कविता : 🌷' ओलावा '

कविता 🌷 ' ओलावा '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, १ मे २०२३
वेळ :दुपारी, १ वाजून २७ मि.

सततची ओली चिकचिक खरंतर बिल्कुल आवडत नाही
पण हेही तितकंच खरं की
मायेच्या-प्रेमाच्या ओलाव्यावीण क्षणभरही जमत नाही !

उन्हाळ्यात तलखीनं 'दे माय धरणी ठाय'अशी होते गत
पण हेही तितकंच खरं की
दुभंगल्या-धरेतूनच इवला अंकुर हळुच असतो डोकावत !

आईविना पोरं, वात्सल्याचा-झरा सतत हुडकत राहतात 
पण हेही तितकंच खरं की
जिव्हाळ्याच्या-ओलाव्याने आपलीशी होऊन बिलगतात !

वाळवंटात झाडांची-मुळं खोल लांबवर सुसाट धावतात,
पण हेही तितकंच खरं की
पोषक-तत्वांची ओल मिळताच, त्याच जागी स्थिरावतात !

प्रत्येक जीवाला ओढ लागलेली असते, फक्त ओलाव्याची
पण हेही तितकंच खरं की
ती खर्याअर्थी मिळेपर्यंत, जीवाची तळमळ नाही संपायची !

जन्मा-पाठी-जन्म ओलाव्याच्या शोधातच भटकतो वणवण, 
पण हेही तितकंच खरं की
ज्या जन्मी तो ठेवा लाभतो, त्याचा प्रत्येक दिवस होतो सण !
ज्या जन्मी तो ठेवा लाभतो, त्याचा प्रत्येक दिवस होतो सण !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆











































































Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "