कविता - 🌷 " व्यथा- सिकंदरची " तारिख - २९ नोव्हेंबर २०१६
कविता - 🌷 " व्यथा- सिकंदरची "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २९ नोव्हेंबर २०१६
एखाद्या ध्येयानं पार पछाडून जाणं ...
म्हणजे स्वतःला सिकंदर समजणं ...
जगज्जेता बनण्याच्या एका स्वप्नानं ...
त्याच्या आयुष्याला जंगजंग पछाडलं !
या एका गोष्टीने त्यास पुरतं वेडं करुन टाकलं ...
जिंकण्याचं वेड त्यानं त्याच्या सैन्याला पटवलं ...
अन् वेड लावून लढायला जय्यत तयार केलं
त्या एका अट्टाहासासाठी उभं आयुष्य वेचलं ...
स्वतःचं आयुष्य व संपूर्ण
सैन्यातल्या प्रत्येकांचच
आयुष्य, होरपळवलं ...
सरते-शेवटी त्याचं आयुष्य,
एक सजाच होतं बनलं ...
मृत्यू-शय्येवर, मरणाची वाट पाहात ...
स्व-मातृभूमी पासून लाखोंमैल दूर
स्व-प्रिय-जनां पासून योजने दूरवर
स्वतःच्या आयुष्याचा चित्रपट पाहात ...
किती- किती देशांना जींकले,
किती- लाखों जणांना मारले,
किती रक्ताचे पाट वाहवले ...
किती- लोकांना बंदी बनवले,
किती- किती खजिने लूटले ...
काय संपत्ती,पैका हिसकावले ...
किती सोनं- नाणं गोळा केले ...
किती शिव्या- शाप पचवले ...
किती असहाय जना लुबाडले ...
आयुष्याचा होम करून,काय मिळवलं ...
काय गमावलं, याच्या हिशोबाचं गणित
कधी न सुटणारं अत्यंत कठीण -कोडं,
किती असहाय वाटलं असेल कदाचित ...
वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी ...
स्वप्नांचा पाठ-पुरावा करण्या ऐवजी,
विष-बाधेमुळं, निर्बल, मरणा-सन्न,
पडलेल्या त्याला, हसावं की रडावं ...
असा यक्ष-प्रश्न खचितच पडला असणार ...
त्या" जगज्जेता "बनू पाहणाऱ्या सिकंदरला ...
ज्याच्यासाठी केला होता अट्टाहासं ...
क्या बचा जो रह गया तुम्हारे- पास ...
न यहं शरीर किसिका है ...
न कोई शरीरका हुआ है ...
शरीर तो अग्नी,जल,वायू,
पृथ्वी, आकाशसे बना है ...
उनही पंच-तत्वोमे पुनः मिल जायेगा ...
मिट्टीका जो बना,मिट्टीमें मिल जायेगा ...
Comments
Post a Comment