसतो, त्याच्या कैक-पटीनं  पाण्याखाली  गुपचूप दडलेला ... असं हे माणूस नावाचं बेट ... निसर्गाचा एक अचाट व अफाट नमुना ... ?...

कविता-गझल 🌷 ' सुखाचे हळवेे क्षण ' तारिख - बुधवार, २० मार्च २०२४

कविता-गझल 🌷 ' सुखाचे हळवेे क्षण ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - बुधवार, २० मार्च २०२४ वेळ - दुपारी, २ वाजून ३२ मि. तारुण्य सळसळते, डोळे अधीर ओले ... मन लाजाळुचे पान, अलगद मिटून गेले ... ओझरतेसे स्पर्श, लज्जेची लाली पसरे ... सांज रंग अवतरताना, अंग-अंग मोहरे ... सुखाचे आजपावेतो, मनोरे रचून झाले ... साखर झोपेतले रम्य, स्वप्नही भंगून गेले ... रात्र नाहीच सरली, पण स्वप्न विरुन गेले ... सुखाचे ते हळवेे क्षण, वेचायचे राहून गेले ... सुखाचे ते हळवेे क्षण, वेचायचे राहून गेले ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆    

कविता- 🌷 ' पोच ' तारिख - सोमवार, ११ मार्च २०२४

कविता- 🌷 ' पोच ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - सोमवार, ११ मार्च २०२४ वेळ - संध्याकाळी, ५ वाजून ११ मि. कित्येकदा अनवधानाने चुका होतात ... कधी दुर्लक्ष केल्याने, बेफिकीर वृत्तीने तर कधीकधी चिडून, लागट बोलण्याने बोलणारा बोलतो पण वर्मी घाव होतात ... मुळात आपल्या वागण्यावर, वाणीवर ताबा सुटल्याने असे अपघात घडतात ... हे जर दुसरा कोणी वागला असता तर ? इतरांसाठी मात्र वेगळे नियम असतात ... बालपणी लहान म्हणून, माफ करतात ... किशोरावस्थेत'अर्धवट' म्हणून सोडतात ... पण मोठेपणी सुध्दा जो वागेल बेदरकार, त्या गोष्टीला मात्र माफी नाहीच सरकार ! थोडक्यात काय तर विचार हवा, वागण्या-बोलण्या आधीच ... हातून बाण सुटाण्याआधी सावरणं हवं ! फार सोपं असतं, मित्राला शत्रू बनवणं ... पण शत्रू पुन्हा मित्र बनणं, कर्म-कठीण ... दुसऱ्याकडून जी अपेक्षा वागण्याबद्दलची तीच वागण्याची पद्धत अवलंबवायला हवी मैत्रीतील जुजबी वाद, लगेच मिटायला हवे किरकोळ बाबींचं स्तोम माजवता कामा नये झालं गेलं पार विसरुन, आनंद द्यावा-घ्यावा ... त्यासाठी " नीर-क्षीर-विवेक " मुळातच हवा ... प्रत्येक क्षण-न्-क्षण भरभरु...

कविता : 🌷' पोकळी ' तारिख : शुक्रवार, १७ मार्च २०२३

कविता : 🌷' पोकळी ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : शुक्रवार, १७ मार्च २०२३ वेळ : दुपारी, ३ वाजून ३९ मि. मन हे प्रयोगशाळा कुणी ही यावं प्रेम करावं जो तो प्रितीचा भुकेला ll धृ ll  ज्याची त्याची मनं निराळी मनामधली भकास पोकळी ‍ वरवर हसून तो जगला तरीही, जो तो एक-अकेला ll १ ll  जो तो स्वतः, मनीचा राजा विहिरीतूनच बघतोय जगा, डराव-डराव करुन थकता, दोष तो देईल स्व-नशिबाला ll २ ll  नक्की न कळलं, काय करावं ? कुणाला कसं हे बरं सांगावं ? सहचराला कसं ओळखावं ? जो तो गुरफटलेला ll ३ ll  @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆  

कविता : 🌷' मंगलमूर्ती ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : बुधवार, ७ जून २०२३

