कविता -🌷 ' महान् संस्कृती ' तारिख - रविवार, २४ मार्च २०२४
कविता -🌷 ' महान् संस्कृती '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - रविवार, २४ मार्च २०२४
वेळ - संध्याकाळी, ५ वाजून ३७ मि.
गुलाबी-गुलाबी गोड-थंडी धूम पळाली रे पळाली ...
होळी-फाल्गुन-पौर्णिमेची, आज आली हो आली ...
सारेजण उत्सुक, लाकूड-फाटादी करण्या गोळा,
टाकाऊ सामान-गोवर्या जमवा-जमवीसाठी पळा ...
सूर्यास्त होताच लहानथोर-सर्व उत्साहाने जमती,
पूजा करुन फेर धरती, होळीच्या अवती-भोवती ...
तरुण मंडळी जेव्हा करिती होळी-निमित्त शिमगा,
नाव घेऊन"बैलाला ढोल"असा, तेही दाविती इंगा !
दैत्य-हिरण्यकश्यपूने महाभयंकर कट होता रचला,
होलिकेमार्फत जाळून मारण्याचा, भक्त प्रल्हादाला ...
हिरण्यकश्यपूचा दुष्ट डाव भगवंतांनीच उलटविला,
होलिका-दहन करुन, भक्त-प्रल्हादाला वाचविला !
स्वयं नृसिंह-अवतारात पोट फाडून, राक्षस वधीला ...
परम विष्णू-भक्त-प्रल्हादाचा जीव पुनःपुन: रक्षिला !
त्याचा आनंदोत्सव साजरा करण्या, होळी-रंग-पंचमी ...
मतभेद-हेवेदावे पूर्ण विसरुन-निखळ आनंदाची हमी !
सुग्रास पुरणपोळीच्या भोजनाने सर्वजण होती तृप्त ...
शत्रुता विसरुन गळाभेटीने शत्रुत्व संपून, होई लुप्त !
अशी महान् हिंदू संस्कृती, असे महत्त्वपूर्ण सणवार ...
जगभरात अन्यत्र कोठेही शोधूनही नाही सापडणार ...
जगभरात अन्यत्र कोठेही शोधूनही नाही सापडणार ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment