Posts

Showing posts from June, 2023

कविता :🌷' नखशिखान्त संवेदना '✅

कविता :🌷' नखशिखान्त-संवेदना ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : २९ जून २०२३ वेळ : १० वाजून ४३ मि. ज्याचं चित्त निर्मळ-पावन त्यास दर्शन देईल दयाघन ! ज्या मनी नाहीच किल्मिश  त्या हृदयी वसतो जगदीश ! भुकेल्या-जीवा जे देती घास त्यांच्या नशिबी अन्न-सुग्रास दीन-जनां देती मदतीचा हात, येईल त्यांच्यासाठी जगन्नाथ ! रात्रं-दिन जे गाळतील घाम, तेच भक्त पावतील निजधाम ! दुर्बल-जनांची जे ठेविती जाण, त्रिदेव रक्षिती त्यांचे पंच-प्राण ! स्वार्थ सोडून, परोपकार करी त्यांच्या-पाठीशी सदैव श्रीहरी किर्ती-धन-सुख, नसे ज्या खंत त्या साठी सर्वत्र, उभा भगवंत ! ज्यांनी भक्ति-मार्ग चोखाळला त्यांचा मुक्ति-पथ सुकर झाला ! जो आहे जळी-स्थळी-पाषाणी  स्वर्ग-पृथ्वी-पाताळी, चक्रपाणी ! भूमी-जल-व्योम व्यापून टाकी  म्हणूनच त्या म्हणती सर्वव्यापी ! मत्स्य-कूर्म-वराहादी दशावतार खांबातून प्रकटला नृसिंहावतार ! 'वाल्या'सारखा जो डाकू अट्टलं, नामस्मरणजपे भेटे त्यास विठ्ठल ! सुख-दु:ख-मोह-माया-देह, नश्वर नखशिखान्त-संवेदना आहे 'ईश्वर' ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता :🌷' नखशिखान्त संवेदना '

कविता :🌷' नखशिखान्त-संवेदना ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : २९ जून २०२३ वेळ : १० वाजून ४३ मि. ज्याचं मन निर्मळ पावन त्यास दर्शन देई दयाघन ! ज्या मनी नाही किल्मिश  त्याच हृदयी वसे जगदिश ! भुकेल्या जीवास देई घास त्यालाच मिळे अन्न-सुग्रास दीन-जनां देई मदतीचा हात त्याच्यासाठी येईल जगन्नाथ ! रात्रं-दिन जे गाळतील घाम, तेच भक्त, जातील निजधाम ! दुर्बल-जनांची ठेवी जो जाण, देवच रक्षितो त्याचे पंच-प्राण ! स्वार्थ सोडून, परोपकार करी त्याच्या-पाठीशी सदैव श्रीहरी किर्ती-धन-सुख, नसे ज्या खंत त्याच्यासाठी सर्वत्र उभा भगवंत ! ज्यांनी भक्ति-मार्ग चोखाळला त्यांचा मुक्ति-पथ सुकर झाला ! जो आहे जळी-स्थळी-पाषाणी  स्वर्ग-पृथ्वी-पाताळी, चक्रपाणी ! भूमी-जल-व्योम व्यापून टाकी  म्हणूनच त्या म्हणती सर्वव्यापी ! मत्स्य-कूर्म-वराहादी दशावतार खांबातून प्रकटला नृसिंहावतार ! 'वाल्या'सारखा डाकू जो अट्टलं, नामस्मरणजपे भेटी त्या विठ्ठल ! सुख-दु:ख-मोह-माया-देह नश्वर, नखशिखान्त-संवेदना आहे 'ईश्वर' ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता :🌷' ओलेती '

कविता :🌷' ओलेती ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : सोमवार, २६ जून २०२३ वेळ : ११ वाजून २९ मि. आलं आभाळ दाटून झालं सावळं-सावळं भूमी आतुर होऊन अंतरंगी खळं-बळं  भुरुभुरु पाऊस पडतो मनास भुरळ घालतो वा-याची झुळुक होऊन कानी संदेश तो देतो ! ओल्या मातीचा सुगंध मनास बेधुंद करीतो मनाचा गाभारा भरून हुंकार भरू लागतो ! पाना-पानावर थेंबांची नक्षी कोरीव काढतो  दिमाखात सारी सृष्टी चिंब ओलेती करीतो ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता : 🌷' जाणीव '

कविता 🌷 ' जाणीव ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : सोमवार, १९ जून २०२३ वेळ : ०८ वाजून ५४ मि. असं का होतं माणसं गेली की, त्यांची खरी 'किंमत' जाणवते त्यांच्या 'नसण्यानं' होते बेचैनी विचारानं मनाची घालमेल होते ! बेफिकीर वृत्तीनं वर्तमान जातो जाताना सोबत सुखालाही न्हेतो  बंद डोळ्यांना जाणीवही नसते ! जेव्हा ती होते वेळ गेलेली असते ! कधी वाटतं ते मायाजाल असावं, ज्यात भुरळ पडून भरकटत जावं  मन-तन गुरफटून भानही हरपावं ! जणू भूल पडून सर्वच धूसर व्हावं ! जन्मा-जन्मांची पुण्याई कामी यावी  सुखाने चक्क पायांशी लोळण घ्यावी  हुशार देखण्या पतीची साथ लाभावी प्रेम-लाड-कौतुकाची बरसात व्हावी ! कुणा दुष्ट-काळ्याबेर्याची दृष्ट लागावी, मोकाट जनावरा-समान वृत्ती पलटावी ! सारासार-बुद्धीही काम करेनाशी व्हावी, चुकीची झापडं, गांधारी-सम गत व्हावी ! पश्चात्तापाने फारसं काही बदलत नाही गेलेला सुवर्ण-काळ आणता येत नाही झालेल्या चुकांची जाणीव जातच नाही बेगडी-मुखवटा फार काळ टिकत नाही ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷' मातृ-पितृ-प्रेम '

कविता :🌷 ' मातृ-पितृ-प्रेम ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : रविवार, १८ जून २०२३ वेळ : ७ वाजून २५ मि. मातृप्रेमाचा उदो-उदो होतो जगात सर्वत्र  त्यात गैर किंवा चुकीचं काहीच नाही बरं, नवजीवाचा जन्म म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म पण पितृपदाचं महत्त्व खूप मोठं हेही खरं ! स्त्री-पुरुष या एकाच नाण्याच्या दोन बाजू दोघांच्या स्थायी-स्वभाव-विशेषात भिन्नता एक बाह्यतः तटस्थ पण अंत:करणानं मृदू ! दूजी वात्सल्य-मूर्ती पण शिस्तप्रिय-दृढता ! दोहोंचा उद्देश एक पण दृष्टि-कोन वेगवेगळा  नवागत-सुसंस्कारित-जबाबदार-व्यक्ती होणं, आईचा भर, शरीराचं-मनाचं-आरोग्य जपणं अपत्या-बद्दल पित्याचा कल जरासा निराळा  पित्याचा भर सूर्य नमस्कारादि कसरती करणं, मनाने-शरिराने निर्भय-शिस्तबध्द-खंबीर होणं, कोणत्याही प्रसंगाला कच न खाता, तोंड देणं, वेळीच निर्णय घेऊन तो प्रयत्न पूर्वक निभावणं ! लाडकोड दोघंही करतात, दोघांची पध्दत वेगळी खाण्या-पिण्याचे-नव्या-कपड्यांचे-लाड आईचेच लांब-सहल-सायकल-स्कुटर-बाईकसाठी बाबाच छोटा-खर्च-आईकडून, बाबांकडून अपेक्षा मोठ्ठी ! आई-बाबा दोघांचं महत्त्व-अनन्यसाधारण-पवित्र, दोहोंच्या असण्यान...

कविता :🌷' ख-या भक्तिचा भुकेला '

कविता :🌷 ' ख-या भक्तिचा भुकेला ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : गुरुवार, १५ जून २०२३ ख-या-भक्तिचा तो सदा असतो भुकेला भक्तांच्या मूक-हाकेला सदा धावून गेला ज्ञानदेवांसाठी रेडा बनून वेद-मंत्र वदला ! ज्ञानेश्वरीमधून मराठी-भाषेत अवतरला ! दुष्ट-होलिकेचं भस्म करुन,अग्नी शांत झाला  खांबातून प्रकटून मुजोर दानवाचा वध केला भाबड्या भक्त-प्रल्हादाला अलगद वाचविला दानवी-वृत्तीवर सदाचारानं विजय मिळवला ! जुलमानं अभंग-पोथ्या नदीत फेकून दिलेल्या  संत-सज्जन-अंत:करणाच्या ठिक-या झाल्या  तुकारामांच्या अभंगांचा जळी सांभाळ केला ! अद्भुत-अभंगवाणीचा विनाश होऊ न दिला ! रात्रंदिवस देवाची आळवणी करणार्या जनीला  दळण-कांडण करुन कामात हातभार लावला संतांच्या-घरी पाणक्या बनून-सेवा देत राहिला ! दास होऊन श्रीहरी भक्ताची कामं करित राहिला कबीरा-घरी शालू-शेले विणून मदत-रूप झाला  संशयी-राणानं विषाचा प्याला मीराबाईला दिला  विष-पेयाचं अमृत करुन मीरेचा जीव वाचविला  घोर तप-साधनेत परम-भक्त धृव-बाळ रक्षिला ! एकनाथांनी आणलेलं गंगा-जल पिण्याकरिता मरणासन्न गर्दभाच्या रुपात प्रकटला तो दाता ! मह...

कविता 🌷' भक्तीचा भुकेला ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

कविता :🌷 ' भक्तीचा भुकेला ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : गुरुवार, १५ जून २०२३ वेळ : १२ वाजून १७ मि. ख-या-भक्तीचा तो सदा असतो भुकेला भक्तांच्या मूक-हाकेला सदा धावून गेला ज्ञानदेवांसाठी रेडा बनून वेदमंत्र बोलला ! ज्ञानेश्वरीमधून मराठी-भाषेत अवतरला ! दुष्ट-होलिकेचं भस्म करुन,अग्नी शांत झाला  खांबातून प्रकटून मुजोर दानवाचा वध केला भाबड्या भक्त-प्रल्हादाला अलगद वाचविला दानवी-वृत्तीवर सदाचारानं विजय मिळवला ! जुलमानं अभंग-पोथ्या नदीत फेकून दिलेल्या  संत-सज्जन-अंत:करणाच्या ठिक-या झाल्या  तुकारामांच्या अभंगांचा जळी सांभाळ केला ! अद्भुत-अभंगवाणीचा विनाश होऊ न दिला ! रात्रंदिवस देवाची आळवणी करणार्या जनीला  दळण-कांडण करुन कामात हातभार लावला संतांच्या-घरी पाणक्या बनून-सेवा देत राहिला ! दास होऊन श्रीहरी भक्ताची कामं करित राहिला कबीरा-घरी शालू-शेले विणून मदत-रूप झाला  संशयी-राणानं विषाचा प्याला मीराबाईला दिला  विष-पेयाचं अमृत करुन मीरेचा जीव वाचविला  तिच्या भजन-गीतांतून सदैव प्रकट होत राहीला निर्धन रविदास श्रीमंत होण्यासाठी पारस दिला निरिच्छतेने त्याने घरा...

कविता :🌷' खरी शिदोरी ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

कविता 🌷' खरी शिदोरी ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : शनिवार, १० जून २०२३ वेळ : ११ वाजून ०६ मि. माणसा तुझी रीतच उफराटी काहीही करशील स्वार्थापोटी पैशामागे धावशील उठा-उठी चुकांमुळे पस्तावशील रे शेवटी! खस्ता खाऊन ज्यांनी वाढविले, त्या आई-वडिलांसाठी काय केले ? मोठेपणी त्यांना हवे-नको विचारले ? श्रावण बाळ बनून तीर्थक्षेत्री नेले ? गोर-गरिबांना उचलून काही दिले ? गरजू विद्यार्थ्यांना विद्यादान दिले ? कधी आपण होऊन श्रमदान केले? कधी पुढाकार घेऊन रक्तदान केले? माणूस म्हणून माणुसकी दाखवली? त्रास सोसून दुसऱ्याची मदत केली? मुक्या प्राण्यांवर भूतदया दाखवली? स्वतः प्रामाणिकपणे वाटचाल केली? नि:स्वार्थीपणे कुणाची सेवा केली ? मनापासून देवाची आळवणी केली? कधी गरजूला मदतीचा हातही दिला? कधी अडी-नडीला उपयोगी पडला? जीवनाच्या कैफात सगळं विसरशील तारुण्य ओसरलं की भानावर येशील वृद्धापकाळी मागचं आठवून रडशील देवापुढे हात जोडून गा-हाणे सांगशील उभा जन्म पै-पैसा गोळा करण्यापेक्षा जिवाला जीव देणारी माणसं महत्त्वाची इथेच राहतो पैसा-अडका-कपडा-लत्ता माणुसकी-प्रेम-मैत्री हीच खरी श...

कविता :🌷' मंगलमूर्ती '

कविता : 🌷' मंगलमूर्ती ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : बुधवार, ७ जून २०२३ वेळ : १२ वाजून १४ मि. कृष्ण-पक्षात येणारी चतुर्थी म्हणजे 'संकष्ट'चतुर्थी कठीण प्रसंगातून सुटका करणारी म्हणून 'संकष्टी' प्रथम पूज्य-गणेशाचं पूजन-वंदन आणि पुष्पवृष्टी  उकडीच्या मोदकांच्या नैवेद्याने गणरायाची संतुष्टी शुक्ल-पक्षीय चतुर्थीला 'विनायकी' असं म्हणतात मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला 'अंगारकी' म्हणतात  दुःखापासून मुक्तीसाठी भक्त संकष्टीचं व्रत करतात सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास-पूजा करतात ! अत्यंत चतुर अन् कुशाग्र-बुद्धीचा गौरी-पुत्र-गजानन हसत-हसत जिकलं त्यानं पृथ्वी-प्रदक्षिणेचं आव्हान जरी निघाला मयूर-वाहनावर कार्तिकेय जलद-गतिने शिव-पार्वतीला-प्रदक्षिणा घातली बुद्धिशाली गणेशाने ! महाकाय गजवदन आरुढ होऊन मूषक वाहनावर दूर करतो सगळी विघ्नं म्हणून आनंद पसरतो भूवर प्रिय अशा दुर्वा-जास्वंदीची फुलं, भक्त वाहती त्यावर "मंगलमूर्ती मोरया"च्या जल्लोषात रमतो जन-सागर ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷' मानस-वारी '

कविता : 🌷' मानस-वारी ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख शुक्रवार, ९ जून २०२३ वेळ : संध्याकाळी, ७ वाजून ३मि. एकाच स्थितीमध्ये चित्त, मन, शरीर, बुद्धी कंटाळते विरंगुळा म्हणून स्थिती बदलायला धडपडत असते कधी हवा-पालट म्हणून थोडीशी गंमत हवीशी वाटते कधी तीर्थ-क्षेत्री दर्शन-यात्रेची आतुरता वाटत असते आषाढी एकादशीला पंढरपूरला भक्तीभावाला पूर येतो भारतभरातून सर्व स्तरांतून भक्त-समूह पायी-पायी येतो लाखोंच्या संख्येने नाचत-गात 'स्व'चे भान विसरुन येतो स्त्री-पुरुष-आबाल-वृद्ध-शेजारी-पाजारींसह पोहोचतो ! ज्या ज्या कुणाला तीव्र इच्छा असूनही ती मारावी लागते, त्यांचे फक्त शरीर कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असते, मन मात्र दिवस-रात्र वारकरी संप्रदायाबरोबर फिरत असते पंढरपूरी विठ्ठल-रखूमाईच्या दर्शनासाठी आसुसलेले असते ! मनात तीव्र इच्छा असेल तर 'मानस'-यात्रा सहजच घडू शकते ! त्यासाठी फक्त आंतरिक ओढ व खरी तळमळ वाटली पाहिजे मनस्वी-ओढीने सूक्ष्म-शरीर जगाच्या पाठीवर कुठेही पोहोचते कैलास मानसरोवर यात्रा करुन-पंढरपूरची वारीही पूर्ण करते ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷' संस्कृतीचा आवाका '

कविता : 🌷 ' संस्कृतीचा आवाका ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : शनिवार, ३ जून २०२३ वेळ : संध्याकाळी, ७ वाजून ६ मि. "वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे" इति संत तुकाराम  "पक्षीही सुस्वरे आळविती"अभंगात म्हणती महाराज  वड-पूजनाच्या माध्यमातून आजही स्त्रिया ते पाळतात निसर्गाच्या सान्निध्यात राहून सर्व नातीही दृढ करतात ! अर्वाचीन हिंदू संस्कृती फार दूरोगामी विचार करणारी सृष्टी-निर्मितीपासून आजवरच्या मानवी वाटचालीची, साक्षीदार ती, अथपासून इति-पर्यंतची एकमेव साथी जसा महाभारतातील, अर्जुन-सखा-श्रीकृष्ण-सारथी ! स्त्री हाच कौटुंबिक मूल्य-मापनाचा खरा आधारस्तंभ ! सृष्टीचा समतोल, स्त्रियांच्याच माध्यमातून होतो प्रारंभ  पृथ्वी-जल-अग्नि-वायु-आकाश, पंच-महाभूती सेतुबंध मानवी-शरीर व पंच-ज्ञानेंद्रियांशी निगडित घनिष्ठ संबंध ! वट-पौर्णिमेच्या निमित्ताने अर्धांगिनी करती आराधना, पतिच्या दीर्घ-आयु-आरोग्यासाठी व्रत-वैकल्य-साधना उपवासाच्या माध्यमातून प्रकृती-स्वास्थ्याची जोपासना नव-वस्त्र-अलंकारांनी नटून, सखी-शेजारणींसह अर्चना ! एका दगडात नव्हे-एका दिवसात किती मोठा आवाका निसर्ग-प्रे...