कविता :🌷' मला सांगा '

कविता :🌷' मला सांगा '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : मंगळवार, २९ ऑगस्ट २०२३
वेळ : दुपारी ३ वाजून ५९ मि.

मला सांगा सुखी होणं म्हणजे नक्की काय असतं ?
क्षण-न्-क्षण इवल्याशा जीवात तन-मन रमून जातं

दाही दिशांनी दुडु-दुडू धावत-येऊन अंगाला बिलगतं
बघता-क्षणी कुणाच्याही कडेवरुन बेधडक झेप घेतं !

बाहेर जाता मोठ्या-टपोर्या डोळ्यांनी जग टिपून घेतं
कडेवर असता दुधाळ-सुगंधाने मनास चिंब भिजवतं

एखाद्या वेळी थोडं दुर्लक्ष झालं तर कावरं-बावरं होतं
दुसऱ्याच क्षणी सगळं विसरुन चक्क खिदळू लागतं !

काऊ-चिऊ-माऊच्या गोष्टींमध्ये समरसून गुंगुन जातं
मोठ्या-आवाजात-कुकरच्या शिट्टीने घाबरुन-गुट्ट होतं 

पक्षांचा किलबिलाट ऐकून आनंदाने गोड हुंकार भरतं
मधाळ आवाज करत मऊ-मखमली गालांचा पापा देतं

एखाद्या वेळेस थोडं दुर्लक्ष झालं तर कावरं-बावरं होतं
दुसऱ्याच क्षणी सगळं विसरुन चक्क खिदळूच लागतं

वामकुक्षी घेत साखर-झोपेत इवल्या हातांनी मिठी मारतं,
स्वर्ग-सुख म्हणजे तरी याहून जास्त काय बरं असू शकतं ?

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆










Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "