कविता- 🌷 ' डोह ' तारिख - मंगळवार, ५ मार्च २०२४

कविता- 🌷 ' डोह '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - मंगळवार, ५ मार्च २०२४
वेळ - १२ वाजून ३५ मि.

डोहातील सुंदर सुशांत जळात...
उठती अचानक अनंत तरंग...
कुणी टवाळ पोराने मारता दगड...

दोष कुणाचा, पाण्याचा की दगडाचा ?
का दोष आहे त्या पोर-वयाचा ?
निष्पाप जल, संथ, स्थिर, अचल...

एखाद्या संवेदनशील मनाला,
हकनाहक डिवचून काय होते प्राप्त ?
वेळीच सावरायला हवं कुणी आप्त...

जर कुंपणच शेत खाऊ लागले
तर सगळे गणितच चुकू शकते
समजवायला कुणी आपलेच लागते...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆






























Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "