कविता-गझल 🌷 ' सुखाचे हळवेे क्षण ' तारिख - बुधवार, २० मार्च २०२४
कविता-गझल 🌷 ' सुखाचे हळवेे क्षण '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - बुधवार, २० मार्च २०२४
वेळ - दुपारी, २ वाजून ३२ मि.
तारुण्य सळसळते, डोळे अधीर ओले ...
मन लाजाळुचे पान, अलगद मिटून गेले ...
ओझरतेसे स्पर्श, लज्जेची लाली पसरे ...
सांज रंग अवतरताना, अंग-अंग मोहरे ...
सुखाचे आजपावेतो, मनोरे रचून झाले ...
साखर झोपेतले रम्य, स्वप्नही भंगून गेले ...
रात्र नाहीच सरली, पण स्वप्न विरुन गेले ...
सुखाचे ते हळवेे क्षण, वेचायचे राहून गेले ...
सुखाचे ते हळवेे क्षण, वेचायचे राहून गेले ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment