कविता : ' साद '

कविता : 🌷' साद '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले 
तारिख : रविवार, १२ मार्च २०२३
वेळ : १२ वाजून ५७ मि.

कान्हा हसेना, कान्हा बोलेना
कान्हा काही केल्या कांहीच ही सांगेना
कान्हा हसेना ll धृ ll

गेले यमुनेच्या तीरी, 
भरण्या श्यामसवे पाणी 
आम्ही पाण्यात घडे बुडवून रे ... ll १ ll

गेले कर्दळीच्या वनी,
वेणू ऐकू ये कानी
वा-यासंगे कानी आली तान रे ...ll २ ll

गोपी या ना या ना जरा 
रंग खेळू, धरूया फेरा
रंग उधळून 
नाचूया भिर् भिर् भिर् भिर् भिर् भिर् भिर् भिर् ll ३ ll

हे यमुनेचे जीवन 
साद घाली आम्हां रे
रुमझूम करती पायांमधली नुपूरे 
मनं चंचल गडे
त्याचा थांग ना लागे
आतूर झाले सर्व गोपीजन रे
कान्हा मुळी बसला लपून
गोपी सार्या दमल्या शोधून 
कोण हा कान्हा, कोठे सगळे जण रे   ll ४ ll

@तिलोत्तमा विजय लेले 

🙏🕉️🔆











Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "