कविता : 🌷' खराखुरा आदर्श '
कविता -🌷' खराखुरा आदर्श ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : गुरुवार, ३० मार्च २०२३ " पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा " ही प्रसिद्ध ओवी संत तुकाराम महाराज यांची आहे नवसासायाने कौसल्येच्या पोटी श्रीराम जन्माला आला मानवतेचा आदर्श संदेश, त्यानं कृतीतून विश्वाला दिला ! एक आदर्श, आज्ञाधारी-पुत्र म्हणून जो स्वीकारला गेला, सर्व भावंडात आदर्श-ज्येष्ठ-बंधू म्हणून तो मानला गेला ! शक्तिशाली शिवधनुष्याला प्रत्यंचा लावून 'पण जिंकला' सुंदर, सुशील, राजकन्या जानकीशी तो विवाहबद्ध झाला ज्या काळी-समाजात पुरुषवर्ग सर्रास बहु-पत्नी करायचा, आदर्श-पति म्हणून एक-पत्नि-धर्माचा अंगिकार त्यानं केला वाजत गाजत सीतेसह श्रीराम, अयोध्या-नगरीत प्रवेशला प्रजेच्या आनंदोत्सवाचा स्वीकार करत, विराजमान झाला कैकेयीला दिलेल्या दशरथ-वरानुसार वनवास त्यानं भोगला पत्नी सीता व बंधू-लक्ष्मणसह पूरी चौदा वर्षं वनवासी झाला रावणाने कपटाने, सीतेचे हरण केल्यानं वेडापिसा तो झाला सामान्य मानवाप्रमाणे दुःखातिरेकाने धाय मोकलून तो रडला नंतर भानावर येत, जानकीला शोधून काढण्याचा चंग बांधला हनु...