कविता : 🌷' मंगलमूर्ती ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : बुधवार, ७ जून २०२३ वेळ : १२ वाजून १४ मि. कृष्ण-पक्षात येणारी चतुर्थी म्हणजे 'संकष्ट'चतुर्थी कठीण प्रसंगातून सुटका करणारी म्हणून 'संकष्टी' प्रथम पूज्य-गणेशाचं पूजन-वंदन आणि पुष्पवृष्टी  उकडीच्या मोदकांच्या नैवेद्याने गणरायाची संतुष्टी शुक्ल-पक्षातल्या चतुर्थीला म्हणतात ' विनायकी ' मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला म्हणतात 'अंगारिकी' दुःखापासून मुक्तीसाठी भक्त संकष्टीचं व्रत करतात सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास-पूजा करतात ! सात्विक आहार-विचारांनी वाढतं आंतरिक मनोबळ संकटांशी दोन हात करण्यासाठी, अंगी संचारतं बळ मनाची अशांती-अस्वस्थता-असुरक्षितता काढती पळ जीवनातील कूट-समस्याही मग आपसुक होती सरळ ! अत्यंत चतुर अन् कुशाग्र-बुद्धीचा गौरी-पुत्र-गजानन हसत-हसत जिकलं त्यानं पृथ्वी-प्रदक्षिणेचं आव्हान जरी निघाला मयूर-वाहनावर कार्तिकेय जलद-गतिने शिव-पार्वतीला-प्रदक्षिणा घातली बुद्धिशाली गणेशाने ! महाकाय मंगलमूर्ती आरुढ होऊन मूषक वाहनावर दूर करतो सगळी विघ्नं म्हणून आनंद पसरतो भूवर प्रिय दुर्वांकुर व...

कविता - 🌷 " व्यथा- सिकंदरची " तारिख - २९ नोव्हेंबर २०१६

कविता - 🌷 " व्यथा- सिकंदरची " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २९ नोव्हेंबर २०१६ एखाद्या ध्येयानं पार पछाडून जाणं ... म्हणजे स्वतःला सिकंदर समजणं ... जगज्जेता बनण्याच्या एका स्वप्नानं ... त्याच्या आयुष्याला जंगजंग पछाडलं ! या एका गोष्टीने त्यास पुरतं वेडं करुन टाकलं ... जिंकण्याचं वेड त्यानं त्याच्या सैन्याला पटवलं ... अन् वेड लावून लढायला जय्यत तयार केलं  त्या एका अट्टाहासासाठी उभं आयुष्य वेचलं ... स्वतःचं आयुष्य व संपूर्ण  सैन्यातल्या प्रत्येकांचच आयुष्य, होरपळवलं ... सरते-शेवटी त्याचं आयुष्य, एक सजाच होतं बनलं ... मृत्यू-शय्येवर, मरणाची वाट पाहात ... स्व-मातृभूमी पासून लाखोंमैल दूर स्व-प्रिय-जनां पासून योजने दूरवर स्वतःच्या आयुष्याचा चित्रपट पाहात ... किती- किती देशांना जींकले,  किती- लाखों जणांना मारले, किती रक्ताचे पाट वाहवले ... किती- लोकांना बंदी बनवले, किती- किती खजिने लूटले ... काय संपत्ती,पैका हिसकावले ... किती सोनं- नाणं गोळा केले ... किती शिव्या- शाप पचवले ... किती असहाय जना लुबाडले ... आयुष्याचा होम करून,काय मिळवलं ... काय गमावलं, याच्या हिशोबाचं गणित ...

कविता - 🌷 " सुसंस्कारांची शब्दांजली " तारिख - सोमवार, २४ जून २०१७

कविता - 🌷 " सुसंस्कारांची शब्दांजली " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - सोमवार, २४ जून २०१७  मातृभाषेचे ते शब्द-वैभव अनुभवुनी, ऊर अभिमानाने अक्षरशः येतो भरुनी... मराठी-मनाचा हर्ष सदा दुथडी भरूनी... अति-आनंदाने जाई पुरताच ओसंडूनी ... परि,  इंग्रजाळलेल्या पिढीची अशुध्द बोली... ऐकून नेमकी भाषा कोणती, शंका येई  माय-मराठीची ती भ्रष्ट-बोली ऐकूनी,  प्रत्येक काळजाचं होई, "पाणी-पाणी"  चार-चौघात मातृभाषेची बूज न राखी,  ही जन-मानसाची व्यथा-बोचरी-दुखरी  तोडकं-मोडकं इंग्रजी बोलून धन्य होणे... कुबड्या घेत, काय जीणे ते लाजिर-वाणे जगभर या लोकांचे, होत्याचे नव्हते होते... तेंव्हा मात्र त्यांच्या "तोंडचे पाणीच पळते"...! माय-बोलीचा सन्मान करण्याचे सुसंस्कार... खात्रीनं बाल-मनांस देतील सुयोग्य आकार ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले  🙏🕉️🔆

कविता - 🌷 " मोहक स्वप्नं त्या दोघांची "... तारिख - २७ सप्टेंबर २०१६

तारिख -२७ सप्टेंबर २०१६ कविता - 🌷 " मोहक स्वप्नं त्या दोघांची "... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले आटपाट शहरात एक असतो तो ... अन त्याच शहरात एक असते ती ... तो असतो उंच-निंच देखणा छान ... ती नाकीडोळी नीटस, गोरीपान ... पहिल्या-वहिल्या नजर-भेटीत ... दोघे एकमेकांचे होऊन जातात ... मग मात्र जरा उतावीळ होतात ... शुभलग्न-मुहूर्ताची वाट बघतात ... शेवटी एकदाचा इंतजार संपतो ... चांगला लाभणारा मुहूर्त निघतो ... लग्नाचा शुभ-दिवस उजाडतो ... अन विवाह-सोहळा आरंभ होतो ... गौरीहार-पूजनाच्या वेळी,  " तिच्या " मनातील भाव-तरंग ... सनई-चौघड्याचे मिश्र-सूर ... हृदयी सम्मिश्र कालवा-कालंव ... सुख-दुःखाच्या भावांचं अनोखं मिश्रण ... ओठावर हसू अन मनी हुरहूर  अंतरी ख़ुशी पण डोळ्यांत गहिवर ... नेत्रातून संतत पाण्याचा पाझर ... आनंदाश्रूं-वियोगाश्रु वाहती झरझर ... एकीकडे वाटे मिलनाची अपार ओढ ... दुसरीकडे आप्तांचा अचानक वियोग ... विवाह सोहळा संपन्न होतांना "त्याचं " तरल-भाव-विश्व... आज माझ्या आयुष्याचं पूर्णत्व ... इतके दिवस दैव पाहत होतं सत्व ... पण न ढळू दिलं मी माझं स्वत्व ... यापुढं ति...

कविता : 🌷'स्त्री-जन्मा-ही-तुझीच-कहाणी !' तारिख : १ वाजून २६ मि.

कविता : 🌷'स्त्री-जन्मा-ही-तुझीच-कहाणी !' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : ८ मार्च २०२३ वेळ : १ वाजून २६ मि. "अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा"  "पंच कन्याम् स्मरेन्नित्यं महापातक नाशनम्"  ब्रह्म-पुराणामधे स्त्रीच्या पाप-नाशनासाठीचा हा मंत्र आहे खास ! अनादि-अनंत कालापासूनच अन्याय-अत्याचार-शोषणादि त्रास, मुकाट्याने सोसून, मानसीक छळ, बदनामी व कष्ट-प्रद वनवास,  गौण, दुय्यम-स्थानीय-वागवणूक आणि वर सक्तीचा एकांतवास ... प्रत्यक्षात अपराधी नसताना 'पापी-अपराधी-ठरवून' अवहेलना, आज मात्र त्यांच्या नावांचा मंत्र जपतात, करण्या पाप-नाशना ! देव जाणे, स्त्रीनं कशा सहन केल्या मानसीक-शारिरीक यातना ... आज विचार कर-करुनही, नाही येणार त्याची सुतराम कल्पना ! त्याकाळच्या पुरुष-प्रधान-संस्कृतीची हीच विपरीत विचार-सरणी, शाप-उ:शाप-अपमान-उपेक्षा-कलंकादि भडीमारानं केविलवाणी, आंतरिक सहन-शक्ती, कणखर वृत्ती व अविरत जिद्द लावून पणी, युगानु-युगांपासून चालत आलेली स्त्री-जन्मा-ही-तुझीच-कहाणी ! वास्तविकत: स्त्री-जन्म आणि स्त्रीरुप म्हणजेच मूर्तिमंत वात्सल्य,  स्त्री म्हणजे...

कविता - 🌷 ' आहे कोण ? ' ‌‌तारिख - शनिवार, २ मार्च २०२४

कविता - 🌷 ' आहे कोण ? ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - शनिवार, २ मार्च २०२४ वेळ - दुपारी, ४ वाजून २५ मि. भूs-भूs-भूs-भू कोण करी ? लक्ष दिलं की, शेपटी हलवी ... चेंडू फेकताच दौडत जाई ... क्षणातच शोधून, घेऊन येई ...! वेळ जर झाली, जेवणाची ... दरदर-खेचत-खेचत घराकडे येई ... घराच्या बाहेर खुट्ट वाजलं जरी, वरच्या पट्टीत, मग आवाज करी ... घरात कुणी जर आजारी असेल, त्याच्या उशाशी, तो शांतपणे बसेल ... त्याच्यावर घराची पूर्ण जबाबदारी ... घराचा सच्चा तो पहारेकरी ... फिरण्याची येता त्याला हुक्की, आणून देतो, गॉगल्स-बूट-टोपी ... समुद्र म्हटला की स्वारी होते खुश ... डुंबत असताना, उठण्यास नाखूष ! रेतीत गोलांट्या उड्या मारी ... "बंटी छू" म्हणताच, झडप घाली ... सांगा पाहू, हा आहे तरी कोण ? अर्जुनचा मित्र पण चोरांचा दुष्मन ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता : 🌷 ' प्रेरणा ' ‌ तारिख : बुधवार, ८ मार्च २०२३

कविता : 🌷' प्रेरणा ' कवयित्री तिलोत्तमा विजय लेले तारिख : बुधवार, ८ मार्च २०२३ वेळ : १२ वाजून ३० मि. जगभरात स्त्रीला समान-वेतन, मतदान-हक्क नव्हता मिळाला... 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमधे स्त्री-कामगारांनी मोर्चा काढला, त्यास्मरणार्थ हा`जागतिक-महिला-दिन' म्हणून स्वीकारला गेला... जागतिक स्तरावर स्त्री-हक्कांसाठी हा दिवस साजरा केला गेला... स्त्रियांसाठी हा दिवस सन्मानाचा, अभिमानाचा तसेच आनंदाचा... डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, अंतराळवीरा होऊन, गाजविण्याचा... सावित्रीबाई फुले, डॉ.आनंदीबाई जोशी आदि सर्वांना स्मरण्याचा... त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, स्वकर्तृत्वाने जीवन सफल करण्याचा ! युगा-युगात पुरुषांनी स्त्रीला कायम दुय्यम स्थानी मानले वर-वरच्या मान-सन्मानाखाली सर्रास कैक अन्याय केले ! कुशाग्र बुद्धीच्या चाणक्यांनी, स्त्रीचे सुप्त-गुण होते हेरले... स्त्री-प्रगती हीच समाज-प्रगती हे चाणक्य नीतीत कथिले ! स्त्रीविना कुटुंब पूर्ण होत नाही, सुदृढ कुटुंबांशिवाय समाज नाही... संयम, धैर्य, जिज्ञासा-अखंड प्रेमाचा व प्रेरणेचा स्त्रोत असते स्त्री, सुशिक्षित, कर्तबगार, हुशार स्त्रीमुळे कुट...

कविता : 🌷 ' चौफेर प्रतिबिंब शिवाचे ' तारिख : १८ फेब्रुवारी २०२३

कविता : 🌷 ' चौफेर प्रतिबिंब शिवाचे ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : १८ फेब्रुवारी २०२३ वेळ :. १० वाजून १० मि. शिव-शक्तीस समर्पित दिन हा अति-पवित्र ... शिव-पार्वती विवाह म्हणून 'महा-शिवरात्र' ! पुष्प, चन्दन, भस्म, जलाभिषेक, बिल्वपत्र ... झळकतो वैश्विक उर्जेचा प्रचंड स्रोत सर्वत्र ! अथक प्रयत्नान्ती भगीरथ घेऊन आला, थेट स्वर्गातून पृथ्वीवरती आणले गंगेला ! शंकराने त्वरित जटेत धारण केले तिला,  म्हणून 'गंगाधर' नावानं ओळखला गेला ! अमृत-मंथनात चौदावं रत्न, हे जहरी विष निघालं ... भोळ्या शंकरानं ते 'हलाहल’ प्राशन करुन टाकलं ! सृष्टीवरील भयाण संकटाचं तत्काल निवारण केलं ... तेव्हापासूनच 'नीलकंठ' हे नावही त्याला मिळालं ! शिव-तांडव नृत्य जगात आहे सुप्रसिध्द ... निसर्गही हवं ते देतो, भरभरुन मुक्तहस्त ! कधी कोपला तर मात्र, होऊन तो क्रुद्ध ... थैमान घालून तांडव-नर्तन करतो संत्रस्त ! शिव-शंकर-भोलेनाथ, निसर्गाचं जणू प्रतिकात्मक रूप खास ! सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळं, भूकंप यांनी सृष्टीचा विनाश ... त्रिलोचन-शिव तिसरा डोळा उघडून तांडव करतो विनासायास ... एक नि...

कविता : 🌷' निखळ-आनंद ' तारिख : शुक्रवार, ८ मार्च २०२४

कविता : 🌷' निखळ-आनंद ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख : शुक्रवार, ८ मार्च २०२४ वेळ : १२ वाजून २६ मि. कधी कधी माणसं पूर्णतः गुरफटून जातात ... नकळत विणून-जाळ्यात  स्वतः  अडकतात ... मग कसलं भान रहात नाही म्हणून उगीचच आकांडतांडव करुन भांडतात विनाकारणच अशा वेळी भोवताली निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं जरुरी निरागस निस्वार्थीपणात तना-मनाला तजेला देणारं अपार सृष्टी-सौंदर्य निसर्ग-देवतेचं अलगद जादू करणारं, औदार्य ... शांत मनास तेव्हा जाणवेल ऋण जन्मदात्यांचं ... तळहाती झेलून पुरवलेल्या त्या लाडा-कोडाचं ... जाणीव होईल नव्याने, स्वतःच्या सद् भाग्याची ... जीव ओवाळून टाकणा-या बहिणीची-भावाची ... प्रचंड-कठीण-न सुटणारे सर्व समस्या अन् प्रश्न ... सविस्तर रेतीत लिहून-जपता'कृष्ण-कृष्ण कृष्ण' ... मनातील तणाव-चिंता-प्रश्न यांचा, नाहक कचरा ... तो भगवंत लाटांच्या रुपात, करतो त्यांचा निचरा ... ताण-रहित तन-मन, पिसा-समान हलक-फुलकं वा-यावर होऊन स्वार विसरे सर्व क्लेश व दु:ख ... पहिल्या पावसानंतर जसा आसमंत होतो स्वच्छ ... जळमटं जळून अंतर्मन होई शांत-तटस्थ-निरिच्छ ... वादविवाद-वादळी-वादग्र...

कविता- 🌷 ' डोह ' तारिख - मंगळवार, ५ मार्च २०२४

कविता- 🌷 ' डोह ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - मंगळवार, ५ मार्च २०२४ वेळ - १२ वाजून ३५ मि. डोहातील सुंदर सुशांत जळात... उठती अचानक अनंत तरंग... कुणी टवाळ पोराने मारता दगड... दोष कुणाचा, पाण्याचा की दगडाचा ? का दोष आहे त्या पोर-वयाचा ? निष्पाप जल, संथ, स्थिर, अचल... एखाद्या संवेदनशील मनाला, हकनाहक डिवचून काय होते प्राप्त ? वेळीच सावरायला हवं कुणी आप्त... जर कुंपणच शेत खाऊ लागले तर सगळे गणितच चुकू शकते समजवायला कुणी आपलेच लागते... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता- 🌷 ' देव तारी त्यास कोण मारी ? ' तारिख - मंगळवार, ५ मार्च २०२४

कविता- 🌷 ' देव तारी त्यास कोण मारी ? ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - मंगळवार, ५ मार्च २०२४ वेळ - दुपारी, ३ वाजून ५० मि. आजीचे कृष्ण-भक्तिचे सुसंस्कार होते मीरेच्या बाल-मनावर ... त्यामुळे मनोमनी तिचा ठाम विचार, कृष्ण हाच 'एकमेव वर' ! प्रत्यक्षात मीरेचा विवाह झाला-भोजराज-मेवाडचा-राजकुंवर ... दुर्दैवानं तिचं सौभाग्यच हिरावून घेतलं, लढाईने रणांगणावर ! अजाण, एकाकी मीरेने मग भक्ति-मय-विश्व उभं केलं मनात ... जगाची भ्रांतच नाही, रात्रं-दिन रममाण ती भजन-किर्तनात ! कृष्ण-भक्तित मग्न मीरा बघून, राजपूत राणा करी चीड-चीड ... कसंही करुन तिचा कांटा काढण्या-सोडली लाजलज्जा-भीड ... गाफील मीराबाईच्या गळ्यात घातला, सापाचा हार दुष्ट दिराने ... इजा न करताच हारातील विषारी साप पळाला-ईश्वरीय कृपेने ! मीराबाईच्या दुधाच्या पेल्यात महाभयंकर जहर घातले राणाने, कसलाही विचार न करता ते प्राशन केले, भाबड्या मीराबाईने ... खात्री करून घ्यावी म्हणून राणा येता, मूर्च्छित पडलेली मीरा ... तडक उठून, दिव्य-भक्तिमय-तंद्रीतच नाचू-गाऊ लागली मीरा ! असा अद्भुत भक्ति-योग की प्रत्यक्ष भगवंत नित्य असे रक्षणास ...

कविता- 🌷 ' आदिमाया-मुक्ताबाई ' तारिख - २९ फेब्रुवारी २०२४

कविता- 🌷 ' आदिमाया-मुक्ताबाई ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २९ फेब्रुवारी २०२४ वेळ - दुपारी, ४ वाजून १३ मि. निंदा, उपेक्षा सहूनही, आत्म-सामर्थ्याची तेजोमय वाटचाल... स्वतःसह सर्वांस तारुन चार-भावंडांनी दिव्यज्ञान केले बहाल ! मुक्तेची जन्मजात-जिज्ञासा, अलौकिक प्रतिभेने तेजाळलेली ज्ञानेश्वरांच्या खांद्यास खांदा लावून अध्यात्मिक धुरा वाहिली !  'संन्याशाची-मुलं'म्हणून बहिष्कृत-अवहेलनेमुळे चिंतामग्न... निर्गुणाचा स्तर गाठून, स्वसाधनेच्या फल-स्वरुपे आत्ममग्न ! लोकांची हेटाळणी सहूनही-भावंडाना आत्मतेजाची झालर ... भावंडात लहान मुक्ताईंनी, पोक्तपणे घातली मायेची पाखर ... ज्ञानेश्वरांच्या बोधामृताने उघडली, मुक्ताईंची ज्ञान-कवाडे ... आजपावेतो भारतभूमीत अभिमानाने गाती त्यांचे पोवाडे ... निर्जीव-भिंतीवर बसून स्वागतास आले ज्ञानदेव, विनाकष्ट  हे पाहून खजील-चांगदेवांचा गर्व चूरचूर होऊन झाला नष्ट ! खजील चांगदेव नत-मस्तक, घेतली-लोळण-ज्ञानेश्वर-चरणी... "यासी करा आत्मज्ञानी" म्हणंत, मुक्ताईंकडे केली पाठवणी ! मुक्ताबाईंची थोरवी अगाध-त्यांचे अपरंपार योग-सामर्थ्य-बळ... मुक्त...