कविता - 🌷 " मोहक स्वप्नं त्या दोघांची "... तारिख - २७ सप्टेंबर २०१६

तारिख -२७ सप्टेंबर २०१६
कविता - 🌷 " मोहक स्वप्नं त्या दोघांची "...
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

आटपाट शहरात एक असतो तो ...
अन त्याच शहरात एक असते ती ...
तो असतो उंच-निंच देखणा छान ...
ती नाकीडोळी नीटस, गोरीपान ...

पहिल्या-वहिल्या नजर-भेटीत ...
दोघे एकमेकांचे होऊन जातात ...
मग मात्र जरा उतावीळ होतात ...
शुभलग्न-मुहूर्ताची वाट बघतात ...

शेवटी एकदाचा इंतजार संपतो ...
चांगला लाभणारा मुहूर्त निघतो ...
लग्नाचा शुभ-दिवस उजाडतो ...
अन विवाह-सोहळा आरंभ होतो ...

गौरीहार-पूजनाच्या वेळी, 
" तिच्या " मनातील भाव-तरंग ...

सनई-चौघड्याचे मिश्र-सूर ...
हृदयी सम्मिश्र कालवा-कालंव ...
सुख-दुःखाच्या भावांचं अनोखं मिश्रण ...

ओठावर हसू अन मनी हुरहूर 
अंतरी ख़ुशी पण डोळ्यांत गहिवर ...
नेत्रातून संतत पाण्याचा पाझर ...
आनंदाश्रूं-वियोगाश्रु वाहती झरझर ...

एकीकडे वाटे मिलनाची अपार ओढ ...
दुसरीकडे आप्तांचा अचानक वियोग ...

विवाह सोहळा संपन्न होतांना
"त्याचं " तरल-भाव-विश्व...

आज माझ्या आयुष्याचं पूर्णत्व ...
इतके दिवस दैव पाहत होतं सत्व ...
पण न ढळू दिलं मी माझं स्वत्व ...
यापुढं तिच्याच साथीचं फक्त महत्व ...

तो व ती स्वतःच्या मनो-विश्वात दंग ...
विधी सर्व होतात लग्नाचा-प्रसंग ...
आतूर मात्र असतात एकांतीचा संगं ...
गोड थट्टेनं दोघांच्या गाली चढे रंग ...

मनोमन रंगवलेली स्वप्नं साकारताहेत ...
मोहक, हळुवार भावना प्रकटताहेत ...
जणू अवघ्या दुनियेत दोघेच उरलेत ...
"हनिमून"च्या विचारात हरवले आहेत ...

कुणीतरी हलकेच भानावर आणतं त्यांना ...
नमस्कार करीत सुटतात जोडीनं सगळ्यांना ...
आशिर्वाद हवेतच भर-भरून त्या दोघांना ...
अति-उत्सुक त्यांचं रंगीत स्वप्नं साकारण्या ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷

Comments

Popular posts from this blog

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025

कविता 🌷 " एहसास "

कविता - 🌷 " अनछुआ आसमां "