कविता : 🌷' रुंजी '

कविता : 🌷' रुंजी '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले 
तारिख : शुक्रवार, १० मार्च २०२३
वेळ : ११ वाजून ०४ मि.

या फुलण्यावर अन् हसण्यावर
जीव खुळा जडला रे 
जीव वेडावला रे 
छंद मला जडला रे ll धृ ll

हसरे डोळे, खुणावती हे
मूक संमती देती
गो-या गो-या गालांवरती
नकळत गुलाब फुलती 
हळव्या माझ्या मनात रुंजी
घालतील गं तारे ll १ ll

 निळ्या नभात गूढ कुणीतरी
 शीळ घालीत येई
 इवल्या इवल्या पंखांवरती
 रंगपंचमी झाली 
 इंद्रधनुचे सात रंगही 
 त्यात मिसळूनी गेले ll २ ll

 शुभ्र सुंदर चांदणं लेवून
 रात पुनवेची आली 
 चांद सखा हा घिरट्या घाली
 सखीच्या अवती-भवती
 प्रीतिसंगम दिव्य असा हा
 मनास मोहविते रे ll ३ ll

 श्रावणधारा रिमझिम पाऊस
 मनमोर फुलवी पिसारा
 हिरव्या हिरव्या गर्द रानी,
 टप टप पडती धारा 
 तृप्त झाली धरणी माता
 स्वर्ग भूवरी उतरे ll ४ ll
 
@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🔆



 




 

Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "