कविता - 🌷 ' आहे कोण ? ' ‌‌तारिख - शनिवार, २ मार्च २०२४


कविता - 🌷 ' आहे कोण ? '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, २ मार्च २०२४
वेळ - दुपारी, ४ वाजून २५ मि.

भूs-भूs-भूs-भू कोण करी ?
लक्ष दिलं की, शेपटी हलवी ...

चेंडू फेकताच दौडत जाई ...
क्षणातच शोधून, घेऊन येई ...!

वेळ जर झाली, जेवणाची ...
दरदर-खेचत-खेचत घराकडे येई ...

घराच्या बाहेर खुट्ट वाजलं जरी,
वरच्या पट्टीत, मग आवाज करी ...

घरात कुणी जर आजारी असेल,
त्याच्या उशाशी, तो शांतपणे बसेल ...

त्याच्यावर घराची पूर्ण जबाबदारी ...
घराचा सच्चा तो पहारेकरी ...

फिरण्याची येता त्याला हुक्की,
आणून देतो, गॉगल्स-बूट-टोपी ...

समुद्र म्हटला की स्वारी होते खुश ...
डुंबत असताना, उठण्यास नाखूष !

रेतीत गोलांट्या उड्या मारी ...
"बंटी छू" म्हणताच, झडप घाली ...

सांगा पाहू, हा आहे तरी कोण ?
अर्जुनचा मित्र पण चोरांचा दुष्मन ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "