कविता -🌷 " माणूस नावाचं बेट " तारिख - ९ नोव्हेंबर २०१६

कविता -🌷 " माणूस नावाचं बेट "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ९ नोव्हेंबर २०१६

माणूस नावाचं बेट ...
आहे अगदी मुंबा-पुरीसारखं ...
पाणी चहू दिशांना, 
पण पिण्या-योग्य पाण्याचा ... 
सदा-अन-कदा अभाव ...

जणू माणसांचा महा-प्रचंड पूर, 
पण सद्-जनां चा अभाव ...
माणूस नावाच्या बेटावर 
रेतीच्या कणागणिक,
माणसच माणसं ...
अगणित...
अनंत ...

चहू-बाजूंनी वेढलेल्या,
अथांग सागरा-समान ...
जिकडे-तिकडे, 
माणसच माणसं ...
माणसांना नाही तोटा ...
पण माणुसकीचा मात्र अभाव ...
तुटवडा ...

माणूस नावाच्या बेटावर ...
माणूस म्हणजे एक-कोडं ...
सुटेल- सुटेल असं वाटतं ...
पण उलगडत नाही ...
उकलंत नाही ...
का ते उमंजत नाही ...

माणसं वाचण्याचा छंद चांगला ...
वाचता- वाचता अवघे आयुष्य,
केव्हा सरेल ...
पत्ताच लागणार नाही ...
पण पानं मात्र अनंत ...
कधीच संपणार नाहीत...

माणूस नावाच्या बेटावर,
माणूस म्हणजे भला-मोठा हिम-नगं ...
पाण्यावर अलगद तरंगणारा ...
जेव्हडा डोळ्यांना दिसतो,
त्याच्या कैक-पटीनं 
पाण्याखाली 
गुपचूप दडलेला ...

असं हे माणूस नावाचं बेट ...
निसर्गाचा एक अचाट व अफाट नमुना ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆





Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "